Thursday, June 26, 2025
spot_img
Home Blog Page 14

शिक्षणाने माणूस आत्मनिर्भर बनतो: नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी

0

शिक्षणाने माणूस आत्मनिर्भर बनतो: नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी

कोल्हापूर/प्रतिनिधी : आपण सर्वजण अशा एका जगात राहतो जो एकाला मागे टाकून दुसरा पुढे जातो. पण ज्ञान हे सर्वांचे आहे आणि सर्वांसाठी आहे. ही धरती संतांची आहे. त्यांनी धर्म आणि करूणा याची शिकवण दिली. आणि शिक्षणानेच माणूस आत्मनिर्भर बनतो, असे प्रतिपादन नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी केले.डॉ.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त नोबेल शांतता पारितोषिक विजेते डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत ते म्हणाले,जनता नेहमीच समस्यांची झुंजत असते आणि त्यातूनच सरकार शिकत असते. जिथे सरकारने आपले जबाबदारी झटकली तिथे गैरसरकारी संघटनांनी आपली भूमिका चौख बजावली आहे.आंतरराष्ट्रीय कायदा असूनही युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. संयुक्त राष्ट्र असूनही त्यांचे त्यावर नियंत्रण नव्हते. एका समस्येचे समाधान झाले की पुन्हा नवीन समस्या उद्भवतात. हे दुष्टचक्र चालतच राहते. पाखंडी धर्मगुरू जे लोकांच्या लोकांच्या बुद्धीशी भेद करतात अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वयंसेवी संघटनांनी काम करणे अपेक्षित आहे.सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे खरं खोटं याचं एक जंजाल मेंदूमध्ये तयार होत आहे. या सर्व गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजेत. आणि समाजातील प्रत्येक घटकाशी आपले अंतरिक आणि भावनात्मक नाते निर्माण झाले पाहिजे. संपूर्ण भारतात एका तासात आठ मुले बेपत्ता होतात. तर एका तासात पाच मुला मुलींचे येऊन शोषण होते. त्यामुळे नैतिकतेने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्या हस्ते डॉ. कैलाश सत्यार्थी यांच्या हिंदी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार जयंत आसगांवकर,सौ. सुमेधा सत्यार्थी, डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह कोल्हापुरातील विविध एनजीओचे प्रमुख, पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू प्रदर्शन २०२५.मंडप शुभारंभ संपन्न

0

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू प्रदर्शन २०२५.मंडप शुभारंभ संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या मंडप शुभारंभ आज मेरी वेदर मैदान येथे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नारळ आणि हार वाढवून शुभारंभ करण्यात आला..यावेळी युवा नेतृत्व कृष्णराज महाडिक यांनी भेट दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी यावर्षी ही हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत आहे. विविध नामांकित कंपन्या आणि देशी जनावरे खाद्य पदार्थांचे स्टॉल शेतीविषयक साहित्य स्टॉल याठिकाणी असणार आहेत.
यावेळी विशाल शिराळे, प्रा.जे.पी.पाटील, सुनील काटकर, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर प्रमोद खोपडे, सुजित चव्हाण,माजी नगरसेवक विलास वास्कर विजय सूर्यवंशी, किरण नकाते, सौ.रूपा राणी निकम, अशोक सिद्धनेर्ली दिलीप दळवी संग्राम निकम उत्तम पाटील राजसिंह शेळके आदी उपस्थित होते.

नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम : डॉ.संजय.डी. पाटील

0

नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम : डॉ.संजय.डी. पाटील

महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या कॉसमॉस बँकेचा चेअरमन म्हणून मी दीर्घकाळ काम केले. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात रोज विविध जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या तरूण उद्योजकांना मी व माझे सहकारी नेहमीच झुकते माप देत राहिलो मराठी माणसाने नोकरीच्या मागे न लागता स्वतंत्र व्यवसाय करावा व आपले आर्थिक साम्राज्य निर्माण करावे असे मला व माझ्या बँकेतील संचालक सहकाऱ्यांना नेहमीच वाटत राहिले.
याच काळात कोल्हापूरचे डॉ संजय डी पाटील हे तरूण उद्योजक भेटण्यासाठी आले.अतिशय शात स्वभाव व साधी राहणी, व्यवसाय वृष्टीसाठी मनात ठोस कल्पना आणि व्यवसायाबद्दल बारीकसारीक तपशील तोंडपाठ असणाऱ्या या तरूणाने स्वतःची ओळख करून दिली मला कोल्हापूरमध्ये ५ स्टार हॉटेल काढायचे आहे त्यासाठी बँकेने वित्तपुरवठा करावा, अशी विनती करून तसा प्रस्तावच या तरूणाने माझ्या समोर ठेवला.
कोल्हापूर शहर व परिसराबद्दल बारीकसारीक तपशील देत हा तरूण म्हणजे डॉ. संजय डी पाटील यांनी कोल्हापूरच्या भविष्यातील विकासाचा जणू ब्लूप्रिंटच माझ्या समोर मांडला. शिक्षणाचा प्रसार होऊन कोल्हापूरातही आयटी फार्मसी, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी आदी क्षेत्रासाठी उत्तम वर्कफोर्स उपलब्ध होईल आणि त्यामुळे कोल्हापूरातही देशी परदेशी गुंतवणूक वाढून कृषीप्रधान असणारे कोल्हापर उद्योगप्रधान होईल हा त्यांनी व्यक्त केलेला विश्वास तयांच्या आत्मविश्वासाबद्दल खात्री देत राहिला.
मुंबई, पुण्याप्रमाणेच कोल्हापूरही उद्योग, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आदींचे केंद्र बनेल आणि त्यासाठीच कोल्हापूरमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधायचा आहे या त्यांच्या प्रस्तावाला बँकेचा चेअरमन म्हणून मी अनुकूल प्रतिसाद दिला पाठोपाठ त्यांचा अर्ज, बॅलन्सशीट आदींचा अभ्यास करून बँकेने त्याच्या प्रस्तावास मान्यता दिली कॉसमॉस बँकेच्या कोल्हापूर शाखेकडून वित्तपुरवठा होईल मात्र एक देखील हप्ता चुकता कामा नये या माझ्या वाक्यावर खळखळून हसत ते म्हणाले एकही हप्ता चुकणार नाही याची मी खात्री देतो आणि त्यांनी ते खरेही करून दाखवले.
कृषी क्षेत्रात रमणाऱ्या डॉ सजय डी पाटील यानी शिक्षणाचा अवाढव्य पसारा समर्थपणे साभाळला प्रत्येक जागी यश मिळवले कोल्हापूरमधील हॉटेल सयाजी हे पचतारांकित हॉटेल अतिशय देखण्या स्वरूपात उभे राहिले त्याच्या उद्‌द्घाटनपसगी झालेल्या कार्यक्रमासाठी त्यानी मला आवर्जून निमत्रण दिले. हे निमंत्रण देताना त्याच्यातील विनम्र वृत्ती पुन्हा एकदा दिसून आली.
हॉटेल सयाजी च्या उ‌द्घाटन कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचा चेअरमन म्हणून सहका-यासमवेत मी हॉटेलला गेलो हॉटेल सयाजी चे देखणे रूप पाहूनच हा प्रकल्प निश्चित यशस्वी होणर याची खात्री मला पटली आणि झालेही तसेच कोल्हापूरसारख्या शहराची पंचतारांकित हॉटेलची गरज वेळीच ओळखून डॉ संजय डी पाटील यानी कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आणि प्रत्येक महिन्यात हप्त्याच्या तारखेच्या आधीच हप्ता भरला जात राहिला बँकेने योग्य ठिकाणी वित्तपुरवठा केला याचे समाधान मनाला झाले आणि एक मराठी तरूण उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घेत आहे याचा आनदही झाला.
वडिलाचा राजकीय वारसा लाभूनही व घरात पूर्ण राजकीय वातावरण असूनही स्वत राजकारणात न जाणाऱ्या डॉ सजय डी पाटील याना याबद्दल मी विचारले असताना सहजपणे ते म्हणाले मला शेतीची आवड आहे शेतीत मी खूप प्रयोग करतो याबरोबरच कोल्हापूर व पचक्रोशीत उत्तम शिक्षण सुविधा निर्माण करून हजारो तरूणाचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी काम करण्याची देखील मला खूप आवड आहे. शेतील मी खूप प्रयोग करतो याबरोबरच कोल्हापूर व पंचक्रोशीत उत्तम शिक्षण सुविधा निर्माण करून हजारो तरूणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी काम करण्याची देखील मला खूप आवड आहे कृषी, शिक्षण आणि उद्योग ही तीन क्षेत्रच मी जीवनाची त्रिसूत्री मानली आहे आणि त्यात मी पूर्ण समाधानी आहे असे सागणाऱ्या डॉ सजय डी पाटील याच्या चेहऱ्यावर झळकणारे समाधान स्पष्टपणे दिसून येत होते हॉटेल सयाजीच्या निमित्ताने त्याचा कॉसमॉस बँकेशी संबंध आला व त्यांनी सधीचे सोने केले त्यामुळेच आता ते युवा पिढीचे रोल मॉडेल बनले आहेत नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम असणाऱ्या डॉ संजय डी पाटील यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा त्याचे ज्ञान, सचोटी, दूरदृष्टी आणि तळमळ यांचा लाभ समाजाला सदैव मिळत राहो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

कृष्णकुमार गोयल माजी चेअरमन कॉसमॉस बँक लि. पुणे.

डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी उद्या सोमवारी सेंटरचे उद्घाटन

0

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितिनजी गडकरी यांच्या हस्ते होणार
डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी उद्या सोमवारी सेंटरचे उद्घाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजकालच्या माहीती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान खुप प्रगत झाले असून याच तंत्रज्ञानासह आत्याधुनिक सेवा आणि सुविधा देण्यासाठी कोल्हापूरात नव्यानेच सज्ज झाले आहे. डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांचे डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि डॉ. राहुल पाटील यांचे अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी सेंटर नागाळा पार्क, कलेक्टर ऑफीस समोर सुरू होत असलेल्या या भव्य सेंटरचे उद्घाटन येत्या सोमवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितिनजी गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहीती डॉ. राहुल पाटील आणि डॉ. नुपूर राहुल पाटील खळतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या बद्दल अधिक माहीती देताना ते म्हणाले डॉ. राहुल पाटील हे रूमेटॉलॉजिस्ट आणि संधिवात तज्ञ असून यांचा संधिवात शास्त्रात गेल्या 7 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून प्रौढ आणि मुलांमध्ये सर्व प्रकारचे संधिवात आणि स्वयंप्रतिकार आजारांवर उपचार करणारे ते विशेषज्ञ असून रूमेटोइड आर्थारायटीस, अॅकीलोझिंग स्पॉन्डिलायटिस, ल्यूप्स (SLE), ऑस्टीयो आर्थारायटीस, गाउट, स्जोग्रेन्स सिंड्रोम, व्हॅस्क्युलायटिस, मायोसिटीस या सर्व उपचारांमध्ये विशेष म्हणून ते उच्च प्रकारच्या वैदयकिय सेवा पूरवतात. जास्तीत जास्त रूग्णांवर अत्याधूनिक सेवेसह प्रभावी उपचार प्रणाली या सेंटरमध्ये राबवण्यात येतात.
यासह डॉ. नुपूर पाटील त्वचारोगतज्ञ असून त्वचा आणि डिव्हीएल मध्ये एन केपी साल्वे नागपूर इथल्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. मुंबईमधून त्यांनी लेझर आणि कॉस्मेटीक डर्मोंटोलॉजीमध्ये फेलोशिप घेतली असून डर्मा लॅब निरोगी त्वचा आणि केसांसाठी सर्व अत्याधुनिक उपचारांसह कोल्हापूरकरांसाठी एक नवीन सौंदर्यशास्त्र क्लिनिक बनणार आहे. केसांच्या वाढीसाठी पी.आर.पी., मिसोथेरपी, जी.एफ.सी., अॅन्टीएजिंग वर येथे आधुनिक उपचार व बोटोक्स, फिलर्स केले जाणार आहेत.
सर्व सौंदर्यसेवा एकाच छताखाली देण्यास अत्याधुनिक प्रणाली सर्व रुग्णांना हे सेंटर नक्कीच समाधानी बनवेल. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न या सेंटरमध्ये केला जातो. क्वालिटीच्या बाबतीत कोणतीही तडजोड येथे केली जात नसून डर्मा लॅबचे सर्व मशिन्स आधुनिक आणि USFDA सर्टीफाईड असून पिगमेंटेशन, पेनलेस लेझर हेअर रिडक्शन, अॅन्टीएजिंग, अॅक्ने सह फिलर्स, बोटोक्स, हेअर फॉल्स या सर्व टिट्रमेंट्समध्ये आम्ही स्पेशालिस्ट आहोत.
गेल्या 3 वर्षांपासून आम्ही कोल्हापूरात प्रॅक्टीस करत आहोत. पण आता कोल्हापूरात जागतिक दर्जाच्या सुविधा घेउन प्रशस्थ आणि मोठया स्ववास्तुत स्थलांतरित होत आहोत. तरि कोल्हापूरकरांसाठी एक नवा कोरा पर्याय डर्मा लॅब आणि आर्थारायटीस अॅन्ड रूमॅटॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाला असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पाटील

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी, खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांची असणार उपस्थितीत पार पडणार डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी समारंभ

0

नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी, खासदार डॉ. श्रीमंत छ. शाहू महाराजांची असणार उपस्थितीत पार पडणार डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी समारंभ

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नोबेल पारितोषिकप्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल व कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे या तीन विद्यापीठांचे कुलपती आणि ६० हून अधिक संस्थांचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच, कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. संजय डी. पाटील यांचा ६१ वा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी ३.३० वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, श्री. ऋतुराज संजय पाटील, श्री. पृथ्वीराज संजय पाटील, श्री. तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. कैलाश सत्यार्थी हे बालमजुरीविरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथील डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी १९८० मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सोडून ‘बचपन बचाओ आंदोलन’ची स्थापना केली. मागील चार दशकांपासून ते पीडित बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झगडत आहेत. ‘बचपन बचाओ’च्या माध्यमातून डॉ. सत्यार्थी यांनी आतापर्यंत १ लाखांहून अधिक बालमजुरांचे व पीडित मुलांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. जागतिक पातळीवर देखील बालकांशी संबंधित सामाजिक प्रश्नांवर सत्यार्थी यांनी आवाज उठवला आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन चाईल्ड लेबर अॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेच्या माध्यमातून डॉ. सत्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. लहान मुलांसाठी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांमध्येही सत्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या समारंभात डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ‘डॉ. संजय डी. पाटील गौरव ग्रंथा’चे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर डॉ. कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. देशभरातील आजी-माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ञ यांनी उच्च शिक्षण धोरणाबाबतचे विचार या ग्रंथात मांडले आहेत.दरम्यान, वाढदिवस समारंभापूर्वी दुपारी १२ वाजता डॉ. कैलास सत्यार्थी हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांशी संवाद साधणार आहेत. हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या या संवाद कार्यक्रमासाठी १०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरमध्ये भारतभरातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस या परिषदेचे आयोजन

0

कोल्हापूरमध्ये भारतभरातील न्युरो सर्जनची राष्ट्रीय एमसीएनएस या परिषदेचे आयोजन

कोल्हापूर : “परिवर्तनशील प्रतिमान, उदयोन्मुख ट्रेंड आणि अमर्यादित विस्तार…” या उद्देशाश अनुसरून कोल्हापूर येथील न्यूरोसर्जन समितीने राष्ट्रीय स्तरावरील मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची परिषद आयोजित केलेली आहे. ही परिषद १४ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे संपन्न होणार असून या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, उत्तर कर्नाटकसह भारतभरतीलच नव्हे तर परदेशातून सुमारे प्रसिद्ध ३०० न्युरोसर्जन सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात मेंदू शस्त्रक्रिया तज्ञ सहभागी होऊन अशा स्वरुपाची मेंदू विकार शस्त्रक्रिया तज्ञांची ऐतिहासिक परिषद कोल्हापूर येथे प्रथमच होत आहे.या परिषदेत मेंदुविकारासंबंधी विशेष वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यक्रम सादर केले जातील. ज्यामध्ये व्याख्याने, परिसंवाद, प्रयोगशाळेतील शवविच्छेदन, व्हिडिओ, आव्हानात्मक केसेस, पोस्टर सादरीकरण आणि माहितीपर मार्गदर्शन यांचा समावेश असलेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. पन्नासहून अधिक स्टॉल्स येथे उभारण्यात येणार आहेत.या परिषदेत दिनांक १४ फेब्रुवारी रोजी ६ विविध विषयांवर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. मेंदूच्या विविध शास्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे.
तर दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीत या परिषदेचे औपचारिक उद्घाटन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. एन.वाय जोशी आणि सचिव डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दिनांक १६ फेब्रुवारी दुपारी २ वाजता या परिषदेचा समारोप होणार आहे.
मेंदू विकार शस्त्रक्रिया संबंधी अद्यवत तंत्रज्ञान, कामकाजातील अडचणी व त्यावरील उपाय, भविष्यातील आवाहने व वाटचाल आदी विषयांवर जगभरातील प्रसिद्ध मेंदूविकार शस्त्रक्रिया तज्ञ एका व्यासपीठावर येवून याबाबत विचार मंथन करतील. कोल्हापूरचे नाव इतर बाबीप्रमाणे आता न्युरो सर्जरी मध्ये हि जागतिक स्तरावर अधोरेखीत झालेले आहे. या परिषदेमुळे पुन्हा एकदा कोल्हापूर न्युरो सर्जरी विभाग उतुंग भरारी घेईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य एमसीएनएस (मिड वेस्ट चाप्टर ऑफ न्यूरॉलॉजिकल सर्जन ) संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहिदास, खजानिस मन्सूरअली सिताब खान, कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. उदय घाटे, न्यूरोसर्जन निलेश बाकळे, न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध मोहिते उपस्थित होते.

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआय.आयटी करिअर कार्यशाळेचे आयोजन

0

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआय.आयटी करिअर कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर आणि KITE-Ai Technologies Pvt. Ltd., Pune यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआय.आयटी करिअर कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीआर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा तावडे,संचालक डॉ. ए.आर.कुलकर्णी,प्राचार्य आर. एस.बगली,समन्वयक भूषण वर्णे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.कार्यशाळेचे उद्घाटन उद्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे कोफोर्ज कोल्हापूर शाखा उपाध्यक्ष मा. सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा कि. तावडे आणि संयुक्त सचिव श्री. सुजय कि. तावडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमधून २५० हुन आधीक बी.फार्मसी आणि एम.फार्मसी विद्यार्थी सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, SAS सॉफ्टवेअर, डेटा एनालिटिक्स आणि फार्माकोव्हिजिलन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यशाळेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले खालील अनुभवी तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सौ. गायत्री शार्दूल -१४+ वर्षांचा अनुभव (क्लिनिकल ड्रग डेव्हलपमेंट व इंडस्ट्री रेडी ट्रेनिंग)
श्री. पीयूष राजपूत – १०+ वर्षांचा अनुभव (क्लिनिकल एनालिटिक्स आणि करिअर डेव्हलपमेंट)
सौ. सुचिता शिंदे – १०+ वर्षांचा अनुभव (मेडिकल कोडिंग आणि कंप्लायन्स)
सौ. प्रतिक्षा सिंग – १३+ वर्षांचा अनुभव (प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि डेटा एनालिटिक्स)
श्री. राहुल जगताप – १५+ वर्षांचा अनुभव (ग्लोबल SAS प्रोग्रामिंग आणि बायोस्टॅटिस्टिक्स)
सौ. गायत्री पंडित – SAS प्रमाणित फार्मसी ग्रॅज्युएट (प्रॅक्टिकल SAS डेमो मार्गदर्शन)
श्री. सूरज शिंदे -१०+ वर्षांचा अनुभव (वेब मॅनेजमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट)

सदरची कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता टीपीओ श्री. भुषण वर्णे – समन्वयक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर वर्ग परिश्रम घेत आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजकुमार बगली आणि संचालक डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उद्योगक्षमतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करत असते. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योगजगताची प्रत्यक्ष माहिती आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यास मदत मिळणार आहे. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून, अशा उपक्रमांमुळे करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व मुलांना नवी दालने खुली होणार आहेत.

एमएसएमई आउटरीच कार्यक्रम अयोजनाने प्रगतीची चाके लहानातून मोठी होत आहेत यात तरुणांना उद्योग करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा _ ललित गांधी

0

एमएसएमई आउटरीच कार्यक्रम अयोजनाने प्रगतीची चाके लहानातून मोठी होत आहेत यात तरुणांना उद्योग करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा _ ललित गांधी

कोल्हापूर/प्रतिनिधी : पंजाब नॅशनल बँकेने आज १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रेसिडेन्सी क्लब, न्यू पॅलेस पोस्ट ऑफिसजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे पीएनबी एमएसएमई एक्स्पोचे आयोजन केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी
होते.यावेळी मंडळ प्रमुख श्री रंजन सिंग मुख्य कार्यालय श्री मनीष जैन एजीएम उपस्थित होते.
यावेळी बोलताना ललित गांधी यांनी या एक्स्पोच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. असे प्रदर्शन नियमितपणे आयोजित करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे प्रमुख म्हणून त्यांनी आजच्या तरुणांना आणि व्यक्सायासाठी उत्साही असलेल्या तरुणांना एमआयडीसीमध्ये उपलब्ध असलेल्या संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले आहे. इच्छुक उद्योजक MIDC च्या पायाभूत सुविधा जसे की औद्योगिक भूखंड, गोदामे किंवा अधिकृत जागा, विश्वसनीय उपयोगिता, व्यवसाय समर्थन सेवा यांचा लाभ घेऊ शकतात, त्यांनी अधोरेखित केले की एमआयडीसी ने आपली प्रक्रिया लक्षणीयरीत्या सुव्यवस्थित केली
आहे, ज्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कालावधी २ वर्षांवरून काही महिन्यांपर्यंत कमी झाला आहे.
यावेळी मंडळ प्रमुख यांनी बोलताना “आमचे लक्ष्य आमच्या ग्राहकांना त्यांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण आर्थिक समाधाने प्रदान करणे आहे”. त्यांनी विविध एमएसएमई योजना/उत्पादने आणि त्यांची गुंतवणूकदार अनुकूल वैशिष्ट्ये आणि उत्पादनांचा उल्लेख केला. त्यांनी पुढे, पीएनबी कर्ज अधिकाऱ्यांशी ऑन स्पॉट सल्लामसलत, आवश्यकतेनुसार योग्य एमएसएमई उत्पादने प्रदान करणे, पीएनबी जीएसटी एक्सप्रेस, पीएनबी ट्रेड ग्रोथ इत्यादी रोख प्रवाह आधारित योजनांमध्ये तत्त्वतः मंजुरीसह झटपट पात्रता तपासणी
पीएनबी जीएसटी एक्सप्रेस अंतर्गत मंजूर क्रेडिट सुविधा किमान १० लाख ते कमाल ५ कोटी आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइन मुद्रासाठी, दिलेले कर्ज तीन श्रेणींमध्ये आहे अ) शिशू ५० हजार, ब) किशोर ५० हजार ते ५ लाख आणि क) तरुण ५ ते १० लाख. शेवटी त्यांनी लोकांना या एक्स्पोला भेट देण्यासाठी आणि बँकेद्वारे प्रदान केलेल्या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

या ऑफरचे प्रमुख ठळक मुद्दे

पीएनवी जीएसटी एक्सप्रेस

खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्रासमुक्त क्रेडिट सुविधा.

• गेल्या १२ महिन्यांतील जीएसटी रिटर्नमध्ये नोंदवलेल्या विक्रीच्या २५% वर आधारित सरलीकृत मूल्यांकन.

• आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता नाही

• आकर्षक व्याजदर

• लागू प्रक्रिया शुल्कावर ५०% सवलत.

• ऑनलाइन क्रेडिट सुविधा किमान १० लाख ते कमाल ५ कोटी आहे.

एमएसएमई प्राइम प्लस

• उत्पादक, व्यापारी, सेवा, कंत्राटदार यांच्यासाठी एकल योजना

• स्पर्धात्मक व्याजदराने १० कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज

• लागू प्रक्रिया/अपफ्रंट फीवर ५०% सवलत.

• लागू बीजी/एलसी कमिशनवर २५% सवलत

• मर्यादा स्वयं वाढ

• ओपन टर्म लोन,

पीएनबी व्यापार वाढ

• व्यापाऱ्यांना ओव्हर ड्राफ्ट आणि नॉन-फंड आधारित सुविधेच्या रूपात रु. 1 कोटी पर्यंतचे कर्ज

• आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता नाही.

• जीएसटी रिटर्न किंवा खात्यातील क्रेडिट समेशनवर आधारित सरलीकृत मूल्यांकन,

• कोणतेही स्टॉक स्टेटमेंट आवश्यक नाही

• स्पर्धात्मक व्याज दर

• प्रक्रिया शुल्क आणि रोख हाताळणी शुल्कात सवलत

• आईएमपीएस/एनईएफटी आणि आरटीजीएस शुल्क माफ

उद्योजक आणि संशोधन करणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय साधत, जिल्हयाला स्मार्ट आणि ऍडव्हान्स बनवण्यासाठी इंडस्ट्री ४.० कार्यक्रम राबविण्यात येणार

0

उद्योजक आणि संशोधन करणार्‍या शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय साधत, जिल्हयाला स्मार्ट आणि ऍडव्हान्स बनवण्यासाठी इंडस्ट्री ४.० कार्यक्रम राबविण्यात येणार

