Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याकरवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाचे काम दोन महिन्यात पूर्ण होऊन...

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाचे काम दोन महिन्यात पूर्ण होऊन स्ट्रक्चरल ऑडिटही होणार

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाचे काम दोन महिन्यात पूर्ण होऊन स्ट्रक्चरल ऑडिटही होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : .करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणकर्णिका कुंडाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. तर मंदिर बांधल्यापासून या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मंदिरात होत असलेली गळती काढण्यात येणार आहे. तर गरुड मंडपाचेही नुतनिकरण पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार करून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.                    करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील घाटी दरवाजा लागत असलेला मणकर्णिका कुंड खुला करून त्याला मूळ स्वरूप आणण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. शिवाय मणकर्णी का बाहेर असणारी दुकाने की सात फूट पुढे घेतली जाणार आहेत मनकर्णिका चे काम उत्खनन करत असताना या ठिकाणी दगड पायऱ्या मंदिरासारखे भाग दिसत आहेत असे सांगून जानेवारीमध्ये दर्शन मंडपाची सात कोटींची कामे केली जाणार आहेत त्यामध्ये ड्रेनेज लाईन, दीपमाळ, काळभैरव मंदिराचे काम याचा समावेश आहे त्याचबरोबर मंदिर बांधल्यापासून आजपर्यंत या मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. हे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे काम सुरू आहे. शेकडो वर्षापुर्वीच्या अंबाबाई मंदिराचे बांधकाम प्रत्येक शतकात होत गेले. त्रिकुट पद्धतीच्या या मंदिराच्या नुतनिकरणामुळे वेळोवेळी शिखरालगत बांधकामाचे थर जमत गेलेत, काही ठिकाणी तर उगवलेल्या झाडांची मुळेही थरामध्ये रुतलेली आहेत. कालांतराने हे थर दिड मिटर इतके मोठे होऊन आता ते धोकादायक बनले आहेत. मंदिराच्या बांधकामाला धोका पोहोचू नये यासाठी याचा अभ्यास करून ते काढण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. त्याचबरोबर अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे नुतनीकरणही करण्यात येणार आहे. हे नुतनीकरण करत असताना पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार नुतनीकरण करून सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान समितीने गेल्या साडेतीन वर्षात केलेल्या विविध कामांची माहिती महेश जाधव यांनी दिली. यामध्ये मनकर्णिका कुंड, रामाचा पार बांधकाम पुर्णत्वाला आले असून जोतिबावरील दर्शन मंडप, नृसिंंहवाडी इथले भक्त निवास, या कामांनाही गती देत असल्याचे स्पष्ट केले. तर समितीकडून ६५० मंदिरांचा आणि १ हजार हेक्टर जमिनीचा सर्वे पुर्ण करण्यात आल्याचेही सांगितले व हा सर्व्ह करत असताना अनेक गोष्टी समोर येत असल्याचेही जाधव यांनी सांगितले. या सर्वे मधून देवस्थान समितीच्या जमिनीची स्थिती काय आहे हे पहावयास मिळणार आहे त्यातील काही जमिनी शेतकरी कसत आहेत त्यातील अर्धी रक्कम देवस्थान समितीला मिळणार आहेत यामुळे देवस्थान समितीच्या खजिन्यात वाढ होणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले त्याचबरोबर अंबाबाईच्या दागिन्यांचे मूल्यांकनाचे काम सुरू आहे ते दोन-तीन दिवसात पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी जाधव,राजू जाधव,आमरजा निबाळकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments