Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याप्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन

 

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्याव्दारे दि. 19 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती डाकघर कोल्हापूरचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इत्यादी.संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार ए.व्ही.इंगळे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर-416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दिनांक 11 जून 2024 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल, अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments