वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य पंधरवडा शिबीराचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पणे सन १९८६ पासून कार्यरत असलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीने वैद्यकीय पथकाच्या समावेत भव्य आरोग्य सप्ताह आरोग्य शिबिर पंधरवड्या चे आयोजन करण्यात आलेआहे. सोमवार दिनांक ९ डिसेंबर पासून ते २३ डिसेंबर पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. या शिबिरामध्ये प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ अमित बुरांडे हे मणका विकाराची, डायबेटीस फूट व चारकोट फूट ग्रस्त पेशंटची मोफत तपासणी करणार असून पुढील उपचार माफक दरात करणार आहेत, गुढघे व खुब्यांची सुद्धा तपासणी होणार आहे. गुढघा व खुबा बदलाची शस्त्रक्रिया फक्त नव्वद हजारात करणार आहोत असा मानस श्री संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केला. सध्याच्या आधुनिक काळात नूतनीकृत हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत असेही नमूद केले तसेच डोळे तपासुन मोतीबिंदु चे ऑपरेशन लागल्यास फक्त चार हजार रुपयात करण्यात येणार आहे, दंत तपासणी होणार आहे, डेंटल इम्प्लांट्स ज्या पेशंटना लागणार आहेत त्यांना माफक दरात ऑपरेशन होणार आहे. स्व शा कृ पंत वालावलकर यांनी गोर गरीब रुग्णांची सेवा व्हावी यासाठी या धर्मादाय हॉस्पिटल ची स्थापना केली होती. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डिजिटल एक्स रे ची सोय फक्त दोनशे पन्नास रुपयात उपलब्ध आहे. माफक दरात पॅथॉलॉजी विभाग सुरु आहे. ७ बेड चा आय सी यु व्हेंटिलेटर सह कार्यरत आहे. सुसज्ज्य दोन ऑपरेशन थियेटर आहेत. सर्व प्रकारची ऑपेरेशन्स येथे केली जातात.
तपासणीनंतर लागणाऱ्या उपचारासाठी आणि विविध टेस्ट साठी भरीव सवलत ही दिली जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. संतोष कुलकर्णी आणि डॉ . विरेंद्र वणकुद्रे , डॉ . शैलेजा खुटाळे , स्नेहा चव्हाण , रुतुजा जंगम मनीषा रोटे सह टीमने केले आहे .