Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeग्लोबलगोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना

गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापना

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयात यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या शुभहस्ते श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना पार पडली. प्रतिष्ठापनेनंतर पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व आरती करून श्रींचे आशीर्वाद घेतले गेले.
यावेळी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, कर्मचारी, अधिकारी व संघाचे हितचिंतक यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, गोकुळ परिवारातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. उत्सवाच्या माध्यमातून संघातील सदस्यांमध्ये एकता, स्नेह व उत्साह निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
गोकुळ संघाच्या कार्यालयात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही पुढे चालू राहणार असून, ही प्रतिष्ठापना संघाच्या सर्व सदस्यांसाठी श्रद्धा आणि प्रेरणादायी ठरणार आहे. यावेळी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, तसेच अशोक पाटील, बाजीराव पाटील, विनोद वानखेडे , सुभाष नाळे, बाळासो वायदंडे, कृष्णात पाटील, प्रथमेश पाटील, नितीन तोडकर, राहुल थोरवडे तसेच गणेशोत्सव समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments