Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याअकराव्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त  शनिवारी रक्‍तदान शिबीर, व्‍याख्‍यान कार्यक्रमाचे आयोजन.

अकराव्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त  शनिवारी रक्‍तदान शिबीर, व्‍याख्‍यान कार्यक्रमाचे आयोजन.

कै. जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या अकराव्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त
 शनिवारी रक्‍तदान शिबीर, व्‍याख्‍यान कार्यक्रमाचे आयोजन….

कोल्‍हापूरः ता.१७  शिरोली दु. ता. करवीर येथील गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री. विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या आकराव्‍या स्‍मृतिदिनानिमीत्‍त शनिवारी दि.१९/१२/२०२० इ. रोजी रक्‍तदान शिबीर व व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
रक्‍तदान हे श्रेष्‍ठदान ही संकल्‍पना घेवून गेली १० वर्षे रक्‍तदान शिबीर घेणेत येत आहे. यावर्षी शिबीराचे आकरावे वर्ष असून, शनिवारी दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ०९.०० वाजता रक्‍तदान शिबीरास प्रारंभ होणार आहे.
कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेचा एकत्र येवून मुकाबला केल्‍यानंतर आता येऊ पाहणा-या कोरोनाच्‍या संभाव्‍य दुस-या लाटेसंदर्भात जागृती करण्‍यासाठी म्‍हणून अॅस्‍टर आधार हॉस्‍पीटलचे डॉ. अजय केणी  यांचे कोरोनाच्‍या दुस-या लाटेमध्ये घ्‍यावयाची काळजी  या विषयावर मार्गदर्शन व्‍याख्‍यान आयोजीत केले आहे. हे व्‍याख्‍यान शनिवारी सायंकाळी ०६.०० वाजता श्री.बलभिम विकास सेवा संस्‍थेच्‍या प्रांगणात होणार असून कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे तसेच या रक्‍तदान शिबीरास तरूणांनी पुढाकार घेऊन रक्‍तदान करावे. असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री.विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) व विश्‍वास नारायण पाटील फौंडेशनच्‍या वतीने करण्‍यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments