Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यामहाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीवर...

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड 

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी समितीवर चेतन नरके यांची निवड 

पुणे/प्रतिनिधी :  महाराष्ट्रातील कृषी पदवीधर आणी कृषि तंत्रज्ञानाची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञान संस्थेच्या ( आय. एम. ए. टी ) कार्यकारी  समितीत स्वीकृत सदस्य म्हणून कोल्हापूरचे चेतन अरुण नरके यांची नियुक्ती करण्यात आली  संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांची सभा नुकतीच कृषी विद्यालय पुणे येथे जाहली. यात हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष आणी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायदे, उपाध्यक्ष आणी माजी कृषी आयुक्त डॉ उमाकांत दांगट, माजी अध्यक्ष आणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजाराम देशमुख,डॉ  रामकृष्ण मुळे, डॉ. सुदाम अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.चेतन नरके हे उच्च विद्याविभूषित असून युरोप आणि आशियाई देशातील प्रसिद्ध अर्थ व्यवस्थापक आहेत.  सध्या ते थायलंड देशाच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून काम करत आहेत. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना चेतन नरके म्हणाले माझा आजवरच अनुभव, ज्ञान आणि या संधीचा उपयोग करून महाराष्ट्रातील कृषी मालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि त्यासोबत  शेतकऱ्याच्या कृषी मालाला अधिक भाव मिळवून देण्याकरिता करीन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments