Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्यादेशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रचंड मतांनी विजयी करूया खासदार...

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रचंड मतांनी विजयी करूया खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा प्रचंड मतांनी विजयी करूया खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिपादन

जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे आणि याला तुम्ही साक्षिदार आहात. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींना तिसर्‍यांदा निवडून देऊया आणि पुन्हा देशाची सत्ता भाजपकडे देऊया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. कागल तालुक्यातील वाळवे खुर्द येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कागल तालुक्यातील वाळवे खुर्द गावासाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा विकास निधी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे. त्यातून विविध विकास कामांचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. गावच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांनी खासदार धनंजय महाडिक यांचा गौरव केला. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्रादेशिक पर्यटन विकास निधीतून हा निधी दिला असून याचा पाठपुरावा माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील आणि माजी उपसरपंच भरत पाटील यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे शेतकरी, महिला, उद्योजक, खेळाडू अशा सर्व क्षेत्रात भारताने प्रगती केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था उंचावली आहे. मोदी यांनी देशाचा केलेला विकास वाखाणण्याजोगा असून त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी भाजपाला साथ द्यावी असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. पुढील काळात विकास कामांची चिंता करू नका, सर्वच विकासकामे मार्गी लावून गावचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे त्यांनी सांगितले तर तसेच येत्या निवडणुकीत भाजपला बळकट करण्यासाठी पक्ष जो उमेदवार देईल. त्याला प्रचंड मतांनी विजयी करूया, असे आवाहनही त्यांनी केलं. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील म्हणाले महाडिक घराण्याचे दातृत्व मोठे आहे. समाज हिताच्या कामात त्यांनी कधीच राजकारण आणले नाही, असे सांगितले. यावेळी महिलांनीही खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला सरपंच संगीता बोडके, माजी सरपंच भरत पाटील, सतीश माने, हणमंत सुतार, विमल बोडके, सुनीता माने, वनिता जाधव, दिनकर ताणवडे, सर्जेराव डाफळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments