जयंती नाल्यामध्ये मगरीचे दर्शन नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या तीन-चार महिन्यांपासून प्रयाग चिखली ते पंचगंगा नदी आदी भागात मगर असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले होते ही मगर चिखली येथे नागरिकांना दिसली होती अनेक शर्थीचे प्रयत्न करून वनविभागाने ही मगर पकडून सोडून दिली होती मात्र आज पुन्हा पंचगंगा स्मशानभूमी मागील जयंती नाल्याच्या काठावर सहा फूट लांबीची मगर गवत काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना दिसून आली तिचे पिल्लूही दिसून आले. या ठिकाणी आज सकाळीच त्या मगरीचे दर्शन झाल्याने आता ही मगर नागरी वस्ती पर्यंत पोहोचली की काय अशी नागरिकांच्या मनामध्ये भीती पसरली आहे. दरम्यान नागरिकांच्या आवाजाने ही मगर पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये गेली आहे.