Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 19

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

0

साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी

दिल्ली/प्रतिनिधी : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात साखरेच्या एमएसपीबद्दल मुद्दा उपस्थित केला. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत, ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. एकीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची एफआरपी वाढवली जाते. तर दुसरीकडे साखरेचा उत्पादन खर्च, कर्मचारी पगार, कर्जाचे व्याज यामुळं साखर कारखान्यांवरील आर्थिक बोजा वाढतोय. परिणामी साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली आहे.राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज देशातील साखर कारखान्यांसमोरील प्रश्नांची मांडणी केली. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देण्यासाठी एफआरपीची रक्कम दरवर्षी वाढते. पण साखरेची एमएसपी वाढत नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आल्याकडं खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत देशातील साखर उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो. देशातील १० कोटींपेक्षा अधिक ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी साखर उद्योग उदरनिर्वाहाचे साधन आहे. संपूर्ण देशात सुमारे ५५० साखर कारखाने असून, या उद्योगातून सुमारे साडेपाच लाख लोकांना रोजगार मिळतो. भारतात दरवर्षी सुमारे ३६० ते ४०० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन होते. २०२२-२३ या वर्षात सुमारे ६० लाख टन साखर निर्यात केली. तर देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे २६० लाख टन आहे. ऊस पिकाचे एकूण मूल्य ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण हा संपूर्ण उद्योग हवामान बदलावर अवलंबून असतो. त्यातून साखर उद्योगाचे अनेकदा नुकसान होतंय. एकिकडे केंद्र सरकारने उसाची किंमत निश्चित केली आहे. एफआरपीमुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा फायदा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने साखरेसाठी एमएसपी म्हणजे किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंंटल ठरवला आहे. पण गेल्या ७ वर्षांपासून एमएसपी दरात वाढ नाही. एकीकडे एफआरपी दरवर्षी वाढत असताना, साखरेचा एमएसपी ३१०० रुपयांपर्यंत मर्यादित असल्याने साखर कारखानदारांचे मोठे नुकसान होत असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. साखरेचा उत्पादन खर्च, काढणी, वाहतूक, कारखान्याची देखभाल, कर्मचारी पगार, व्याज असे अनेक खर्च साखर कारखान्यांना करावे लागतात. ३१०० रुपयांच्या एमएसपीमध्ये हा सर्व खर्च भागवणे कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये ४२०० रुपयांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी इस्मा, नॅशनल शुगर फेडरेशन आणि महाराष्ट्र साखर संघांनी केली आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दोन पैसे जादा मिळतील आणि तोट्यात असलेल्या साखर कारखान्यांना उभारी मिळेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे, असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झालेल्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. किरण आणि अनघा पुरंदरे या दांपत्याचा जीवन प्रवास, त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून, श्रोते अक्षरशः भारावून गेले. गेल्या ३० वर्षाहून अधिककाळ, किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करतायत. भंडारा जिल्हयातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल गावात राहणार्‍या पुरंदरे दांपत्यानं, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय. शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करत, त्यांच्या पारंपारिक कलांना चालना देतायत. मुळचे पुण्याचे पुरंदरे दांपत्य, आता पुर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, शुक्रवारी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी.एस. शिंपुकडे यांच्या उपस्थितीत, पुरंदरे यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलं. मानपत्राचं वाचन पत्रकार अश्‍विनी टेंबे यांनी केलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना, पुरंदरे यांनी पीटेझरी- निसर्ग आणि संस्कृतीचा प्रितीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिलं. त्यातून त्यांची तळमळ दिसून आली. गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय. या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे, मग माणूस अधिकार गाजवू शकतो. पृथ्वीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीव पूर्वक काम करावं, असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं. दरम्यान कोल्हापूरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दांपत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रूपयांचा निधी दिला. तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दांपत्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र पोंदे, मनिषा चव्हाण, ज्योती तेंडुलकर, अनिता जनवाडकर, ॠषिकेश जाधव, मिनल भावसार, सोनाली चौधरी, ज्योती रेड्डी, जगदिश चव्हाण, अमोल देशपांडे, भाग्यश्री देशपांडे, करूणाकर नायक, भारती नायक, अनुपमा खटावकर, प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

0

निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं मानपत्र देवून सत्कार

पुरंदरे दांपत्याचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून श्रोते भारावले

कोल्हापूर/प्रतिनिधी : चिमणीचं अस्तित्व निसर्गातून कमी होत चालले आहे. निसर्गाशी संवाद साधला जात नाही. पशू पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्ष लागवड चळवळ जोमानं राबवली पाहीजे, असं आवाहन प्रख्यात निसर्ग आणि पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं झालेल्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. किरण आणि अनघा पुरंदरे या दांपत्याचा जीवन प्रवास, त्यांची निसर्गाबद्दलची ओढ आणि तळमळ पाहून, श्रोते अक्षरशः भारावून गेले.
गेल्या ३० वर्षाहून अधिककाळ, किरण पुरंदरे हे निसर्ग आणि पक्षी अभ्यासक म्हणून काम करतायत. भंडारा जिल्हयातील जंगल व्याप्त आदिवासी बहुल गावात राहणार्‍या पुरंदरे दांपत्यानं, निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतलाय. शिवाय गोंड आदिवासी महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करत, त्यांच्या पारंपारिक कलांना चालना देतायत. मुळचे पुण्याचे पुरंदरे दांपत्य, आता पुर्णवेळ आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी काम करतायत. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, शुक्रवारी या दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. रोटरीचे माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते आणि बी.एस. शिंपुकडे यांच्या उपस्थितीत, पुरंदरे यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आलं. मानपत्राचं वाचन पत्रकार अश्‍विनी टेंबे यांनी केलं. यावेळी सत्काराला उत्तर देताना, पुरंदरे यांनी पीटेझरी- निसर्ग आणि संस्कृतीचा प्रितीसंगम ही चित्रफित दाखवून व्याख्यान दिलं. त्यातून त्यांची तळमळ दिसून आली. गेल्या काही वर्षात चिमणीचं अस्तित्व कमी होत चाललंय. या पृथ्वीवर आधी पशुपक्ष्यांचा हक्क आहे, मग माणूस अधिकार गाजवू शकतो. पृथ्वीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनीच वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकानं जाणीव पूर्वक काम करावं, असं किरण पुरंदरे यांनी आवाहन केलं. दरम्यान कोल्हापूरातील रमेश खटावकर यांनी पुरंदरे दांपत्याच्या कार्याला हातभार म्हणून एक लाख रूपयांचा निधी दिला. तर कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुरंदरे दांपत्याला आर्थिक पाठबळ द्यावं, असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाला डॉ. राजेंद्र पोंदे, मनिषा चव्हाण, ज्योती तेंडुलकर, अनिता जनवाडकर, ॠषिकेश जाधव, मिनल भावसार, सोनाली चौधरी, ज्योती रेड्डी, जगदिश चव्हाण, अमोल देशपांडे, भाग्यश्री देशपांडे, करूणाकर नायक, भारती नायक, अनुपमा खटावकर, प्रतिभा शिंपुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

0

आराध्य दैवत आणि शिवसेनाप्रमुखांना स्मरण करून राजेश क्षीरसागरांनी घेतली “आमदारकीची” शपथ

मुंबई/प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मधून राजेश क्षीरसागर यांनी तब्बल २९ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादित केला. आज महाराष्ट्र राज्यातील सर्वच आमदारांचा शपथविधी विधिमंडळात आयोजित करण्यात आला होता.
उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या नूतन आमदारांनी भगवे फेटे परिधान करून विधिमंडळात प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधले. शपथविधी सुरु झाल्यानंतर नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी अनोख्या अंदाजात “आमदारकीची” शपथ घेतली यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित सर्वच आमदारांनी दाद दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून, शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना अभिवादन करून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली घेतली. यास विधासभेत उपस्थित सदस्यांनी विषेश दाद दिली.

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

0

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय पथकाच्या समावेत भव्य आरोग्य सप्ताह आरोग्य शिबिर पंधरवड्या चे आयोजन करण्यात आलेआहे. सोमवार दिनांक ९ डिसेंबर पासून ते २३ डिसेंबर पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ अमित बुरांडे हे मणका विकाराची, डायबेटीस फूट व चारकोट फूट ग्रस्त पेशंटची मोफत तपासणी करणार असून पुढील उपचार माफक दरात करणार आहेत, गुढघे व खुब्यांची सुद्धा तपासणी होणार आहे. गुढघा व खुबा बदलाची शस्त्रक्रिया फक्त नव्वद हजारात करणार आहोत असा मानस श्री संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केला. सध्याच्या आधुनिक काळात नूतनीकृत हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत असेही नमूद केले तसेच डोळे तपासुन मोतीबिंदु चे ऑपरेशन लागल्यास फक्त चार हजार रुपयात करण्यात येणार आहे, दंत तपासणी होणार आहे, डेंटल इम्प्लांट्स ज्या पेशंटना लागणार आहेत त्यांना माफक दरात ऑपरेशन होणार आहे. स्व शा कृ पंत वालावलकर यांनी गोर गरीब रुग्णांची सेवा व्हावी यासाठी या धर्मादाय हॉस्पिटल ची स्थापना केली होती. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डिजिटल एक्स रे ची सोय फक्त दोनशे पन्नास रुपयात उपलब्ध आहे. माफक दरात पॅथॉलॉजी विभाग सुरु आहे. ७ बेड चा आय सी यु व्हेंटिलेटर सह कार्यरत आहे. सुसज्ज्य दोन ऑपरेशन थियेटर आहेत. सर्व प्रकारची ऑपेरेशन्स येथे केली जातात.
तपासणीनंतर लागणाऱ्या उपचारासाठी आणि विविध टेस्ट साठी भरीव सवलत ही दिली जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी आणि डॉ . विरेंद्र वणकुद्रे , डॉ . शैलेजा खुटाळे , स्नेहा चव्हाण , रुतुजा जंगम मनीषा रोटे सह टीमने केले आहे .

गार्डन्स क्लब हे निसर्गप्रेमींसाठी व्यासपीठ : उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद

0

गार्डन्स क्लब हे निसर्गप्रेमींसाठी व्यासपीठ : उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद

गार्डन्स क्लब चे पुष्पप्रदर्शन नागरिकांसाठी खुले; निसर्गोत्सवाची पर्वणी फक्त

कोल्हापूर/प्रतिनिधी: फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच निसर्गप्रेमींसाठी निसर्ग जतन करणे आणि फुलांचे संगोपन, झाडांचे संवर्धन यासाठी ही संस्था कार्यरत आहे हे बघायला मिळाले. गार्डन्सा क्लबचे उपक्रम हे अतिशय स्तुत्य आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे असे प्रतिपादन कोल्हापूरचे उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांनी केले. महावीर उद्यानात गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे पुष्पप्रदर्शन आज नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वनविभागाकडून शक्य तितकी मदत या निसर्गप्रेमींसाठी काम करणाऱ्या संस्थेस केली जाईल, अशी ग्वाही उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांनी यावेळी दिली.
मातीला जपलं नाही तर मोठ संकट येणार.. हा धोका ओळखून तसेच माती आपली आई आहे.आई निरोगी तर मुलं सुदृढ असतात. मातीचा पोत खराब होत आहे. या गंभीर आणि गहन प्रश्नावर जागृती आणि संदेश देण्यासाठी यंदाचे पुष्पप्रदर्शन भरवले गेले आहे. मातीशी आपुलकी वाढावी… प्लास्टिकचा वापर टाळा. या जाणिवा प्रगल्भित होण्यासाठी तसेच अभ्यासपूर्ण व्यक्त व्हावं यासाठी गार्डन्स क्लब हे व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. जागतिक पातळीवर यावर संशोधन होते पण ते स्थानिक पातळीवर पोहोचण्यासाठी गार्डन्स क्लब दुवा म्हणून काम करत आहे.असा प्रदर्शनाचा उद्देश क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गार्डन्स क्लबचे नियतकालिक रोजेट आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लबतर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रीन एज्युकेशन अर्थात उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात लक्षणीय संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आजी-माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले. त्यामध्ये धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटीका यांचा समावेश होता.
तसेच स्कीट कॉम्पीटिशमध्ये ‘आपली माती आपले भवितव्य” या मध्यवर्ती संकल्पने अंतर्गत वेगवेगळे विषय निवडत स्पर्धकांनी आपली स्कीट्स सादर केली. या स्पर्धकांचे कौतुक व पारितोषिक वितरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. बिना जनवाडकर व कोल्हापुरातील नामवंत रंगकर्मी संजय हळदीकर विशेष पाहुणे म्हणून लाभले होते.
या स्पर्धेनंतर लगेचच कोल्हापुरातील सळसळत्या उत्साही तरुणाईचा आवडता बोटॅनिकल फॅशन शो, डीजे आणि लाईटिंगच्या साथीने दणक्यात पार पडला. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील या बोटॅनिकल फॅशन शो मध्ये आगळ्या वेगळ्या कल्पनांसह पाने, फुले व फळे तसेच बिया, फळांच्या साली यांचा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा आविष्कार सादर केला.गार्डन्स क्लबच्या सदस्या रचना …. व प्राजक्ता चरणे यांनी आभार प्रदर्शन केले.
क्लबच्या सदस्या अनिता ढवळे आणि रितू वाधवाणी यांनी सूत्रसंचालन केले.
गुलाबातील विविधता आणि विविध प्रकारची फुले, कुंडीतील रोपे, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, मुक्त रचना, लॅन्डस्केपींग हे प्रदर्शनात आवर्जून पहावे असे आहे.
यावेळी गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी,उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,सहसचिव शैला निकम, सह कोषाध्यक्ष सुनेत्रा ढवळे,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, रविंद्र साळोखे, संगीता कोकितकर, जयश्री कजरिया, दिपाली इंगवले,डॉ.स्मिता देशमुख, रोहिणी पाटील, मंदा कुलकर्णी, भक्ती डकरे, मयुरा पाटील, चिनार भिंगार्डे, वर्षा वायचळ, रेणुका वाधवाणी, दीपा भिंगार्डे, राजेश्वरी पवार, संगीता सावर्डेकर,पद्मा पाटील, निशिगंधा कुलकर्णी, सुनिता निल्ले, सिद्धी गनबोटे, हर्षदा शिरगावकर, कल्पना सावंत उपस्थित होते.

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

0

गोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’

मुंबई येथील इंटर डेअरी अ‌ॅवार्ड मध्ये विशेष समारंभात सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागातील ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली’ हा मानाचा पुरस्कार मुंबई येथे इंटर डेअरी अँवार्ड मध्ये विशेष समारंभात इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व सर्व संचालक व अधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा समारंभ मुंबई (गोरेगाव) येथील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ म्हणजे गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदारपणा, चव यामध्ये गोकुळने सातत्य ठेवले आहे. यामुळे गोकुळची ख्याती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांची भुरळ आता परदेशातील नागरिकांना पडत आहे. विविध देशातून दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टावर गोकुळ फुलला आहे. गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादक हिताच्या योजना राबविल्या. या प्रदर्शनामध्ये दुग्धव्यवसायातील नवीन कल्पना, तंत्रज्ञान आणि संधी जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. तंत्रज्ञान, आधुनिक पॅकेजिंग, प्रक्रियेतील नवीन उपाय आणि प्रगत ऑटोमेशन अशा अनेक गोष्टी या प्रदर्शनात पाहायला मिळल्या असून या प्रदर्शनात १२० हून अधिक भारतीय आणि जागतिक कंपन्या सहभागी झाल्या आहे. त्याचबरोबर गोकुळ दूध संघास मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, अधिकारी-कर्मचारी व सर्व संबधित घटक यांच्या कष्टाचा सन्मान आहे.
इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोनतर्फे पाच ते सात डिसेंबर २०२४ या कालावधीत इंटर डेअरी प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात देशभरातील नामवंत दूध संघांचा सहभाग आहे. दुग्ध व्यवसायाशी निगडीत मशिनरीजचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनात गोकुळ दूध संघांचा स्टॉल आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला आहे.
गुरुवारी, सायंकाळी बाँम्बे एक्झीबिशन सेंटर येथे इंटर डेअरी अॅवार्ड पार पडला. अतिशय दिमाखात पार पडलेल्या या सोहळयात प्रतिदिन १० लाख लिटर पेक्षा अधिक दूध हाताळणी, टी.एम.आर., आयुर्वेदिक पशुपूरक प्रकल्प, डेअरी मधील काडा सिस्टीम, सुख चारा व योग्य डेअरी व्यवस्थापन व नवनवीन तंत्रज्ञानाची दखल घेऊन गोकुळ दूध संघाला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित केले.
पशुसंवर्धनासाठी उपयुक्त ठरलेल्या या हर्बल प्रकल्पाची देशपातळीवर गवगवा झाल्याचे पुरस्काराच्या निमित्ताने स्पष्ट झाले. पशुसंवर्धनासाठी पूरक हर्बल प्रकल्प व प्रोसेसिंग अॅटोमेशनमधील कामगिरीची दखल घेऊन गोकुळला इंटर डेअरी अॅवार्डनी सन्मानित करण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले.याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एस. सोधी, गुजरात अमूल दूध डेअरी चेअरमन शामलभाई पटेल, सुमूल दूध डेअरी चेअरमन मानसिंहभाई पटेल, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरीषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, आय.डी.एफ.चे प्रतिनिधी अनिल पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महनगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे पुष्प प्रदर्शन, ६, ७ व ८ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे होणार

0

गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महनगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे पुष्प प्रदर्शन, ६, ७ व ८ डिसेंबर रोजी महावीर उद्यान येथे होणार

कोल्हापूर/ प्रतिनिधी: पर्यावर्णाविषयी विशेष आस्था बाळगणाऱ्या गार्डन्स क्लबने या वर्षी “आपली माती, आपले भवितव्य” या संकल्पनेवर आधारीत रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाफ कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळावा याची पूर्ण व्यवस्था केली आहे, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पूर्ण तीन दिवस चालणाऱ्या या हरीत महोत्सवात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने तसेच बगिचांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स् यांची रेलचेल असेल. शहरवासियांना या प्रदर्शनात केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर पुणे, सांगली, बेळगांव, अश्या शहरांमधून बागेसाठी लागणारे नवनवीन साहित्य, जसे कुंड्या, स्टॅन्ड, रोपे, कंद, खते, हस्थारे वगैरे, बघण्याचा व खरेदी करण्याचा आनंद घेता येणार आहे.
या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार दि. ६ रोजी संध्या. ४ वा. शोभायात्रेने होईल, या मध्ये कोल्हापुरातील विविध शाळा, सामाजीक संस्था, क्लब व नागरिक मातीविषयक वेगवेगळ्या जनजागृती करणाऱ्या घोषणा देतील. आपल्या माती साठी प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्‌देश या शोभायात्रेच्या पाठीमागे असेल. या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी व वेगवेगळ्या स्टॉल्सचे उद्‌घाटन करण्यासाठी या वर्षी क्लबने प्रमुख पाहुण्या म्हणून मा. वैष्णवी पाटील – डी. वाय. एस. पी. ॲन्टी करप्शन, प्रमोद माने – सबरिजनल ऑफिसर एमपीएससी बोर्ड व मा. हरीश सूळ – डेप्युटी कलेक्टर, एस. डी. एम. आजरा, कोल्हापूर यांना आमंत्रीत केले आहे.
या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून स्पॉट गार्डन कॉम्पीटिशनला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजल्यापासूम टेराकोटा जर्नी (गौरव काईंगडे) या संस्थेतर्फे मातीपासून विविध प्राणी बनवण्याचे प्रात्यक्षीक होईल, याची मजा लहान थोरांना मोफत लुटता येणार आहे. या कार्यशाळे दरम्यान प्रसि‌द्ध प्राणी व पक्षी अभ्यासक श्री. धनंजय जाधव यांचे ‘प्राणी शहराकडे का वळतात?’ या विषयावर माहितीपर व्याख्यान होईल, इच्छुकांनी मातीपासून प्राणी बनवण्यासाठी यात सामील व्हावे.शनिवार दि ७ डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होईल, ज्यात स्पर्थक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशीगंध, जर्बेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. या प्रसंगी पुष्प प्रदर्शनाचे उद्‌घाटन व उद्‌यान स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे गुरुप्रसाद डी. एफ. ओ., अध्यक्ष – कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी/ प्रशासक को. म.न.पा. तसेच विशेष अतिथी – मा. राजेंद्र दोशी, मा. शांतादेवी डी. पाटील या मान्यवरांच्या हस्ते होईल.
या औपचारीक उद्‌घाटन व पारितोषीक वितरणानंतर दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लब तर्फे सुरु असणाऱ्या उद्‌यानविद्या व नर्सरी मॅनेजमेंट या कोर्सच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होईल. त्या अंतर्गत, विविध गुणदर्शन तसेच विद्यार्थी मनोगत व स्नेह‌भोजनाचा कार्यक्रम होईल. या मेळाव्यासाठी व भेटीगाठी साठी प्रेरणा शिवदास , सहायक निबंधक , सहकारी संस्था,प्रमुख पाहुण्या म्हणून तसेच कोर्स कोऑर्डीनेटर सौ प्रमिला बत्तासे व रश्मी भूमकर , सुषमा शेवडे , प्राध्यापक इत्यादी उपस्थित असतील.
संध्याकाळच्या सत्रात चार वाजल्यापासून ‘आपली माती आपले भवितव्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत स्कीट कॉम्पीटिशन घेण्यात येतील. व लगेचच कोल्हापूरातील तरुणाई ज्या उत्कंठावर्धक स्पर्धेची वाट पहात असतात अश्या सळसळत्या तरुणाईच्या, कल्पनांचा आविष्कार दाखवणारा ‘बोटॅनिकल फॅशन शो’ चा प्रारंभ होईल. कोल्हापुरातील तरुणी दर वर्षी नवनवीन कल्पना घेवून या रंगतदार फॅशन शो मध्ये सामील होत असतात. या स्पर्धामध्ये तरुणाईला प्रोत्साहन
देण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. बीना जनवाडकर श्री. संजय हळदीकर तसेच नीरज व सौ. जीया झंवर व मा. कर्नल कुल्लोली आणि डॉ सौ कुल्लोली आवर्जुन उपस्थित रहाणार आहेत.
रविवारी ८ डिसेंबरच्या सकाळच्या गुलाबी थंडीत लहान थोरांच्या चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. या विशेष उत्साहपूर्ण स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर सिंग, सिनीयर असिस्टंट डायरेक्टर, हॅंडीक्रफ्ट सर्विस सेंटर, मिनीस्ट्री ऑफ टेक्सटाइल. , अध्यक्ष – मा. रमेश शहा, सुभाषचंद्र अथणे व विशेष अतिथी – विजयमाला मेस्त्री उपस्थित रहातील.चित्रकला स्पर्धेनंतर ‘हसत खेळत पर्यावरण ‘ अंतर्गत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिलराज जगदाळे हे मुलांचे पर्यावरणावर आधारित खेळ घेणार आहेत.
या नंतर दुपारी ११ ते १२.३० या वेळेत सौ. चिनार भिंगार्डे यांची ‘कॉयर क्राफ्ट’ या विषयावर, नारळाच्या तंतूपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न होईल. ही आगळी वेगळी कला शिकण्यासाठी कोल्हापूरकरांनी जरूर नावनोंदणी करावी.संध्याकाळी ‘शॉर्ट फिल्म” स्पर्धेतील निवडक व विजेते लघुपट पडद्यावर दाखवण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना बक्षीसे देण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून नाट्य व सिने कलावंत श्री. शरदजी भुताडीया तसेच
प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या
सौ. योगिनी कुलकर्णी, व सौ. लक्ष्मी शिरगांवकर यांना
पाचारण करण्यात आले आहे.
या औत्सुक्यपूर्ण कार्यक्रमानंतर सर्वांचा आवडता कार्यक्रम ज्याची स्पर्धक आतुरतेने वाट पहातात तो वार्षिक पारितोषीक वितरण समारंभ होईल. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ व अध्यक्ष – मा. श्री राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, को.म.न.पा. असतील. विशेष पाहुण्या म्हणून मा. मनीषा डुबुले, अतिरिक्त एस पी सी आय डी या लाभल्या आहेत. विशेष अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सौ. योगिनी कुलकर्णी, व सौ. लक्ष्मी शिरगांवकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. गार्डन्स क्लबच्या या विशेष सोहळ्यात या वर्षीच्या ‘आपली माती आपले भवितव्य’ संकल्पनेवर आधारीत अरुण मराठे याचे व्याख्यान ऐकण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. मराठे सर ॲग्रो केमिस्ट्री आणि साॅईल सायन्सचे 33 वर्षापासून अभ्यासक आणि अध्यापक आहेत. माती आणि शेती या विषयावर त्यांची असंख्य व्याख्याने प्रसिद्‌ध आहेत. या व्याख्यानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे ,कार्यकारणी सदस्य सुनिता पाटील, शशिकांत कदम, सल्लागार सदस्य रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, संस्थापक सदस्य रवींद्र ओबेराय अरुण नरके उपस्थित होते.

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

0

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी वेळ ९ ते दुपारी ४ या वेळेत हॉटेल ऐरावत, गणपती मंदिर जवळ गडहिंग्लज येथे मोफत वंध्यत्व निवारण तपासणी शिबीर (IVF) व मोफत हृदयचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
बदलती जीवनशैली व धकाधकीचे जीवन या मुळे तरुण नवविवाहीत दांपत्या मध्ये वंध्यत्वा ची समस्या अधिक वाढते आहे. वेळेत गर्भधारणा होण्या साठी स्त्री-पुरुष दोन्ही चे प्रजनन क्षमता योग्य असणे गरजेचे असते. नवविवाहीत दांपत्या मध्ये गर्भधारणा संदर्भातील विविध समस्या साठी सिद्धगिरी हॉस्पीटल येथे वंध्यत्वावर मात करण्यासाठी होलिस्टिक आयव्हीएफ,विभाग आधुनिक तंत्रज्ञान,आणि आयुर्वेदाची अव्दितीय उपचार पध्दती अत्याधुनिक व सुसज्ज IVF विभाग डॉ वर्षा पाटील यांच्या संचालना खाली सुरू करण्यात आला आहे. माफक दरात IVF उपचार उपलब्ध करूण सर्वसामान्य लोकांना आपत्य सुख देण्यासाठी गेले दोन वर्षा पासून IVF सेंटर कार्यरत आहे.
तसेच हृदयाचे आरोग्य ही महत्वाचे आहे सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये माफक दरात सीटी स्कॅन, अत्याधुनिक एम.आर.आय.. डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब या सुविधा एकाच छताखाली असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सेवाभावी संस्था श्रेणीतील अग्रेसर व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे.
हृदयाशी संबधित शस्त्रक्रियासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान द्वारे केलाय जातात.MOST ADVANCED CATH LAB याच बरोबर,Philips Azurion ३ F१२ मुंबई ते बेंगळूर या परिक्षेत्रातील ट्रस्ट श्रेणीतील पहिले व अत्याधुनिक Philips Azurion ३ F१२ कॅथ-लॅब ही उपलब्ध आहे.डॉ. गणेश इंगळे एम.बी.बी.एस., एम.डी. डी.एन.बी. एफ.एन.बी (INTERVENTIONAL CARDIOLOGIST) यांच्या मार्गदर्शनाखाली हृदय विभाग कार्यरत आहे.तरी गडहिंग्लज येथे आयोजित मोफत वंध्यत्व निवारण तपासणी व मोफत हृदय तपासणी शिबीर यांचा लाभ सर्व गरजू व्याक्तीनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

0

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया (अँम्पी) कडून प्रतिष्ठित “डॉ. एम. एस. अगरवाल यंग इन्व्हेस्टिगेटर पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आहे. हैदराबाद मधील बसवतरकम इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या ४ व्या अँम्पीकॉन वार्षिक परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.अँम्पीकॉन २०२४ मध्ये भारतातील आणि परदेशातील २६ संस्थांमधून १०० हून अधिक पोस्टर सादरीकरण झाले. यापैकी २० सर्वोत्तम पोस्टर मधून रणजीत सी. पी. यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ‘इव्हॅल्युएशन ऑफ बीम डिलिव्हरी इन पेन्सिल बीम स्कॅनिंग प्रोटॉन थेरपी सिस्टम युसिंग एन इनहाऊस ऑटोमेटेड टूल युजिंग लॉग फाईल डेटा’ या विषयावर त्यांनी सदरीकरण केले होते. रणजीत सी. पी. यांचे हे यश डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनातील प्रगतीचे प्रतीक असून वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाला अधोरेखित करते.रणजीत यांचे कुलपती डॉ. संजय. डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, रिसर्च गाईड डॉ. के. मयकांनान यानी अभिनंदन केले आहे.