Wednesday, January 15, 2025
Home ताज्या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरमध्ये होणार

डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरमध्ये होणार

डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी ७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरमध्ये होणार

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित ‘प्रतिभा २०२१’ या डॉक्टरांच्या राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी ७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब शिर्के व मानद सचिव डॉ. गीता पिल्लई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.२०१९ साली नांदेड येथे संपन्न झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुढील स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात येईल असे कोल्हापूर झोनचे प्रमुख डॉ.राजेंद्र वायचळ यांनी जाहीर केले होते.
मुंबई,पुणे,कोल्हापूर,जळगाव, औरंगाबाद आणि नागपूर अशा सहा विभागांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. राजेंद्र वायचळ म्हणाले “दर दोन वर्षांनी ही गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेची उपांत्य फेरी पूर्ण झाली असून या उपांत्य फेरीमध्ये ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. उपांत्य फेरीमध्ये संपूर्णतः पारदर्शकता ठेवून झूम ॲपवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. आता या स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात घेण्याचा मान कोल्हापूर मेडिकल असोसिएशनला मिळालेला आहे.
कोल्हापूर झोनमध्ये सांगली, मिरज,सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.या स्पर्धेसाठी ३४ स्पर्धकांचा सहभाग असून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे प्रायोजकत्व मिळाले आहे.
१९९८ साली कांदिवली मेडिकल असोसिएशनच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मुंबईचे डॉ.विठ्ठल बेल्लुबी आणि सौ.विदुला बेल्लुबी यांनी डॉक्टरांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘प्रतिभा’ या नावाने डॉक्टरांना सांगीतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
१९९८ साली या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार खैय्याम यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर रवींद्र जैन, यशवंत देव, अजय-अतुल, पद्मजा फेनाणी यांच्यासह अनेक दिग्गजांनी या स्पर्धेचे परीक्षण केलेले आहे. त्यानंतर याचे आयोजन अखंडितपणे सुरू असून २०२१ हे वर्ष स्पर्धेचे २३ वे वर्ष आहे. उपशास्त्रीय, सुगम संगीत आणि द्वंद्वगीत या प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्रातील सर्व झोनमधील डॉक्टर सदस्यांचा या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेची व्याप्ती आता वाढलेली आहे,तसेच कानसेन पुरस्कार या अनोख्या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धेतील गाणी ऐकून निकाल परीक्षकांच्या निकालाशी साम्य असेल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.कार्यक्रम विनामूल्य असून पहिल्या शंभर रसिकांना या स्पर्धेत भाग घेता येईल, असेही डॉ.राजेंद्र वायचळ यांनी सांगितले.
डॉक्टरांना चोवीस तास रुग्ण सेवा करावी लागते. त्यामुळे रोजच्या धावपळीच्या जीवनात या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना विसावा मिळेल.व डॉक्टरांमधील कला, प्रतिभा यांची ओळख होत आहे.
कोल्हापुरात होणाऱ्या डॉक्टरांच्या या बहारदार सांगीतिक अंतिम सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे आर्ट सर्कलचे समनव्यक डॉ.पी.एम. चौगुले यांनी केले. पत्रकार परिषदेला सचिव डॉ. गीता पिल्लई, उपाध्यक्षा डॉ.आशा जाधव,डॉ.संजय घोटणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments