कोल्हापूर पक्षी गणनेचा भाग २ रविवारी सकाळी राजाराम तलाव येथे पार पडला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर पक्षी गणनेचा भाग २ रविवारी सकाळी राजाराम तलाव येथे पार पडला. या पक्षी गणनेत ६७ प्रजातींचे ८३६ पक्षी नोंदवण्यात आले. तसेच IUCN ने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेले रिव्हर टर्न (नदी सुरय) हे पक्षी सुद्धा यामध्ये नोंदवले गेले. यातील १४ स्थलांतरित पक्षांमध्ये कॉमन सॅन्डपायपर (सामान्य तुतारी), ग्रीन सॅन्डपायपर(हिरवा तुतारी), वूड सॅन्डपायपर (ठिपकेवाला तुतारी), कॉमन ग्रीनशांक (सामान्य हिरवा टीलवा), क्लॅमरस रीड वोब्लर (दंगेखोर बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वोब्लर (ब्लिथचा बोरु वटवट्या), पॅडीफील्ड वोब्लर (धान वाटवट्या) , बुटेड वोब्लर (पायमोज वटवट्या) , रोजि स्टारलिंग (गुलाबी मैना), टायगा फ्लायकेचर ( लाल कंठाची माशीमार), ब्राउन श्राइक (तपकिरी खाटिक), ब्लिथस पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), येल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) नोंदवले गेले. राजाराम तलावावर ही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या पक्षी गणनेमध्ये ६३ प्रजातींचे ४५४ पक्षी नोंदवले गेले होते. कोल्हापूर पक्षी गणनेस ज्येष्ठ पक्षी मित्र दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेचे आयोजन प्रणव देसाई व सत्पाल गंगलमाले यांनी केले तर अभिषेक शिर्के, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे यांनी कार्यपूर्ती केली. कोल्हापूर पक्षी गणनेचा तिसरा भाग शिवाजी विद्यापीठ येथे १७ जानेवारी रोजी सकाळी ६:४५ वाजता होणार आहे. सदर पक्षी गणनेत भाग घेण्यासाठी बर्डस ऑफ कोल्हापूर च्या फेसबुक ग्रुपमध्ये सहभागी व्हा.अधिक माहितीसाठी संपर्क
प्रणव देसाई : ९८३४८७९६०५
सत्पाल गंगलमाले : ९९२१७८५५६३
अभिषेक शिर्के : ८१८००९६६८६
पृथ्वीराज सरनोबत : ९३२५०९५४५४