शहरातील तीन विनापरवाना सुरु असलेली यात्रीनिवास व एक दुकान सील
कोल्हापूर/प्रतिनिधी : परवाना विभागामार्फत शहरातील विनापरवाना व्यवसायीक, थकबाकीदार परवानाधारक यांचेवर कारवाई करण्यात येत आहे. दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी ताराबाई रोड, महाद्वार रोड या ठिकाणी असणारे कपिलेस्वर यात्री निवास, शिवम यात्री निवास व अंबाबाई यात्री निवास असे ३ विनापरवाना यात्री निवास सील करण्यात आले. तसेच मार्केटयार्ड समोरील सहारा बॅटरी हे दुकान विनापरवाना व्यवसाय करत असल्याने सील करण्यात आलेे. त्याचबरोबर परवाना नुतनीकरण न केलेले व्यवसायीक ठिकाणी ३० व्यवसायीकांकडून थकबाकी वसूल करण्यात आली.
सदरची कारवाई उप-आयुक्त क्रं. ३ शिल्पा दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली, परवाना अधिक्षक राम काटकर, परवाना निरीक्षक संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रवि पोवार व विजय वाघेला, यांनी केली. यापुढेही सदरची कारवाई सुरु राहणार असून संबंधित व्यवसायिकांनी त्वरीत परवाना विभाग, शिवाजी मार्केट याठिकाणी संपर्क साधून आपला परवाना नुतनीकरण करुन घ्यावा. तसेच थकबाकी व नवीन परवानेधारक यांनी आपला परवाना काढून घ्यावा अन्यता कारवाई केली जाईल असे आवाहन परवाना विभागामार्फत करण्यात आले आहे.