Thursday, August 7, 2025
spot_img
Homeताज्यादसऱ्यापर्यंत शहरातील कचरा उठाव, इको फ्रेंडली स्वच्छतागृह आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न...

दसऱ्यापर्यंत शहरातील कचरा उठाव, इको फ्रेंडली स्वच्छतागृह आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महिला काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रशसकाना घेराव

दसऱ्यापर्यंत शहरातील कचरा उठाव, इको फ्रेंडली स्वच्छतागृह आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महिला काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रशसकाना घेराव घालू : माजी नगरसेविका भारती पोवार

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा थेट पाईपलाईनचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी २००९ पासून सर्व प्रयत्न करून मार्गी लावला आणि ही योजना मार्गी लावली. मात्र काही लोक या योजनेला गळकी योजना म्हणून हिणवत आहेत ही बाब हास्यास्पद
आहे असा टोला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव माजी नगरसेविका भारती पोवार यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे.
दसऱ्यापर्यंत शहरातील कचरा उठाव, इको फ्रेंडली स्वच्छतागृह आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महिला काँग्रेसच्या वतीन
महापालिका प्रशसकाना घेराव घालू
असा इशारा देखील यावेळी पोवार यांनी दिला आहे.
कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी २००९ पासून सातत्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. सर्व सर्व नियम अटी आणि कागदपत्रांची पूर्तता तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीतून करून २०१२ मध्ये या योजनेचा ११४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग केला.
थेट पाईप लाईन योजनेचे पाणी काळमवाडी पासून पुईखडी इथल्या वितरण व्यवस्थे पर्यंत व्यवस्थित पोहच करणे ही जबाबदारी होती
ती आमदार सतेज पाटील यांनी
जबाबदारी पूर्ण केली आहे.शहरातील
पाण्याची अंतर्गत वितरण व्यवस्था सुरळीत करणे ही जबाबदारी महापालिका प्रशासनाची होती मात्र
महापालिका ती व्यवस्थित करत नाही आहे. सध्या ही योजना कार्यान्वित झाली आहे.मात्र पालिका प्रशासनाकडून पाणी वितरण व्यवस्था व्यवस्थित होत नसल्यामुळे वारंवार विरोधकांकडून थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय सतेज पाटलांना मिळू नये यासाठी केवळ गळकी योजना म्हणून हिणवले जात आहे ही हास्यास्पद बाब आहे असा टोला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे सचिव माजी नगरसेविका भारती पवार यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या
कोल्हापूरला गेली जवळपास १० ते १५ वर्ष महिला महापौर आणि महिला प्रशासक असून देखील शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
यावेळी शहरातील निर्भीजीकरण करण्यात यावे, संपूर्ण कोल्हापूर शहरात बस स्थानक बाजारपेठा गर्दीची ठिकाणी या ठिकाणी इको फ्रेंडली स्वच्छतागृहांची निर्मिती करावी, शहरातील कचरा उठाव वेळेत करण्यात येऊन करण्यात यावा आणि शहरातील रस्ते सुरळीत करण्यात यावेत. येणाऱ्या विजयादशमी दसऱ्या पर्यंत शहरातील प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लागले नाहीत तर महिला काँग्रेसच्या वतीने महापालिका प्रशासकांना घेराव घालू असा इशारा देखील त्यांनी यावेळी पत्रकार बैठकीत दिला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शहरात रस्ते कामासाठी १०८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पोस्टर्स लागली आहेत पण शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय अशी आहे.जर महापालिका प्रशासनाला निधी उपलब्ध झाला असेल तर प्रशासनाने तसा खुलासा करावा आणि निधी उपलब्ध झाला नसेल तर विनाकारण पोस्टरबाजी करणाऱ्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी देखील
भारती पोवार यांनी या पत्रकार बैठकीत केली आहे.या पत्रकार बैठकीला सरलाताई पाटील, संध्या घोटणे, माजी नगरसेविका वनिता देठे, उज्वला चौगले, वैशाली महाडिक, वैशाली जाधव, अलका सनगर मंगल खुडे ,पूजा आरडे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments