Friday, January 3, 2025
Home ताज्या भारत सरकारच्या वतीने पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार

भारत सरकारच्या वतीने पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार

भारत सरकारच्या वतीने पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारत सरकारच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या महोत्सवाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलीयमचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत दिली.
भारत सरकारच्या वतीने ऊर्जा सुरक्षा,शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी संरक्षण क्षमता महोत्सव हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत जीवाष्म इंधनावरील व्यर्थ खर्चाला आळा घालणे, परकीय तिजोरीवरील वाढत ओझं कमी करणे आणि इंधनाच्या ज्वलनामुळे निर्माण झालेल्या हरितगृह वायूच्या प्रतिकूल परिणामा पासून पर्यावरणाचे रक्षण करणे हे या कार्यक्रमाचे अंतिम लक्ष आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यावरण आणि इंधनाचा अपव्यय या विषयावर स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत यामधून लोकांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे तसेच कार्यशाळांच्या माध्यमातून इंधन संवर्धनावरील मोहिमा विषयी सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेऊन चर्चा घडवून आणण्याचा देखील मानस असल्याचे
मनोज गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील जवळपास तीनशे आठ पेट्रोल पंपामध्ये त्या दृष्टीने जनजागृती करणारे फलक उभारण्यात येणार आहेत.पेट्रोल पंपावर स्वछता तसेच पर्यावरण पूरक उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत.
कोल्हापूर शहरात या कार्यक्रमांतर्गत ३१ जानेवारी रोजी पोलीस ग्राउंड येथून सकाळी सायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येणार आहे तर भारत सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहनही भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कोल्हापूर विभागातील सहाय्यक व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी यावेळी केले आहे. या पत्रकार बैठकीला इंडियन ऑईल कार्पोरेशन सहाय्यक व्यवस्थापक चंद्रभान नंदनकर, हिंदुस्तान पेट्रोलियमचे हर्षद कुंभार,स्मित कोठारी, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल कोल्हापूर/प्रतिनिधी : मसाई पठार जवळ कोरगावकर ग्रुप कडून उभा करण्यात आलेल्या *आचला फार्म हाऊस* पर्यटकांचा सेवेत दाखल...

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

Recent Comments