Saturday, December 21, 2024
Home ताज्या महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान...

महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर

महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.०८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे, बेटी बचाओ आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढवणे, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. महिला दिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी महिला भगिनींच्या वतीने “लेक वाचवा लेक शिकवा”, “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” अशा आशयाचा संदेश भगव्या फुग्यांद्वारे आकाशात सोडण्यात आला.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा व भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा” या उपक्रमाअंतर्गत शिवसेना व भगिनी मंचच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र.२९ शिपुगडे तालीम, प्रभाग क्र.३० खोलखंडोबा, प्रभाग क्र.३१ बाजारगेट या प्रभागातील रहिवासी कुटुंबीयात दि.०८ मार्च ते दि.७ एप्रिल २०२१ दरम्यान मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावे रु.५ हजारांची ठेव पावती ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या कि, महिलांच्या कला गुणांना संधी मिळावी या हेतूने शिवसेना आणि भगिनी मंचच्या वतीने गेली १० वर्षे भगिनी महोत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिलांचा सन्मान केला जातो. गेल्या वर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे गेल्या वर्षासह या वर्षी भगिनी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आणि महिलांच्या उन्नती व सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच नेहमीच एक पाऊल पुढे असून, येणाऱ्या काळातही “लेक वाचवा, लेक शिकवा” अभियानातून महिला उन्नतीचे व सबलीकरणाचे कार्य अविरत सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी महापौर सौ.सरिता मोरे, शिपुगडे तालीम प्रभागाचे शिवसेना इच्छुक उमेदवार स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, बाजार गेट प्रभागाचे शिवसेना इच्छुक उमेदवार ऋतुराज क्षीरसागर, खोलखंडोबा प्रभागाच्या शिवसेना इच्छुक उमेदवार सौ.ज्योती निलेश हंकारे, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक सौ.मंगल साळोखे, श्रीमती पूजाताई भोर, सौ.पूजा कामते, सौ.शाहीन काझी, सौ.गौरी माळदकर, सौ.अनुराधा परमणे, सौ.मीनाताई पोतदार, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.भारती गवळी, सौ.संगीता गवळी, सौ.पूजा गवळी, सौ.रेणुका गवळी, सौ.पूजा सांगावकर, सौ.सुनिता खुर्द, सौ.अक्षता पोतदार, सौ.शर्मिला घोरपडे, सौ.सई घोरपडे आदी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, भगिनी मंच सदस्या आणि भागातील स्थानिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments