Saturday, June 28, 2025
spot_img
Home Blog Page 17

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

0

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्गातील विद्यार्थी व पालक यांना फार्मसी अभ्यासक्रम, उच्चशिक्षण तसेच नोकरीच्या संधी इत्यादी बाबींची माहिती देण्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.कार्यकमाचे उदघाटन महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे व निमंत्रित पालक यांच्या शुभहस्ते राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती मा. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या फोटो पुजन व दीपप्रज्वलनाने झाले. सर्वप्रथम नवीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पालकांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्राचार्यानी ‘भारती विद्यापीठाची माहिती दिली तसेच ” गतीमान शिक्षणातून समाज परिवर्तन ” या ब्रीद वाक्यास अनुसरून पाल्यास फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्याबाबत महाविद्यालय कटिबध्द असल्याचे सांगीतले. यावेळी या वर्षापासुन सर्व भारतात एकाच पध्दतीचा नवीन पी सी आयचा फार्मसी अभ्यासकम, परिक्षा पध्दती व त्यासंदर्भात असलेले शिवाजी विद्यापीठाचे नियम, तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षकवर्गाची, कॉलेजमधील विद्यार्थी मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, माजी विद्यार्थी संघटना अशा विविध समित्यांची माहिती दिली. पाल्याचा सर्वागीण विकास व्हावा यादृष्टीने कॉलेज तर्फे राबविण्यात येणारे क्रीडा , सांस्कृतीक व सामाजिक उपक्रमाची माहिती प्राचार्याकडून देण्यात आली विद्यार्थ्यांची करिअर मध्ये योग्य दिशेने यशस्वी व सकारत्मक वाटचाल होण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे असे प्राचार्यानी नमूद केले.
अकॅडमीक इन्चार्ज श्री. आर.जे. जरग यांनी बी . फार्म प्रथम वर्षाची अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती दिली.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना आपला परिचय करून दिला. कार्यकमाच्या शेवटी विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यकमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका. पी. एस. टकले तर आभार प्राध्यापिका. व्ही. के काकाडे यांनी मानले.या कार्यक्रमास पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन प्रतिसाद दिला.

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

0

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि कोल्हापूरच्या महापालिकेच्या व अन्य उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे,या उर्दू कार्निवलचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ आहेत.अशी माहिती उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजक गणी आजरेकर, कादरभाई मलबारी अबू ताकीलदार रफिक शेख बापू मुल्ला,रहीम महात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दसरा चौक येथील मैदानावर आयोजित या कार्निवलमध्ये कोल्हापूर शहरातील मुस्लिम बोर्डिंग संचलित नेहरू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,अँग्लो उर्दू हायस्कूल,शिरोली, कोमनपा डॉ.झाकिर हुसेन उर्दू मराठी शाळा सुसरबाग कोल्हापूर,हाजी शाबाजखान आमीनखान जमादार उर्दू मराठी शाळा,जवाहर नगर कोल्हापूर,हाजी गफूर वंटमुरे उर्दू मराठी शाळा विक्रमनगर,मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु हायस्कूल जवाहर नगर कोल्हापूर या शाळांचा समावेश आहे,
उर्दु कार्निवलमध्ये ऊर्दू मराठी इंग्रजी भाषेचा इतिहास,ऊर्दू मुशायरा, ऊर्दू भाषेतील वाडमय मधील विविध प्रकाराचे सादरीकरण,स्नेहसंमेलन अंतर्गत देश भक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.त्याचबरोबर या कार्निवल मध्ये आयोजित प्रदर्शनात सर्वात छोट्या पवित्र कुराणाची प्रत,राजर्षी शाहू महाराजांनी मराठी भाषेत भाषांतरीत करून घेतलेल्या पवित्र कुराणाची प्रत,इसवी सन पूर्व नाण्यांचे प्रदर्शन आणि फूड फेस्टिव्हल सुद्धा आयोजित करण्यात आले आहे.तरी कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ऊर्दू भाषेतील जाणकारांनी व उर्दु भाषेच्या अभ्यासकानी व समस्त कोल्हापूरकरांनी या ऊर्दू कार्निवलमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक गणी आजरेकर व आयोजकांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. मोटारीने श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळकडे प्रयाण. श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळ येथे आगमन. दुपारी २ वाजता पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थिती. नंतर मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. कोल्हापूर विमानतळ येथून ३.५० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

0

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आणि माध्यमिक शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सहकार्याने दरवर्षीप्रमाणे दिनांक १ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत नियोजनुसार जनस्वास्थ्य अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे.
बुधवार दिनांक १ जानेवारी
या दिवसापासून अभियान काळात रोज प्रार्थनेवेळी जनस्वास्थ्य प्रतिज्ञा घेतली जाईल. तसेच या दिवशी विद्यार्थ्यांना आरोग्य व पर्यावरण विषयावर पोस्टर करावयास सांगून ती अभियान काळात शाळेच्या आवारात मांडल्यानंतर शेवटच्या दिवशी मानवी साखळी वेळी वापरली जातील.
गुरुवार दिनांक २ जानेवारी
जवळच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी /आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स, डेंग्यू आदी गंभीर आजाराबाबत घ्यावयाच्या दक्षतेसंबंधी मार्गदर्शन करतील.
शुक्रवार दिनांक ३ जानेवारी
या दिवशी असलेल्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किशोरवयीन लैंगिक समस्या व त्यासंबंधी तरुण वयात घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
शनिवार दिनांक ४ जानेवारी
या दिवशी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविले जाईल. विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या घरी कचऱ्यापासून खत निर्मिती, त्यापासून फळझाडे लागवड, टेरेसवर किंवा उपलब्ध जागेत भाजीपाला लागवड, सांडपाणी पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर, निर्धूर चूल, टाकाऊ अन्न पदार्थांपासून बायोगॅस निर्मिती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग याबाबत प्रबोधन केले जाईल. तसेच या दिवशी पर्यावरण पूरक भारतीय सण साजरे करणे, ध्वनी प्रदूषण करणारी डॉल्बी यंत्रणा तसेच फटाके टाळणे, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे याबाबत विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली जाईल.
सोमवार दिनांक ६ जानेवारी
या दिवशी गुटखा, तंबाखू, धूम्रपान आणि दारू या व्यसनांचे विरोधात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत आपल्या शाळेजवळील प्रमुख रस्त्यावर वाहतुकीला अडथळा न आणता तयार केलेले पोस्टर्स हातात घेऊन व्यसनविरोधी घोषणा देत मानवी साखळीच्या रूपात उभे राहतील.
जनस्वास्थ्य अभियानातील आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, पोस्टर स्पर्धेतील विजेते विद्यार्थी व पर्यावरण पूरक आणि व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवलेली आदर्श गावे यांना सन्मानचिन्हे देण्याचा कार्यक्रम शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केला जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यात गेली २४ वर्षे उस्फूर्तपणे राबविले जाणारे हे जनस्वास्थ्य अभियान एक आदर्शवत असे ठरले आहे. विशेषतः अभियान अंतर्गत गुटखा, तंबाखू धूम्रपान आणि दारू यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील किमान दोन लाख मुले मानवी साखळीच्या रूपात उभे राहतात. हे भारतातील एकमेव उदाहरण असावे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा खादी ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त विद्यमाने “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमास मार्गदर्शक श्री. उमाकांत डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध खादी आणि ग्रामोद्योग संस्थेच्या योजनांची माहिती लघुउद्योग निर्मिती त्यासाठी आवश्यक शासनाचे साह्य पीटीए कौशल्य विकास प्रशिक्षण आणि विविध कोर्स विषयी उपस्तीताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी इन्स्टिट्यूट मध्ये सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सीबी कोरा ग्रामोद्योग आयोगा अंतर्गत कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे सुरु असलेले विविध प्रशिक्षण, प्रशिक्षणाची निवड करण्याची पद्धती, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रावर मिळणारे उपयुक्त शासनाचे फायदे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे शासनाचे कोर्सेस याविषयी माहिती देवून “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे उदेश आणि उपुक्त्ता या विषयी मार्गदर्शन केले.
या वेळी इंजीनियरिंग डिग्री सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डी. आर. पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी कोंगे, आयटीआय विभागाचे गटनिदेशक, प्रा. अविनाश पाटील, इन्स्टिट्यूट मधील आणि बाहेरील नोकरी व्यवसाय करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. सुजित मोहिते यांनी मानाले.
हा कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट. व्ही. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला आहे.

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

0

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण २०२० ची परिणामकारक अंमलबजावणी करणे हा होता.या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांना वर्गात अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्यासाठीच्या नव संकल्पना शिकून घेतल्या. त्यासाठी विविध व्युह-रचना आखल्या. त्यासाठी ‘फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी’ पद्धतीचा वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नाविन्यपूर्ण अध्यापन- अध्ययन प्रणाली राबवण्यासाठी, मूल्यांकन पद्धतीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान साधनांचा प्रभावीपणे वापर कसा करावा याचे देखील प्रशिक्षण घेतले.या कार्यशाळेत नव शैक्षणिक धोरण मसुदा समिती सदस्या व एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रो. डॉ. वसुधा कामत, याच विद्यापीठाच्या एज्युकेशनल टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रो.डॉ.जयश्री शिंदे, सोमय्या कॉलेज मुंबईच्या अनुश्री सुखी, डॉ. लॉली जैन, डॉ. तृप्ती राणे, डॉ.मनाली जोशी, आकांक्षा शर्मा यांनी सहभागी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले. यासाठी घोडावत विद्यापीठाच्या आय क्यू ए सी संचालक डॉ. रेवती देशपांडे आणि डॉ. विद्याराणी खोत यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कुलगुरू प्रो.उद्धव. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. सर्व डीन, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल

0

कोरगावकर ग्रुपचे  आचला फार्म हाऊस  पर्यटकांच्या सेवेत दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी : मसाई पठार जवळ कोरगावकर ग्रुप कडून उभा करण्यात आलेल्या *आचला फार्म हाऊस* पर्यटकांचा सेवेत दाखल झाले आहे. या फार्मचे उद्घाटन डी. वाय. एस.पी स्वाती गायकवाड सौ.शुभलक्षमी विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.कोल्हापूरकडे सध्या पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे.आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्थळे ही पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत त्यातच पन्हाळा हा खासआकर्षणआहे.      पन्हाळा.शाहूवाडी,कोल्हापूर,आणि वारणानगर या सर्व ठिकाणाहून पर्यटकांना आणि कोल्हापूरकरांना जवळ असणारे हे आचला फार्म राहण्यासाठी आणि लहान मुलांसाठी महत्वपूर्ण असणार आहे.याठिकाणी धमाल मस्ती ही लहान मुलांना करता येणार आहे.हे फार्म हाऊस पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले असून याठिकाणी अवश्य भेट द्यावी असे राज कोरगावकर यांनी सांगितले आहे.               या उद्घाटनप्रसंगी अपटी सरपंच आशिष पाटील,वेखंडवाडी सरपंच संतोष खोत,जेऊर सरपंच भाऊ पाटील पन्हाळा मंगळवार पेठ सरपंच गोरख जामदार,कॉन्ट्रॅक्टर अजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ खेतल आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जेऊर हायस्कूल मधील बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बेंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी कोरगावकर ग्रुपचे राज कोरगावकर,अनिकेत कोरगावकर,आकाश कोरगावकर आदी उपस्थित होते.

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

0

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातले भव्य असे “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास सुरुवात झाली. देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि साध्या पद्धतीने या प्रदर्शनास सुरुवात करण्यात आली.यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज,आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आणि गोकुळचे संचालक सर्व नगरसेवक चंदगडचे काँग्रेसचे नेते गोपाळ पाटील,जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे, कृषी संशोधन केंद्रचे डॉ.अशोक पिसाळ, कृषी विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तपोवन मैदानावर गर्दी केली होती.                                              या प्रदर्शनात देश विदेशातील विविधनामांकित कंपन्यांचे २०० हून अधिक स्टॉल स्टॉल लावण्यात आले आहेत. याचबरोबर पशुपक्षी दालन उभे करण्यात आले आहे.शेतकरी आपला तांदूळ घेऊन आले आहेत. विविध कंपन्यांची उत्पादने व शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान,नवीन अद्ययावत मशिनरी याठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.या प्रदर्शनात १५०० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा रेडा आकर्षण असणार आहे.प्रदर्शनाचे २०२४ हे ६ वे वर्ष असून या प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,२०० पेक्षा अधिक पशु-पक्षांचा सहभाग आहे.शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र याठीकणी होणार आहेत.विविध शेती अवजारे, बी-बीयाणे खते खरेदी करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे.फुलांचे प्रदर्शन व विक्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.                                                                 देशातील आघाडीच्या संशोधन पर उपयुक्त शेती साहित्य निर्माण करणाऱ्या रिलायन्स पॉलीमर्स, महालक्ष्मी शेती विकास केंद्र, संजय घोडावत ग्रुप यांचे प्रायोजकत्व प्रदर्शनाला लाभले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, पणन विभाग यांचे सहकार्य लाभले आहे. यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, किटकनाशके, रासायनिक खत व्यापारी, कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, रिलायन्स पॉलिमरचे सत्यजित भोसले,स्वप्निल सावंत हे कार्यरत आहेत.या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या कृषी क्षेत्रातील विविध संस्था सहभागी झाल्या आहेत. यामध्ये गोकुळ दूध संघ, पाटील ऑईल मशीन,प्रथम पेस्ट,ओंकार बंब जय इंडस्ट्रीज मयुरेश टेकनॉलॉजी गोविंद मिल्क सातारा, कृष्णा सेल्स , बॅगमार्क इंडस्ट्रीज, धनलक्ष्मी आटा चक्की, चेतन मोटर्स,रॉयल इन्फिल्ड बाहुबली प्लास्टिक, महालक्ष्मी शेती विकास, वरद इंडस्ट्रीज, चितळे डेअरी, कागल बंब, त्रिवेणी मसाले, पेरु नर्सरी स्टॉल, एस.एम. फर्निचर, बळीराजा आटा चक्की, संकेत बायोटेक, रोनिक, जैन इरिगेशन सागर ऑटोमोबाईल आदी नामवंत कंपन्या आपले उत्पादन सोबत या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.याचबरोबर विविध बी-बियाणे शेतीची अवजारे, खते औषधे आदी उत्पादने पहावयास मिळणार आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळणार आहेत.प्रदर्शनामध्ये पीक स्पर्धा, पुष्प स्पर्धा, जनावरे स्पर्धा,खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.या प्रदर्शनात विविध प्रकारचे जनावरे व पशूपक्षी यामध्ये उस्मानाबादी शेळ्या, बोकड, खडकनाथ कोंबड्या, ससे, पांढरे उंदीर, तसेच कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबड्या, वेगवेगळे बैल, घोडे, म्हैशी, विविध पक्षी, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत.या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

0

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. (KVMPL) या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे. शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको-फ्रेंडली स्कूटरची उत्तम श्रेणी कंपनीने सादर केली आहे.या नव्या शोरूममध्ये अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या ऑस्ट्रियन ब्रँड ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर ५०० एक्स, क्रॉसफायर ५०० एक्ससी, क्रॉमवेल १२००, क्रॉमवेल १२०० एक्स या मोटारसायकलींसह इटालियन ब्रँड व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर अशी प्रीमियम दुचाकी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मोटोहॉसने नुकत्याच दाखल केलेल्या या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाइक्स भारतीय रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत.
ब्रिक्स्टन मोटारसायक उत्साही आणि आलिशान वाहन खरेदीदारांसाठी डिझाइन केल्या आहेत, ज्या शहरी प्रवासासह ऑफ-रोड साहसी प्रवासासाठीही उत्तम आहेत. यात एबीएस, एलईडी लाइटिंग आणि केवायबी सस्पेन्शन्स यांसारख्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाइक्स शहरातून साहसी किंवा समुद्रपर्यटन करणाऱ्या रायडर्सना आराम, सुरक्षितता आणि उत्तम कामगिरीचा अनुभव प्रदान करतात. दुसरीकडे, व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर, पर्यावरणपूरक, किफायतशीर उपाय शोधणाऱ्या उत्साही लोकांसाठी उत्तम पर्याय आहे. या स्कूटरचे हलके, मोठे टायर्स, काढता येण्याजोग्या बॅटरी, तीन राइडिंग मोड आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक मोटर शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर वाहन चालविण्यासाठी योग्य आहे, तर त्याचे शून्य उत्सर्जन शाश्वततेच्या उद्दिष्टांशी जुळते. या बाइक्स आणि स्कूटर एकत्रितपणे कोल्हापूरच्या वैविध्यपूर्ण रायडिंग समुदायासाठी व्यावहारिक, स्टायलिश आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम पर्याय आहेत.
यावेळी बोलताना केव्हीएमपीएल-मोटोहॉसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले, “मोटोहॉस आणि केएडब्लू व्हेलोस मोटर्सचा उद्देश भारतीय ग्राहकांना प्रीमियम, वैविध्यपूर्ण दुचाकी वाहने देणे हा आहे. परंपरा आणि नावीन्य या दोहोंचा यात संगम आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन कामगिरी, टिकाऊपणा आणि स्थानिक नावीन्यपूर्णतेला प्राधान्य देत भारताच्या दुचाकी उद्योगात परिवर्तन घडवून आणत आहोत.”
येथील ही डीलरशिप २००० चौरस फूट जागेवर पसरली असून, एक हजार चौरस फूटावरील जागेत सुसज्ज वर्कशॉप आहे. ग्राहकांना आरामदायक आणि सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. मोटोहॉस विक्रीपश्चात उत्तम सेवा आणि वॉरंटीसह ग्राहकांचा मालकी अनुभव अधिक उत्तम करते. ब्रिक्सटन मोटरसायकल दोन वर्षांची वॉरंटी आणि दोन वर्षांची विस्तारित वॉरंटी देते, तर व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरवर दोन वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी मिळते.
मोटोहॉस मुंबई, पुणे, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद आणि गोव्यासह टियर एक आणि टियर दोन शहरांमध्ये प्रीमियम रिटेल दालने सुरू करत आहे. या ब्रँडने २०२५च्या मध्यापर्यंत २० डीलरशिप उघडण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.मोटोहॉसची अधिकृत वेबसाइट, सोशल मीडियावरील आणि रिटेल आउटलेटद्वारे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीने पहिल्या वर्षात दहा हजार बाईक आणि इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. डिसेंबर २०२४ पासून वाहनांचे वितरण सुरू होणार असून, पहिल्या ग्राहकांना विशेष सवलत किंमतीचा लाभ मिळू शकेल.
व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाख २९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.
• क्रॉसफायर ५०० एक्स आणि क्रॉसफायर ५०० एक्ससीसाठी ब्रिक्सटन मोटरसायकलची श्रेणी चार लाख ७४ हजार शंभर रुपयांपासून सुरू होते. क्रॉमवेल १२०० ची किंमत ७,८३,९९९ रुपये आहे, तर क्रॉमवेल १२०० एक्सच्या मर्यादित आवृत्तीची (१०० युनिट) किंमत ९,१०,६०० रुपये आहे.

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

0

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या माध्यमातून आपल्या विस्ताराची घोषणा केली. त्यामुळे तिच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये चार पटींनी वाढ होणार आहे. हे ईव्ही क्षेत्राच्या जगातील काही लक्षणीय विस्तारांपैकी एक असून त्यामुळे देशातील ईव्हीची उपस्थिती, सुलभता आणि वाढीला मोठी चालना मिळणार आहे. यातून ओला इलेक्ट्रिकने या क्षेत्रातील आपल्या आघाडीला आणखी बळकटी आणली आहे. सर्व्हिस सेंटरसोबत ३२०० नवीन स्टोअर्स सुरू करून कंपनी व्यापक प्रमाणात ईव्हीचा अंगीकार करण्यास चालना देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे टिअर- १ व टिअर-२ शहरांच्या पलीकडे अगदी भारतभरातील जवळजवळ प्रत्येक शहर व तालुक्यापर्यंत ईव्हीचा प्रवेश होणार आहे. या विस्ताराच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिकने #सेव्हिंग्जवालास्कूटर या आपल्या अभियानात दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे.ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल म्हणाले, आम्ही वचन दिले होते आणि आम्ही आता ते पाळले आहे! आजचा दिवस भारतातील ईव्हीच्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे, कारण आम्ही आमचे नेटवर्क प्रत्येक शहर, गाव आणि तालुक्यापर्यंत विस्तारले आहे. आमच्या सर्व्हिस सेंटरसोबत नवीन स्टोअरच्या माध्यमातून आम्ही ईव्हींची खरेदी व मालकीच्या अनुभवाला संपूर्ण नवा आयाम दिला आहे. आमच्या #सेव्हिंग्जवालास्कूटर या अभियानातून आम्ही नवीन मापदंड स्थापन केले आहेत. आम्ही आणखी वाढत असताना नाविन्यपूर्णतेच्या कक्षा रूंदावत #एंडआईसएज च्या दिशेने देशाच्या प्रवासाला वेग देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”या नेटवर्कच्या व्यापक विस्ताराच्या निमित्ताने ओला इलेक्ट्रिकने एस१ पोर्टफोलियोवर अनेक आकर्षक ऑफर सादर केल्या असून त्या अंतर्गत २५,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळणार आहेत. या ऑफर फक्त २५ डिसेंबर २०२४ रोजी मिळणार आहेत. ग्राहक नवीनच उघडलेल्या आपल्या जवळच्या ओला स्टोअर मध्ये जाऊन एस१एक्स पोर्टफोलियोवर ७,००० रुपयांपर्यंत सरसकट सवलत मिळवू शकतात. याशिवाय ग्राहकांना १८,००० रुपयांपर्यंतचे लाभ मिळू शकतात, यात काही निवडक क्रेडिट कार्डांच्या ईएमआयवर ५००० रुपये आणि मूव्हओएसचे ६,००० रुपयांपर्यंतचे लाभ यांचा समावेश आहे.लिमिटेड एडिशन ओला एस१ प्रो सोना या नेटवर्कच्या प्रचंड विस्ताराचे निमित्त साधून लिमिटेड एडिशन ओला एस१ प्रो सोना ही सादर करण्यात आली असून त्यात अस्सल २४ कॅरेट सोन्याचे घटक आहेत. त्यामुळे सर्वच ओला स्टोअर्समध्ये मोठी गर्दी उसळली आहे आणि ही लिमिटेड एडिशन प्रीमियम स्कूटर घरी नेण्यासाठी ग्राहक # ओलासोनाकॉन्टेस्ट या स्पर्धेत भाग घेत आहेत.कंपनीने अलीकडेच आपल्या गिग आणि एस१झेड स्कूटर श्रेणी सादर करण्याची घोषणा केली. यात ओला गिग, ओला गिग प्लस, ओला एस१ झेड आणि एस१ झेड+ यांचा समावेश आहे. यांची शुभारंभाची किंमत अनुक्रमे ३९,९९९ रु. (एक्स-शोरूम), ४९,९९९ रु. (एक्स-शोरूम), ५९,९९९ रु.(एक्स-शोरूम) आणि १,६४,९९९ (एक्स-शोरूम) आहे. स्कूटर्सच्या या नवीन श्रेणीमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरींसह टिकाऊ, विश्वासार्ह, परवडणारी आणि लवचिक सोल्यूशन्स आहेत. यामुळे ग्रामीण, निम-शहरी आणि शहरी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वापराच्या गरजा पूर्ण होतील. गिग आणि एस१ झेड मालिकेसाठी आगाऊ नोंदणी केवळ ४९९ रुपयांमध्ये खुली असून त्यांचे वितरण अनुक्रमे एप्रिल आणि मे २०२५ मध्ये सुरू होईल.