वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचा उपक्रम*— अस्थिरोग रुग्णांची दररोज पहिल्या १० रुग्णांची फक्त ₹१०० मध्ये तपासणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य आणि सेवा देणाऱ्या *वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलने अस्थिरोग रुग्णांसाठी* एक विशेष आणि उपयुक्त योजना सुरू केली आहे. आता दररोज पहिल्या १० अस्थिरोग रुग्णांची तपासणी केवळ ₹१०० मध्ये केली जाणार आहे*. ही सेवा सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रुग्णांसाठी उपलब्ध असेल.अस्थिरोग म्हणजे हाडे, सांधे, मणका आणि स्नायू यांचे विकार. विशेषतः वृद्ध, अपघातग्रस्त, तसेच कामामुळे होणारे सांधेदुखीचे त्रास या विभागांत मोडतात. अनेक वेळा खर्चिक तपासणीमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण वेळेवर उपचार घेत नाहीत. ही गरज लक्षात घेऊन हॉस्पिटलने ही सवलतीची सेवा सुरू केली आहे.या सेवेमुळे गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य निदान आणि मार्गदर्शन मिळणार आहे. या तपासणीत प्राथमिक तपासणी, सल्ला, औषधांचा आराखडा आणि आवश्यक असल्यास पुढील उपचारांची माहिती दिली जाईल. एक्स रे फक्त रु ३००/- मध्ये काढला जाणार आहे रुग्णांनी वेळेत हॉस्पिटलमध्ये येऊन नावनोंदणी करावी, कारण ही सुविधा दररोज केवळ पहिल्या १० रुग्णांसाठीच आहे.ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हाडांच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात यामध्ये कोणतेही छुपे शुल्क आकारले जात नाही..वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचा हा उपक्रम ग्रामीण व शहरी आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून खरोखरच स्तुत्य आहे*. अधिकाधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन *महालक्ष्मी हेल्थ फौंडेशनचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी केले आहे.