Sunday, December 22, 2024
Home ताज्या जेष्ट पत्रकार काका कुर्लेकर यांचा मुलगा  आशिष महेश कुर्लेकर याचा दुचाकी अपघातात ...

जेष्ट पत्रकार काका कुर्लेकर यांचा मुलगा  आशिष महेश कुर्लेकर याचा दुचाकी अपघातात  मृत्यू

जेष्ट पत्रकार काका कुर्लेकर यांचा मुलगा  आशिष महेश कुर्लेकर याचा दुचाकी अपघातात  मृत्यू

कोल्हापूर/प्रतिनिधी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. आज सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाहूवाडी तालुक्यातील केरली गावानजीक ही घटना घडली. आशिष महेश कुर्लेकर (वय ३८, रा. केवीज पार्क, नागाळा पार्क) असे या तरुणाचे नाव आहे.कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार महेश उर्फ काका कुर्लेकर यांचे ते पुत्र होते.
आशिष त्यांच्या व्यावसायिक कामानिमित्त मित्र मिलिंद भोसले यांच्यासोबत दुचाकीवरून रत्नागिरीला गेले होते. सायंकाळी कोल्हापूरला परतत असताना दुचाकी खड्ड्यांमध्ये गेल्याने त्यांचा अपघात झाला. पाठीमागे बसलेल्या आशिष यांना हादरा बसला व ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगा आहे.

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments