मिळकतींना थकबाकीवरील दंडव्याजावरील सवलत योजनेचे शेवटचे १५ दिवस
थकबाकीदारांनी मुदतीत घरफाळा न भरल्यास त्यांच्या मिळकतीवर बोजा चढविणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा सवलत योजनेचे शेवटचे १५ दिवस राहिले असून या कालावधीत उर्वरीत मिळकत धारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा अन्यथा यानंतर संबंधीत मिळकतींवर बोजाची नोंद केली जाईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. महापालिकेने १ हजार स्केअर फूटाच्या आतील मिळकत धारकांना दंडच्या व्याजामध्ये दि. १६ ते ३१ मार्चपर्यंत संपूर्ण घरफाळा भरल्यास ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. तर १ हजार स्केअर फूटाच्या वरील मिळकत धारकांना दंडाच्या व्याजामध्ये दिनांक १६ ते ३१ मार्चपर्यंत घरफाळा भरल्यास ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्याप्रमाणे १००० चौ. स्क्वे. फुट पर्यतच्या अनिवासी वापरातील मिळकतींना दि. १ मार्च ते ३१ मार्च अखेर दंड व्याजात ४० टक्के सवलत दिली जाणार आहे. १००० चौ. स्क्वे. फुटावरील अनिवासी वापरातील मिळकतींना दि.३१ मार्च २०२१ अखेर घरफाळा भरल्यास दंड व्याजात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. निवासी व अनिवासी वापरातील मिळकतींना दंड व्याजावरील माफी ही येथून पुढे दिली जाणार नाही यावर्षी ही शेवटची संधी असलेचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. त्यामुळे या सवलत योजनेचा उर्वरीत मिळकत धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
दि.२६ जानेवारी २०२१ ते १५ मार्च २०२१ अखेर एकूण ९०७९ मिळकतींनी लाभ घेतला असून यामध्ये मागील थकबाकी रुपये ५,९२,८८,४९९/-असून चालू मागणी रुपये ३,००,५५,५१४/- इतकी होती. या सलवतीमध्ये एकूण रुपये ३,२२,०४,८४३/- दंड व्याजासह अशी एकूण रुपये १२,१५,४८,८५६ इतकी रक्कम या सवलत योजनेतून जमा करण्यात आली आहे. दिनांक १ एप्रिल २०२० ते दि.१५ मार्च २०२१ अखेर आत्तापर्यंत ५२,८९,९४,७९२/- इतका घरफाळा जमा झालेला आहे. यामध्ये एकूण ९३,२७५मिळकतींनी घरफाळा व या योजनेचा लाभ घेतला असून यामध्ये मागील थकबाकी १३,६९,६३,२६/- इतकी होती. यामधील चालू मागणी ३२,२७,८४,१५९/- इतकी असून दंड व्याज रक्कम रुपये ६,९२,४७,२६४/- इतका जमा झाला आहे.