Tuesday, March 25, 2025
spot_img
Homeग्लोबलविन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती

विन्सच्या सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांची माहिती

कोल्हापूर / प्रतिनिधी: गेली ६५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि अखंडितपणे रुग्णसेवा देणारे विन्स हॉस्पिटल आता अधिक सुसज्ज आणि विस्तारित मल्टीस्पेशालिटी सुविधांसह तयार आहे. या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सोहळा येत्या गुरुवारी, ६ मार्च २०२५ रोजी, सायंकाळी ४:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
या नव्या इमारतीत २२० सर्व सोयींनीयुक्त बेड्स असलेले अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. येथे आंतररुग्ण चिकित्सा,क्रिटिकल केअर, अॅडव्हान्स अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर, इमर्जन्सी मेडिसिन ट्रामा, हृदयरोग आणि हृदयरोग शस्त्रक्रिया, त्वचारोग, प्लास्टिक, एस्थेटिक आणि पुनर्रचना शस्त्रक्रिया,एन्डोस्कोपिक स्पाइन सर्जरी, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, किडनी विकार, मूत्र विकार, प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, ऑर्थोपेडिक्स, बालरोग, कॅन्सरसह जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अशा विविध विभागांसह तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असणार आहे. एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणारे हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. अशी माहिती विन्स हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू आणि डॉ. सुजाता प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या रुग्णालयाचे व्यवस्थापन डॉ.व्यकंट होळसंबरे (ग्रुप सीईओ), श्री. संदीप वनमाळी (सीईओ) आणि त्यांच्या टीमकडे सोपवण्यात आले आहे. या टीमला भारतातील प्रसिद्ध कॉर्पोरेट रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचा सुमारे २६ वर्षांचा अनुभव आहे.
डॉ.प्रभू पुढे म्हणाले , ६ मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आ. अमल महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. अशोकराव माने, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. विनय कोरे, आ. चंद्रदीप नरके, आ. राहुल आवाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कोल्हापूरात उभारण्यात आलेल्या या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी, निदान आणि अत्याधुनिक उपचारांसह एआय टेलिमेडिसीन व भविष्यकाळात रोबोटिक शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपन शस्त्रक्रिया यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विन्स हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात हे एक पुढचे पाऊल उचलले असून, पश्चिम महाराष्ष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
पत्रकार परिषदेस न्यूरोसर्जन डॉ. आकाश प्रभू, डॉ. डीओना प्रभू,डॉ. संदीप पाटील, व्यंकट होळसंबे, संदीप वनमाळी, चिन्मय ठक्कर, दामोदर घोलकर ,आदी उपस्थित होते.

Previous article
Next article
जीवनात सेवा करण्याची संधी सोडू नका : डॉ. बी एम हिर्डेकर डी. वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या विद्यार्थ्यांचे निगवे खालसा येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सामजिक जाणीवा समृद्ध होतील. या माध्यमातून आपल्याला सेवा भावाची शिकवण मिळत असून आपली जडण घडण ज्या समाजात होते त्या समाजाची सेवा करण्याची संधी कधीही सोडू नका, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी एम हिर्डेकर यानी केले. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या विद्यार्थ्यांचे निवासी श्रम संस्कार शिबीर निगवे खालसा (ता. करवीर) येथे संपत्र झाले. या शिबिराच्या समारोपावेळी डॉ. हिर्डेकर यानी सेवेचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर व एनएसएस विभाग प्रमुख रुबेन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निगवे खालसा गावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, योग प्रात्यक्षिके, प्रबोधनात्मक व्याख्याने आदी उपक्रम पार पडले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक अद्वैत राठोड , प्राचार्य रुधीर बारदेसकर, सरपंच ज्योती दीपक कांबळे , उपसरपंच शिवाजी गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. खोत, बिद्री साखर कारखाना संचालक आर. एस. कांबळे व एस. आर. पाटील यांच्या उपस्थित या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिर कालावधीत गावामध्ये स्वछता अभियान, आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, प्रथमोपचार, पोषण आहार याबाबत मार्गदर्शन, डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, फ़िजिओथेरपि शिबीराचे आयोजन करण्यात आले. एनएसएस विद्यार्थ्यांनी महिलांसाठी पाककला, बेकरी पदार्थ प्रशिक्षण घेतले. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धाही घेण्यात आली. शिबीर काळात विविध प्रबोधनात्मक व्याख्याने, करियर संधी यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ युवराज मोटे यांनी भौगालिक पर्यावरणाचे बदलते स्वरूप, डॉ राम पवार यांचे व्यायाम योगाभ्यास व आत्म संरक्षण, डॉ सयाजीराव गायकवाड यांचे वाचन संस्कृती, अर्थ साक्षरता, डॉ. आर एस पाटील यांचे राष्ट्रीय सेवा उपक्रम महत्व या विषयी व्याख्यान झाले. प्राचार्य रुधीर बारदेस्कर, प्रा. रुबेन काळे, सुरज यादव, रोहन हवालदार, स्वप्नील सरदेसाई यांनी शिबिर यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव व्ही व्ही भोसले, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अद्वैत राठोड यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments