नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम : डॉ.संजय.डी. पाटील
महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या कॉसमॉस बँकेचा चेअरमन म्हणून मी दीर्घकाळ काम केले. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात रोज विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या तरूण उद्योजकांना मी व माझे सहकारी नेहमीच झुकते माप देत राहिलो मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय करावा व आपले आर्थिक साम्राज्य निर्माण करावे असे मला व माझ्या बँकेतील संचालक सहकाऱ्यांना नेहमीच वाटत राहिले.
याच काळात कोल्हापूरचे डॉ संजय डी पाटील हे तरूण उद्योजक भेटण्यासाठी आले.अतिशय शात स्वभाव व साधी राहणी, व्यवसाय वृष्टीसाठी मनात ठोस कल्पना आणि व्यवसायाबद्दल बारीकसारीक तपशील तोंडपाठ असणाऱ्या या तरूणाने स्वतःची ओळख करून दिली मला कोल्हापूरमध्ये ५ स्टार हॉटेल काढायचे आहे त्यासाठी बँकेने वित्तपुरवठा करावा, अशी विनती करून तसा प्रस्तावच या तरूणाने माझ्या समोर ठेवला.
कोल्हापूर शहर व परिसराबद्दल बारीकसारीक तपशील देत हा तरूण म्हणजे डॉ. संजय डी पाटील यांनी कोल्हापूरच्या भविष्यातील विकासाचा जणू ब्लूप्रिंटच माझ्या समोर मांडला. शिक्षणाचा प्रसार होऊन कोल्हापूरातही आयटी फार्मसी, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी आदी क्षेत्रासाठी उत्तम वर्कफोर्स उपलब्ध होईल आणि त्यामुळे कोल्हापूरातही देशी परदेशी गुंतवणूक वाढून कृषीप्रधान असणारे कोल्हापर उद्योगप्रधान होईल हा त्यांनी व्यक्त केलेला विश्वास तयांच्या आत्मविश्वासाबद्दल खात्री देत राहिला.
मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूरही उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आदींचे केंद्र बनेल आणि त्यासाठीच कोल्हापूरमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधायचा आहे या त्यांच्या प्रस्तावाला बँकेचा चेअरमन म्हणून मी अनुकूल प्रतिसाद दिला पाठोपाठ त्यांचा अर्ज, बॅलन्सशीट आदींचा अभ्यास करून बँकेने त्याच्या प्रस्तावास मान्यता दिली कॉसमॉस बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून वित्तपुरवठा होईल मात्र एक देखील हप्ता चुकता कामा नये या माझ्या वाक्यावर खळखळून हसत ते म्हणाले एकही हप्ता चुकणार नाही याची मी खात्री देतो आणि त्यांनी ते खरेही करून दाखवले.
कृषी क्षेत्रात रमणाऱ्या डॉ सजय डी पाटील यानी शिक्षणाचा अवाढव्य पसारा समर्थपणे साभाळला प्रत्येक जागी यश मिळवले कोल्हापूरमधील हॉटेल सयाजी हे पचतारांकित हॉटेल अतिशय देखण्या स्वरूपात उभे राहिले त्याच्या उद्द्घाटनपसगी झालेल्या कार्यक्रमासाठी त्यानी मला आवर्जून निमत्रण दिले. हे निमंत्रण देताना त्याच्यातील विनम्र वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली.
हॉटेल सयाजी च्या उद्घाटन कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचा चेअरमन म्हणून सहका-यासमवेत मी हॉटेलला गेलो हॉटेल सयाजी चे देखणे रूप पाहूनच हा प्रकल्प निश्चित यशस्वी होणर याची खात्री मला पटली आणि झालेही तसेच कोल्हापूरसारख्या शहराची पंचतारांकित हॉटेलची गरज वेळीच ओळखून डॉ संजय डी पाटील यानी कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आणि प्रत्येक महिन्यात हप्त्याच्या तारखेच्या आधीच हप्ता भरला जात राहिला बँकेने योग्य ठिकाणी वित्तपुरवठा केला याचे समाधान मनाला झाले आणि एक मराठी तरूण उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आहे याचा आनदही झाला.
वडिलाचा राजकीय वारसा लाभूनही व घरात पूर्ण राजकीय वातावरण असूनही स्वत राजकारणात न जाणाऱ्या डॉ सजय डी पाटील याना याबद्दल मी विचारले असताना सहजपणे ते म्हणाले मला शेतीची आवड आहे शेतीत मी खूप प्रयोग करतो याबरोबरच कोल्हापूर व पचक्रोशीत उत्तम शिक्षण सुविधा निर्माण करून हजारो तरूणाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी काम करण्याची देखील मला खूप आवड आहे. शेतील मी खूप प्रयोग करतो याबरोबरच कोल्हापूर व पंचक्रोशीत उत्तम शिक्षण सुविधा निर्माण करून हजारो तरूणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी काम करण्याची देखील मला खूप आवड आहे कृषी, शिक्षण आणि उद्योग ही तीन क्षेत्रच मी जीवनाची त्रिसूत्री मानली आहे आणि त्यात मी पूर्ण समाधानी आहे असे सागणाऱ्या डॉ सजय डी पाटील याच्या चेहऱ्यावर झळकणारे समाधान स्पष्टपणे दिसून येत होते हॉटेल सयाजीच्या निमित्ताने त्याचा कॉसमॉस बँकेशी संबंध आला व त्यांनी सधीचे सोने केले त्यामुळेच आता ते युवा पिढीचे रोल मॉडेल बनले आहेत नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉ संजय डी पाटील यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा त्याचे ज्ञान, सचोटी, दूरदृष्टी आणि तळमळ यांचा लाभ समाजाला सदैव मिळत राहो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
कृष्णकुमार गोयल माजी चेअरमन कॉसमॉस बँक लि. पुणे.