“पार्थिव एक्सप्रेस” या दुसऱ्या दालनाचे इचलकरंजीत उदघाटन,लघु व मध्यम उद्योजकांना याद्वारे फायदा होणार
कोल्हापूर/इचलकरंजी/प्रतिनिधी : श्री स्वप्नील काबरा यांच्या आशीर्वादाने पार्थिव ग्रुप ने त्यांचे “पार्थिव एक्सप्रेस” या दुसऱ्या दालनाचे उदघाटन श्री सचिन झंवर, संचालक, कल्लप्पान्ना आवाडे इचलकरंजी सहकारी बँक लि. आणि श्री जितू भाई शहा,अध्यक्ष, जे.के. ग्रूप, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते इचलकरंजी येथे करण्यात आले
या प्रसंगी कंपनी चे सुविद्य मार्गदर्शक श्री जमनालाल काबरा व श्री गोपाल भुतडा यांनी पुढील कंपनी चे ध्येय व प्रवास या बाबत सांगितले, तसेच या वेळी कंपनीचे संचालक राकेश राठी, आशिष मंडोवरा , सुमित रांका हे उपस्थित होते.
“पार्थिव एक्सप्रेस” ची सुरुवात ही लघु व मध्यम उद्योजकांना सर्व सुविधा उदा. इन्शुरन्स , कर व कायदेविषयक सल्ला, कर्जे व तत्सम सुविधा, मुल्यांकन, अकौंटिंग व सर्व आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने सुरू केली गेली आहे.याचे मुख्य कार्यालय मुंबई बोरिवली येथे आहे तर याची पहिली शाखा ही पुण्यात आहे आणि आता दुसरी शाखा ही इचलकरंजी येथील मदनलाल भोरा मार्केट येथे सुरू करण्यात आली आहे.
श्री केशव भरडीया, ब्रँच हेड, इचलकरंजी यांनी ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांविषयी माहीती दिली व त्यांनी सांगितले की फक्त ७ दिवसांमध्ये कंपनी ने दुसरी शाखा उघडली आहे व कंपनी येत्या वर्षात १०० शाखा उघडण्याचे ध्येय बाळगून आहे.पार्थिव एक्सप्रेस हे एक मॉल सारखे आहे ज्यामध्ये एकदा ग्राहक आले की त्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत व मार्गदर्शन केले जाणार आहे.