विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतकर्यांचे योगदान महत्वपूर्ण
खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरूवात
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेती देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, मोदी सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी अनेक योजना आणत आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करायचा आहे. त्यासाठी शेतीमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या विकसित कृषि संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.
कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथे विकसित कृषि संकल्प अभियानाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते. पूर्वी शासनाच्या योजना पंचतारांकीत हॉटेलमध्ये जाहीर व्हायच्या आणि ५-१० वर्ष उलटली तरी, खर्या लाभार्थ्यांना योजनेबद्दल माहितीच असायची नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळया राज्यात जाऊन, जनतेच्या समोर सरकारच्या योजना सुरू करतात. त्यामुळे लोकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळते, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. कोणत्या जमिनीत कोणत्या वातावरणात कुठले पिक घेता येईल, याबद्दलची माहिती या अभियानातून मिळणार आहे. तसेच शेतकर्यांच्या शंका आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होईल. परिणामी शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी बोलून दाखवला. आजही भारत देश कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. उत्पादन वाढीसाठी शासनाने आणलेल्या योजना आणि नवतंत्रज्ञान याचा शेतकर्यांनी वापर करावा, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. पुढील १५ दिवसांत २० हजार शास्त्रज्ञ, देशभरातील शेतकर्यांना भेटणार आहेत. कोल्हापूर जिल्हयातील ६ तालुक्यातील ९० गावात हे अभियान राबवणार असल्याचे डॉ.रविंद्र सिंह यांनी सांगितले. यावेळी आत्माच्या रक्षा शिंदे, डॉ.प्रशांत कवर, डॉ.विद्यासागर गोडाम, डॉ.राजेंद्र वावरे, तालुका कृषि अधिकारी शेखर थोरात, के.बी.वाडकर, डॉ. पुष्पनाथ चौगुले यांनी मनोगतं व्यक्त केली. तसेच शेतकर्यांच्या कृषी विषयक शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाला धनराज घाटगे, ऍड. अमर पाटील, सरपंच दिजीप कडवे, डॉ.नरेंद्र गजभिये, डॉ.राहूल यादव, एम.टी.पोवार, सुरेश मर्दाने, संजय वाडकर, दिपक हातकर, डॉ. पांडूरंग काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.