ग्रोक लर्निंग कंपनी आणि सिबिक बिझनेस इन्क्युबेटरचा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हयातील उच्च तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये आयडीया लॅब अटल टिकरिंग लॅब सारखे विविध संशोधनपर विभाग कार्यरत आहेत. या लॅबमधून उद्योग- व्यवसायातील विविध समस्यांबाबत उपाय योजना शोधल्या जातात. मात्र हे उपाय उद्योजक – व्यापार्‍यांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रा. लिमिटेड यांच्यावतीनं दोन्ही क्षेत्रामध्ये समन्वय ठेवून, कोल्हापूर जिल्हयातील व्यापार-उद्योग प्रगत आणि स्मार्ट बनवला जाणार आहे, अशी माहिती ग्रोक लर्निंग प्रा. लिमिटेड कंपनीचे सीईओ नितीन कोमावार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हयातील उच्च तांत्रिक प्रशिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थी आणि संशोधकांकडून व्यापार- उद्योगातील विविध समस्यांवर प्रभावी उपाय योजना शोधल्या जात आहेत. मात्र या उपाय योजना शैक्षणिक स्तरावरच मर्यादित राहतात. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार्‍या उद्योजक- व्यावसायिकांपर्यंत या उपाय योजना पोचत नाहीत. ही दरी कमी करण्यासाठी मुंबईच्या ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड आणि कोल्हापूरच्या सिबीक बिझनेस इन्क्युबेटरच्या वतीनं इंडस्ट्री ४.० डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. त्याचा शुभारंभ देशाचे माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीनं करण्यात आला. या दोन्ही संस्थांद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील आयओटी , एआय, रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्किलिंग आणि इनोव्हेशन हा क्लाऊड बेस्ड प्लॅटफॉर्म सुरू झालाय. त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय पॉलिटेक्नीक मध्ये आयओटी सेन्टर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आलंय. या सेंटर मधून प्रशिक्षणाद्वारे स्किल बेस विद्यार्थी घडवले जाणार आहेत. तसंच कोल्हापूर जिल्हयातील सर्व उद्योग- व्यावसायिकांना सहभागी करून, त्यांच्या कर्मचार्‍यांनाही राेबोटिक्स, एआय यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, असं नितीन कोमावार यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला मोहन भट , मकरंद जोशी , प्रतीक म्हात्रे , उद्योजक पारस ओसवाल, सिबीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत दोडमिसे ,संचालक प्रतिक ओसवाल आणि सुनंदा दोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासकीय शिक्षक असताना खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनची मागणी

0

शासकीय शिक्षक असताना खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनची मागणी

कोल्हापूर/ प्रतिनिधी : कोल्हापूर मधील एस. एम. लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक खाजगी क्लासेस घेतात अशी तक्रार आज कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन तर्फे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
यावेळी शिष्टमंडळाने शिक्षक असतानाही खाजगी क्लास चालवणे हा गुन्हा आहे यामुळे इतर कोचिंग क्लासेस वर याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एस . एम.लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षक श्री ओंकार किरण काळे (एस एम लोहिया कॉलेज),श्री उत्कर्ष शर्मा (पद्माराजे ज्युनिअर कॉलेज)आणि श्री अनिल सूर्यवंशी (एस.एम.लोहिया ज्युनिअर कॉलेज हे तीन शिक्षक कायमस्वरूपी शासकीय सेवेत आहेत असे असताना त्यांनी प्रबोधनी अकॅडमी मध्ये एस. एम लोहिया व पद्माराजे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आम्ही स्वतः तेथे शिकवणार आहोत असे सांगून त्या क्लासमध्ये विद्यार्थी समाविष्ट केले जातात हे शिक्षक शासनाच्या मान्यता प्राप्त पदावर कार्यरत असून त्यांना शासन घोषित संपूर्ण फायदे मिळतात असे असतानाही हे शिक्षक विद्यार्थ्यांना शेजारील प्रबोधिनी क्लासेस मध्ये शिकवतात आणि शासकीय पैशाचा अपहार करतात तरी संबंधित शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिठमंडळात चंद्रकांत यादव, कोचिंग क्लासेस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उदय शीपेकर, शहराध्यक्ष नारायण निरपणकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश ननवरे,बी. एम .पाटील, विद्यानंद उपाध्ये, संदीप सुतार, प्रकाश मोरे, संभाजी सावंत, राहुल टेकाळे, अतुल निंगुरे, अभिजीत पायमल,अमित निगवेकर,किरण मोळे,हर्षल धायगुडे विशाल ढोबळे, सुरेश देसाई आदींंचा समावेश होता.