`लोकमान्य’ची सामाजिक क्षेत्रात बांधिलकी
-जीएसटी डेप्युटी कमिश्नर तेजस्विनी मोरे यांचे प्रतिपादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑफ. सोसायटी लिमिटेड या संस्थेने सहकार क्षेत्रातील आग्रगण्य संस्था म्हणून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दिल्लीतही आपले नाव उंचावले आहे. बँकींग, इन्शुरन्स क्षेत्रातील ही संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून महिलांना स्वयंरोजगार देवून आत्मनिर्भर बनवत आहे. लोकमान्यची सामाजिक बांधिलकी सर्वश्रुत आहे, असे प्रतिपादन जीएसटी डेप्युटी कमिश्नर तेजस्विनी मोरे यांनी केले.लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑफ. सोसायटी लिमिटेड संस्थेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधुन आरटीओ महिला पोलिस, न्यायाधीश, वकील आणि महिला पत्रकारांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले. वाहतुक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर दिलीप पाटील होते. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.
मोरे म्हणाल्या, लोकमान्यच्या वतीने हळदी-कुंकु, महिला दिन, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, ही कौतुकाची गोष्ट आहे. महिला एकत्र आल्यानंतर विचाराची देवाण-घेवाण होते. महिलांना निश्चयाचा क्षणही अनुभवायला मिळतो. यातूनच महिलांचा आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर उद्योगशीलता वाढीस मदत होते.
लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर दिलीप पाटील म्हणाले, दैनिक तरूण भारतचे समूह प्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकूर यांच्या प्रेरणेतून १९९५ साली लोकमान्य सोसायटीची स्थापना झाली. आजतागायतच्या यशाचा, प्रगतीचा आलेख अखिल भारतीय स्तरावर पोहचला आहे. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि दिल्ली या चार राज्यात २१७ शाखांव्दारे १२ रिजनल ऑफीसमार्फत या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. दर्जेदार सेवेच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जिंकला असून ५ हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडला आहे. केवळ ठेवी गोळा करून कर्जवाटप करणे इतकेच मर्यादीत उद्दीष्ट न ठेवता रियल इस्टेट, हॉस्पीटलीटी, विमा उत्पादने विक्री, परकीय चलन, लॉकर्सच्या सुविधा, शिक्षण इत्यादी व्यवसायातही लोकमान्य कार्यरत आहे.
अँड. कल्पना पाटील म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी स्वराज्यची लढाई कशी लढायची यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांना बाळकडू दिले. तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केल्याने प्रत्येक क्षेत्रात महिला पुरूषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. पत्रकार सार्या कुलकर्णी म्हणाल्या, महिलांमध्ये कष्ट करण्याचे उपजतच गुण असतात. त्या आपल्या कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठतात. तरीही पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकमान्यने महिलांना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रगती जगताप यांनी केले. सुत्रसंचालन ऋतुराज दळवीयांनी केले. आभार असिस्टंट रिजनल मॅनेजर आर. डी. पाटील यांनी मानले. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑफ. सोसायटी लिमिटेड संस्थेच्या कोल्हापूर जिल्हयातील सर्व शाखांच्या शाखाधिकारी, कर्मचारी महिला, मार्केटींग असिस्टंट अवधुत जांभिळकर, सदानंद भोसले, एचआर मॅनेजर जगदीश दळवी आदी उपस्थित होते.
सत्कारमुर्ती महिलामध्ये अँड. प्रतिक्षा बहिरशेट, कल्पना माने, शशीकला पाटील, रोहिनी आफळे, सविता कर्णिक, रेशमा भोरके, अमिता कुलकर्णी, पत्रकार सुरेखा पवार, सुनिता कांबळे, अनुराधा कदम, श्रध्दा जोगळेकर, सार्या कुलकर्णी, अहिल्या परकाळे, पूनम देशमुख, स्नेहा मांगूरकर, दुर्वा दळवी, सायली पाटील आदीं महिलांचा समावेश होता