Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याकेआयटीत 'प्रयोगशाळा सहाय्यकांची राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळा' संपन्न

केआयटीत ‘प्रयोगशाळा सहाय्यकांची राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळा’ संपन्न

केआयटीत ‘प्रयोगशाळा सहाय्यकांची राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळा’ संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्यावतीने दोन दिवसांची लॅब असिस्टंट साठी ची ऑनलाईन राज्यस्तरीय कार्यशाळा दिनांक २८.२९ जानेवारी २०२१ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली.बदलत्या काळामध्ये महाविद्यालयातील लॅब या आधुनिक होत आहेत.लॅब आधुनिक होत असताना अशा लॅबच्या सहाय्यकांच्या कौशल्यात ही वाढ होणे क्रमप्राप्त आहे. नवनवीन मशिनरी, नवीन सॉफ्टवेअर,आधुनिक तंत्रज्ञान यांचा अंतर्भाव असणाऱ्या या शैक्षणिक पद्धतीत लॅब असिस्टंट चे महत्व मोठे आहे. सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तसेच शास्त्र व अन्य विद्याशाखां मध्ये सुद्धा प्रयोगशाळा / लॅब चे असणे अपरिहार्य आहे.जिथे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळतो.अशा ठिकाणच्या लॅब असिस्टंट चे कौशल्य विकसित होणे हे शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या हेतूने महत्त्वाचे आहे. हा हेतू समोर ठेवून केआयटी मेकॅनिकल विभागाच्यावतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .दोन दिवसीय या कार्यशाळेमध्ये व्हर्चुअल लॅब, लॅब सेफ्टी, डिजिटल साक्षरता,संवाद कौशल्य,टीम बिल्डींग व संघ व्यवस्थापन अशा विविध विषयांबाबत अनुक्रमे प्रा शिवानी काळे, प्रा अमित वैद्य, प्राभूषण कांबळे, प्रानिवास पाटील, डॉ.प्रविण जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.५ जिल्ह्यातील १० महाविद्यालयातील १५० लॅब असिस्टंट या उपक्रमात सहभागी झाले होते.
मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर यांचे मार्गदर्शन या उपक्रमास मिळाले.संस्थेचे संचालक डॉ.व्ही.व्ही.कार्जींन्नी यांनी या कार्यक्रमाच्या कल्पनेला प्रोत्साहन दिले.संस्थेचे अध्यक्ष श्री.भारत पाटील ,उपाध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी ,सचिव श्री.दीपक चौगुले व अन्य विश्वस्त यांनी अशा कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मार्गदर्शन केले.या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.संदीप कडणे, प्रा.अजय मधाळे, प्रा.नितीन देसाई व प्रा.रोहित घुळानावर यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments