Wednesday, January 15, 2025
Home ताज्या कोल्हापुरमध्ये गुरुवारी दुर्ग परिषद,राज्यातील ३५० गडांबाबत चर्चा, २२५ संस्थांचे पदाधिकारी राहणार उपस्थित

कोल्हापुरमध्ये गुरुवारी दुर्ग परिषद,राज्यातील ३५० गडांबाबत चर्चा, २२५ संस्थांचे पदाधिकारी राहणार उपस्थित

कोल्हापुरमध्ये गुरुवारी दुर्ग परिषद,राज्यातील ३५० गडांबाबत चर्चा, २२५ संस्थांचे पदाधिकारी राहणार उपस्थित

कोल्हापूर/प्रतिनिधी :अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत राज्यभरातील ३५० हून अधिक किल्ल्यांबाबत चर्चा करण्यात येणार असून यामध्ये दुर्ग संवर्धनाशी निगडित २२५ संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती संयोजन समितीचे सुखदेव गिरी यांनी दिली.; यावेळी फत्तेसिंह सावंत, राम यादव, हेमंत साळोखे, संजय पवार, विनायक फाळके, धनंजय जाधव, योगेश केदार उपस्थित होते.
समितीच्या वतीने दोन वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर घेतलेल्या दुर्ग परिषदेत पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि वनविभागासह दुर्ग संवर्धन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषेदनंतर राज्यात दुर्ग संवर्धनाच्या चळवळीला वेग आला होता. किल्ले रायगडनंतर होणाऱ्या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांबाबतची माहिती आदींबाबत उहापोह होणार आहे. दुर्ग संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय होणार असून खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत महत्त्वाचे ठरावही केले जाणार आहेत. शहराजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
दुर्ग परिषदेदरम्यान संयोगीताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून राज्यातील विविध प्रकारच्या जलदुर्ग, भुईकोट किल्ले, वनदुर्ग यांची माहिती एकत्रित करून ती मोबाईल ॲपद्वारे डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. त्यासाठी उपस्थित प्रत्येक दुर्ग अभ्यासकांकडून माहिती गोळा केली जाणार असल्याचेही समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments