Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यासहाय्यक फौजदार हजारे यांच्यासह चार कॉन्स्टेबल यांच्या चौकशीचे आदेश

सहाय्यक फौजदार हजारे यांच्यासह चार कॉन्स्टेबल यांच्या चौकशीचे आदेश

सहाय्यक फौजदार हजारे यांच्यासह चार कॉन्स्टेबल यांच्या चौकशीचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : उचगाव (ता. करवीर) येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सतीश माळगे यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिले.सहाय्यक फौजदार रावसाहेब हजारे पोलीस कॉन्स्टेबल विशाल खराडे, पोलीस नाईक मांडवकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांची चौकशी करून मार्चपर्यंत अहवाल सादर करावा असे आदेश करण्यात आले. २०१७ ला कणेरी वाडी फाटा येथे पोलिसांनी गाडी अडवून माळगे यांना मारहाण केली होती. पाचशे रुपयांची मागणी करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. याबद्दल माळगे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. माळगे यांचा विचार करून या पोलिसांची चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयात दाद मागितल्यानंतर दाद मगितल्यानंतर न्याय मिळू शकतो त्यामुळे ज्याच्या बाबतीत अशा घटना घडतील त्यांनी न्यायालयात दाद मागावी असेही माळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments