Friday, July 18, 2025
spot_img
Home Blog Page 129

आमदार जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश – एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू

0

आमदार जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश – एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ताराकींत प्रश्न क्रमांक ६१४०६ या द्वारे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या मागणीला यश मिळाले असून, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांनी दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी ताराकींत प्रश्न क्रमांक ६१४०६ या द्वारे होऊ घातलेल्या राज्य विधिमंडळाच्या मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमपीएससीच्या सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा या मागणीकडे लक्ष वेधले होते. राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा देणारे (MPSC) विद्यार्थ्यांवर नवीन परीक्षा पद्धती लागू केल्या मुळे अन्याय होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करावी व राज्यातील एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी सदरील तारांकीत प्रश्न च्या माध्यमातून केली होती.तसेच राज्यातील MPSC विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरासह संपूर्ण राज्य भर विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केले होते.त्या अनुषंगाने आज अखेर राज्य सरकारला याबाबत विचार करावा लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या अतिशय महत्वाच्या विषयावर तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे विचारणा करून सदरील विषयाला वाचा फोडली होती म्हणून त्यांचेवर सर्वच स्तरावरून विद्यार्थी व पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कितेक एमपीएससी विद्यार्थी यांनी कोल्हापूर उत्तर च्या काँग्रेस पक्षाच्याआमदार श्रीमती जाधव यांना दूरध्नीद्वारे धन्यवाद दिले आहेत .मी कोल्हापूर जनतेचे व राज्यातील हिताचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, कष्टकरी, अपंग, निराधार, कामगार व गोरगरीब सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्या बाबत सरकारला निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून कोल्हापूर जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – थावरचंद गेहलोत

0

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – थावरचंद गेहलोत

कोल्हापूर/प्रतिनिधी : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल तर वेळीच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. हे लक्ष देत असतानाच पर्यावरण संवर्धनासाठी लोक जागृती व लोक सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भैय्या जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिध्देश्वर स्वामी महाराज आदी उपस्थित होते.
गेहलोत पुढे म्हणाले की, संत, ऋषी, मुनी यांनी प्राचीन काळापासून पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद केले आहे. पर्यावरणाच्या मुद्याकडे आपणाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या सर्वांना कटिबध्द व्हावे लागेल. साधु, संतांच्या मार्गदर्शनात समाज आपले आचरण, अनुसरण करतो. या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या साधु संतांनी पर्यावरणाच्या दृष्टीने समाजाला प्रेरित करावे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचेही गेहलोत म्हणाले.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब असल्याचे गौरवोग्दार काढून भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत असे सांगून मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखीन पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे गौरवोग्दारही त्यांनी यावेळी काढले.हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधु संतांच्या वतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.
प्रारंभी काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागय्याजी यांनी तर आभार प्रदर्शन स्वामी परमानंद यांनी केले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या विविध जाती-धर्माच्या साधू संतांचे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न झाले.

मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण, तसेच भाविक यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संत यांचा निर्धार

0

पंचमहाभूत लोकोत्सवाचा चौथ्या दिवशी – अग्नी तत्त्व – संत संमेलन

मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण, तसेच भाविक यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संत यांचा निर्धार

कोल्हापूर/प्रतिनिधी : केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झाले नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. तरी लाखोंच्या संख्येत असलेल्या मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्यासह समाजाच्या सहभागाने झाडे लावणे, प्रत्येक पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे आणि त्याचा पुर्नवापर करणे, कृषी आधारित शेतीस प्रोत्साहन देणे, अशा गोष्टी यापुढीळ काळात कराव्या लागतील. हा धागा पकडत मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार पंचमहाभूत लोकोत्सवात साधू-संत यांनी केला. २३ फेब्रुवारीला (अग्नी तत्त्व) पंचमहाभूत लोकोत्सवात प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या संत संमेलनात देशपातळीवर साधू-संत, मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पंचमहाभूतांचा इतक्या व्यापक स्तरावर आजपर्यंत कुणीच विचार केला नव्हता. हे प्रदर्शन शास्त्रज्ञ, विद्यार्थी, नागरिक अशा प्रत्येक स्तरावर लाभ करून देणारे आहे. इथे येऊन माझ्या ज्ञानात भर पडली. भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने हे संमेलन म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात होणार्‍या ‘जी -२०’ संमेलनाच्या दृष्टीनेही हा लोकोत्सव एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारत आता विश्‍वगुरु होण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे.’’
प्रारंभी प्रास्ताविकात स्वामी परमात्मानंदजी महाराज म्हणाले, ‘‘जागतिक तापमानवाढ यांसह जागतिक स्तरावर पर्यावरणविषयी जागृती करण्याचे काम केवळ भारतच प्राधान्याने करू शकतो. या मठावर भरलेले हे संमेलन म्हणजे भारत विश्‍वगुरु बनण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.’’ आपल्या मार्गदर्शनात प.पू. काडसिद्धेश्‍वर महास्वामिजी म्हणाले, ‘‘देशभरातील साधू-संत यांनी शेतकर्‍यांना देशी गाय घेऊन देण्यात साहाय्य करणे, आश्रम स्तरावर कार्यक्रम करतांना त्यात बी-बियाणे भेट म्हणून देणे, आश्रम स्तरावरील पाणी आश्रम स्तरावरच वापरणे, आश्रमात छोटी शेती सिद्ध करणे, उर्जा बचत करण्यासाठी जे जे शक्य ते सर्व कार्यक्रम राबवणे, चांगली शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार करणे अशा प्रकारची कामे करण्यात पुढाकार घेऊन ते पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होऊ शकतात.’’पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील संतांनी पर्यावरण जागृतीविषयी मोठे कार्य केले असून अनेक अभंगांद्वारे प्रबोधन केले आहे. आम्ही गेल्या १० वर्षांपासून झाडे लावण्याचे काम करत आहोत. इथे उपस्थित असणार्‍या सर्वांना मी देशी झाडे लावण्याचा आग्रह करतो.’’ पंढरपूर येथील ह.भ.प. देवव्रत (राणा) विवेकानंद वासकर महाराज म्हणाले, ‘‘या लोकोत्सवाच्या प्रसंगी आम्ही पर्यावरण रक्षणाचे काम करण्याचे शपथ घेतो, तसेच अशा प्रकारचा पंचमहाभूत लोकोत्सव जिथे जिथे होईल, तिथे तिथे वारकरी संप्रदाय हे कार्य करण्यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही या प्रसंगी देतो.’’
आपल्या मार्गदर्शनात मंजीत सिंह जी म्हणाले, ‘‘या कार्यात महिला आणि युवक यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे.’’ गुंटूर येथील जगद्गुरु श्री. शिवाराथी देशिकेंचा महास्वामीजी या पंचमहाभूत लोकोत्सवातील ज्या ज्या गोष्टी कर्नाटक राज्यात आम्हाला करता येणे शक्य आहे त्या त्या आम्ही करू, असे आश्‍वस्त केले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘या लोकोत्सवामाध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपण शिकून त्याचा जीवनात समावेश करावा. पंचमहाभूतांशिवाय जगणे शक्य नसल्याने पंचमहाभूतांविषयी जागृती करण्याचा निर्धार या निमित्ताने आपण करूया.’’ या प्रसंगी अनेक मठ, मंदिर यांचे प्रमुख, संत, ह.भ.प. यांनी मनोगत व्यक्त केले.

क्षणचित्रे

या संमेलनात साधू-संत यांची गोलाकार आकारात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि प्रत्येकाला त्यांचा मठ-आश्रम या संदर्भात काय कृती आहे आणि भविष्यात काय कृती करेल, याविषयी म्हणणे मांडण्यास सांगितले होते.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामिजी यांचा कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची मूर्ती, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यातील अनेक भागातून आलेल्या संत सत्संगांमुळे एकत्र कुटंब भावना निर्माण झाली होती.
या संमेलनासाठी वारकरी संप्रदाय, तसेच महिला संत यांची उपस्थितीही लक्षणीय होती.

पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बालवर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी – गोवा मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत

0

पंचमहाभूत लोकोत्सवातून युवा आणि बालवर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्याने विकसित करावी – गोवा मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत

कोल्हापूर/प्रतिनिधी : आध्यात्मिक कार्याला समाजकार्याची जोड देण्याची मोठी परंपरा असलेल्या सिद्धगिरी कणेरी मठ पंचक्रोशीत मध्ये संपन्न होत असलेल्या ‘ पंचमहाभूत लोकोत्सवातून ‘युवा आणि बालवर्गामध्ये पर्यावरण विषयक निर्माण झालेली जाणिव ही टप्प्याटप्प्याने विविध उपक्रमातून सातत्याने विकसित होईल ‘ हेच या उपक्रमाचे सर्वात मोठे यश ठरेल ‘अशा शब्दात आपल्या भावना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केल्या . सिद्धगिरी कणेरी मठ परिसरात या उपक्रमाच्या ‘जल – आप वायू – तेज – आकाश ‘ या पंचतत्व विभागाची पाहणी करून तसेच संत संमेलनात त्यांनी सहभाग घेतला . गोवा राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर या संकल्पनेनुसार ‘ आत्मनिर्भर भारत – स्वयंपूर्ण गोवा ‘ ही मोहीम राबवली जात आहे या मोहिमेला गतिमत्ता येण्यासाठी या पंचमहाभूत लोकोत्सव चा मोठाच फायदा होणार आहे त्यासाठी आपण गोवा प्रशासनाचे विविध प्रशासकीय प्रमुख तसेच स्वयंपूर्ण स्वयंसेवक यांना तातडीने या ठिकाणी उपस्थित राहून सर्वतोपरी माहिती घेण्याची सूचना दिली असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली . नावामध्येच गाईचा उल्लेख केलेला गोमंतकीय गोवा राज्याशी सिद्धगिरी मठाचा हा पूर्वापार स्नेहबंद राहीलेला आहे .विद्यमान परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या माध्यमातून तो अधिकच दृढ झालेला आहे आणि या लोकोत्सवातून तो अगदी गतिमानतेने वाढत जाईल त्या आणि या संदर्भाने गोवा राज्याला कायम काड सिद्धेश्वर स्वामीजी आणि या परिसराचे मार्गदर्शन लावावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली . लाखोच्या संख्येत असलेले विविध राज्यातील मठ मंदिरे आणि त्यांचे प्रमुख साधगण यांच्या विचार मंथनातून या ठिकाणी होत असलेली पर्यावरण विषयक जनजागृती आणि भविष्यात या संदर्भाने विविध लहान मोठ्या उपक्रमात आम्ही काळात आपले त्यांचा अनुयायी – भक्तजन यांच्या सहभागाने एक मोठी लोक चळवळ अध्यात्मिक पायावर या लो लोकोत्सवा मधून सुरू होत आहे आणि ही या सर्वांची आपण एक सहभागी साक्षीदार आहोत ही आपणास भावलेली सर्वात मोठी जमेली आहे आणि या क्षणाची आपण साक्षीदार असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचेही मत त्यांनी शेवटी व्यक्त केले . बुधवारी सोलापूर येथे विविध सामाजिक संस्था त्यांच्या वैद्यकीय मित्रपरिवार आणि केलेल्या नागरि स्वीकार करतआज सकाळी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले आणि या सिद्धगिरीच्या सोहळ्या सहभागी होऊन विमानाने त्यांनी गोव्याकडे प्रयाण केले.

आमदार जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश – एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू

0

आमदार जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश – एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ताराकींत प्रश्न क्रमांक ६१४०६ या द्वारे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या मागणीला यश मिळाले असून, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांनी दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी ताराकींत प्रश्न क्रमांक ६१४०६ या द्वारे होऊ घातलेल्या राज्य विधिमंडळाच्या मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमपीएससीच्या सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा या मागणीकडे लक्ष वेधले होते. राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा देणारे (MPSC) विद्यार्थ्यांवर नवीन परीक्षा पद्धती लागू केल्या मुळे अन्याय होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करावी व राज्यातील एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी सदरील तारांकीत प्रश्न च्या माध्यमातून केली होती.तसेच राज्यातील MPSC विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरासह संपूर्ण राज्य भर विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केले होते.त्या अनुषंगाने आज अखेर राज्य सरकारला याबाबत विचार करावा लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या अतिशय महत्वाच्या विषयावर तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे विचारणा करून सदरील विषयाला वाचा फोडली होती म्हणून त्यांचेवर सर्वच स्तरावरून विद्यार्थी व पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कितेक एमपीएससी विद्यार्थी यांनी कोल्हापूर उत्तर च्या काँग्रेस पक्षाच्याआमदार श्रीमती जाधव यांना दूरध्नीद्वारे धन्यवाद दिले आहेत .मी कोल्हापूर जनतेचे व राज्यातील हिताचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, कष्टकरी, अपंग, निराधार, कामगार व गोरगरीब सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्या बाबत सरकारला निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून कोल्हापूर जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सांगितले.

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी ४ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी ४ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी : जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात जुनी पेन्शन योजनेसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला एकत्र करणे माझी जबाबदारी आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून कोल्हापुरातून जुनी पेन्शन लागू करण्याच्या लढयाला सुरूवात करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी शिक्षकांना दिले.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा येथे जुनी पेन्शनसंदर्भात शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. ‘जो जुनी पेन्शन देगा वही राष्ट्र मे राज्य करेगा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
आमदार पाटील म्हणाले, देशभरातील पाच राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून इतर राज्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा शाश्वत आधार जुनी पेन्शन आहे. गेल्या ७० वर्षात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जोरावरच देश प्रगतीपथावर गेला आहे. त्यामुळेच १२० कोटी लोकसंख्या असली तरी देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे जुनी पेन्शनसाठी लढा उभारण्याची आता योग्य वेळ आली आहे. २७ तारखेले राज्याच्या अधिवेशनात जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडून, राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी करणार आहे. ४ मार्च रोजी कोल्हापुरात मोर्चा काढून राज्याच्या अधिवेशनात जुनी पेन्शनचा विषय मंजूर करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधूया.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. जुनी पेन्शन लागू केली तर राज्य दिवाळखोरीत निघेल असे उत्तर दिले. देशभरात महाराष्ट्र राज्य उत्पन्नात एक नंबरला असून फक्त ४ टक्के रक्कम जूनी पेन्शनवर खर्च केली जाते. विद्यमान सरकारने शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबना केली आहे. त्यामुळे ४ मार्च रोजी एकत्रीपणे सरकारला ताकद दाखवूया. दरम्यान शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, दादा लाड, खंडेराव जगदाळे, सी. एम. गायकवाड, राजाराम वरूटे, दत्ता पाटील, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, अतुल दिघे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी ११ वा दीक्षांत समारंभ

0

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी ११ वा दीक्षांत समारंभ

डॉ. दिनकर साळुंके मुख्य अतिथी  शाहिदा परवीन, वसंत भोसले यांना डॉक्टरेट

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनरिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना डी.लीट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११.०० वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून सलग दुसऱ्यांदा नॅकचे “अ’ मानांकन प्राप्त केले आहे. २०१८ साली मानव संसाधन विकास मंत्रालच्या सर्वेक्षणामध्ये विद्यापीठाला ९७ वा क्रमांक प्राप्त झाला होता. उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कारानेही विद्यापीठाला गौरवण्यात आले आहे. इंडिया टुडे व नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे व राष्ट्रीय स्तरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले आहे. महाराष्ट्र इकॉनॉमिक समिट, मुंबई या संस्थेमार्फत ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार व ‘बेस्ट इन्स्टिटयूट’ म्हणून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास गौरविण्यात आले. विद्यापीठाने समाजासाठी व शैक्षणिक फेलोशिपसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अॅकेडमिक साइट्सकडून “युनिव्हर्सिटी ऑफ द इअर २०२२ फॉर ट्रान्सफॉर्मेशनल लर्निंग” म्हणून नुकताच गौरव करण्यात आला आहे.
विद्यापीठाकडून पी.एच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परीक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात आहे. भौतिकोपचार व औषध निर्माण शास्त्र शाखेच्या माध्यमातून आरोग्यसेवेत योगदान देणारे विद्यार्थी घडवले जात आहेत. आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले. दीक्षांत समारंभाच्या नियोजनासाठी विद्यापीठ स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून समन्वयकांमार्फत समितीचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिनकर एम. साळुंके यानी कर्नाटक विद्यापीठातून पदार्थविज्ञान, गणित आणि संख्याशास्त्र विषयात बी.एस्सी, पदार्थविज्ञानमध्ये एमएस्सी पदवी घेतली असून इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स मधून पीएच.डी केली आहे. १९९५ मध्ये नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्समध्ये फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली त्यानंतर देश विदेशातील विविध वैज्ञानिक संस्थावर महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. सीएसआईआरचे चेअरमन, डीपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे विश्वस्त, डीआरडीओच्या लाईफ सायन्स रिसर्च बोर्डचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
वसंत भोसले यांना सन्मान
दीक्षांत समारंभात डी. लिट. पदवीने सन्मानीत केले जाणारे वसंत भोसले हे राज्यातील ज्येष्ठ पत्रकार असून लोकमत या आघाडीच्या मराठी दैनिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील भोजमध्ये जन्म झाला असला तरी महाराष्ट्र व मराठी भाषा यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार, स्त्री मुक्ती चळवळ यामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला असून तंबाखू उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनातही ते सहभागी होते. त्यानंतर ते पत्रकारितेकडे वळले. केसरी, पुढारी, सकाळ व त्यानंतर लोकमत या दैनिकांमध्ये बातमीदार, उपसंपादक, आवृत्तीप्रमुख ते संपादक अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहे. ‘पीपल्स पॉलीटिक्स’ या नियतकालिकाचे संपादकपदही त्यानी भूषवले आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात वृत्तांकन केले आहे. ‘जागर’ हे त्यांचे साप्ताहिक सदर लोकप्रिय आहे. ‘सह्याद्रीचा वारसा’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले असून ‘यशवंतराव चव्हाण- नव महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत.वारांगनासाठी काम करण्याऱ्या ‘संग्राम’ या एनजीओच्या सचिव असलेल्या मीना शेषु यांच्याशी वसंत भोसले यांचा विवाह झाला. या आदर्श जोडप्याने सामाजिक कार्याला वाहून घेताना तीन अनाथ मुलांना दत्तक घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाप्रती असलेले दायित्व आणि आपल्या तत्त्वाप्रती असलेली निष्ठा याची प्रचीती यातून दिसून येते. त्यांनी दत्तक घेतल्या दोन मुली व एक मुलगा आज देशातील मोठ्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेत आहेत.
शहीदा गांगुली यांचा गौरव
जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना सन्मानानीय डी.लीट पदवीने गौरविण्यात येणार आहे. भारत – पाक सीमेवरील मंडी येथे एका मुस्लीम कुटुंबात शाहीदा यांचा जन्म झाला. केवळ ४ वर्षाच्या असताना त्यांचे पितृछत्र हरपले. या काळात अनेकदा दहशतवादी हल्ल्याच्या झळा त्यांना सोसाव्या लागल्या. यातूनच त्यांनी पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि १९९५ मध्ये त्या जम्मू- काश्मिर पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे नेतृत्व करताना दहशतवाद्याविरोधात त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. तब्बल ९० दहशतवाद्यांचा त्यांनी खातमा केला आहे. शहीद जवानांचे कुटुंबीय, अनाथ आणि विधवा यांच्यासाठी त्या काम करतात. महिलांवरील अत्याचाराविरोधातील त्या आवाज बनल्या असून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात.ब्रिगेडियर जी. गांगुली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. उत्कृष्ट तपास अधिकारी, उत्तम गिर्यारोहक, नियमित मॅरेथान रनर, योग प्रशिक्षक आणि मोटीव्हेशनल स्पीकर अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. शाहिदा परविन चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात महिला सबलीकरणासाठी त्या काम करतात. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री’, ‘डीजीपी कॉमेंडेशन कार्ड’,’फिल्म टुडेकडून अचिव्हर्स अवार्ड’, ‘ग्लोबल वुमेन लीडर’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
५२० विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
अकराव्या दीक्षांत समारंभात एकूण ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ८ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. डॉ नवनाथ शंकर पडळकर या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठ एक्सलन्स इन रिसर्च अवार्ड जाहीर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वागत केले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिल्या जाणाऱ्या पदव्यांची माहिती दिली.

उद्योग मंत्री उदय सामंत आज पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट देणार

0

उद्योग मंत्री उदय सामंत आज पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट देणार

कोल्हापूर/ प्रतिनिधी : उद्योग मंत्री उदय सामंत आज बुधवारी जिल्हा दौऱ्यावर येत असून पंचमहाभूत लोकोत्सवाला भेट देणार आहेत. त्यांचा कोल्हापुर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.आज बुधवार, दि. २२फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री क्षेत्र सिध्दगिरी कणेरी मठकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान, कणेरी मठ, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रमानिमित्त विशेष परिषद, परिसंवाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ) दुपारी १२.१५ वाजता कणेरी मठ येथून विमानतळकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता विमानतळ येथे आगमन व विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.

कणेरी मठावरील सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल – पद्मश्री डॉ. बावस्कर

0

जीवन असे जगावे कि मृत्युला देखील हेवा वाटेल – पद्मश्री डॉ. बावस्कर

कणेरी मठावरील सुमंगलम लोकोत्सव जगाला आरोग्यदायी दिशा देणारा ठरेल – पद्मश्री डॉ. बावस्कर

कोल्हापूर/प्रतिनिधी : सिद्धगिरी मठ, कणेरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव येथे पहिल्या दिवशीच्या आरोग्य विषयक सत्रात पहिले पुष्प गुंफताना जागतिक किर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “ आज अन्न,वस्त्र, निवारा या गरजा भागवण्याकरिता अनेक साधने आहेत, तसेच शैक्षणिक गरजा हि पूर्ण करण्यासाठी विविध साधने आहेत, पण आरोग्य विषयक संपन्नता हि बाजारात कुठे हि विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे. लहान बाळाची बौद्धिक वाढ हि किमान पाच वर्षापर्यंत होत असते, त्यामुळे या काळात त्याला पाळणा घर अथवा इतरांच्याकडे सोपवणे योग्य नाही, पाच वर्षापर्यंत त्याला आईचा सहवास मिळणे त्याच्या बौद्धिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आजच्या फास्टफूडच्या अतिरिक्त सेवनाने आरोग्याचा तोल ढासळून तणाव पूर्ण जीवन वाढत आहे. माणसाला अनेक प्रकारची व्यसने आज जडली आहेत, यात केवळ दारू, सिगारेट, तंबाखू अशी व्यसने प्रचलित असली तरी याशिवाय हि अनेक व्यसने आहेत, अगदी खोट बोलणे यासारखी व्यसने आहेत. आज मधुमेह, कमी वयातील ह्रदयविकारांचे वाढते प्रमाण, अनेक आजारांचे प्रमाण हे व्यायामाच्या आभावाची लक्षणे आहेत. शाररीक व्यायामासोबत मानसिक स्वास्थ्य हि सदृढ होणे गरजेचे आहे. आजच्या मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे हि शरीराचे न भरून येणारे नुकसान होत आहे, ते दुर्लक्षून चालणार नाही. मोबाईलच्या वापरामुळे कानाच्या कॅन्सरसोबतच माणसातील संवाद अतिशय दुर्मिळ होत आहे. घरातील माणसे या मोबाईल मुळे अगदी घरात होणारा संवाद हि दुर्मिळ होत आहे. याशिवाय स्मृतीभ्रंश सारख्या समस्या वाढत आहेत.
सिद्धगिरी मठावर होणारा पर्यावरण व आरोग्याचा जागर हा जगाला परिपूर्ण आरोग्याची दिशा देणारा ठरणार आहे. नैसर्गिक सोई सुविधा,आहार विहार विचार आचरणात आणल्यास चांगल्या जगण्या बरोबरच सुखद मृत्यू देवू शकतो. आरोग्य हे बाजारात विकत मिळत नाही ते स्वतःलाच कमवावे लागते त्यामळे वेळीच पर्यवरण व आरोग्याकडे लक्ष द्या अन्यथा विनाश व्हायला खूप वेळ लागणार नाही असा इशारा दिला. तसेच आठवड्यातून किमान एक दिवस मोवाईलचा उप्वार आमलात आणावी, अतिरिक्त विचाराना विराम देवून अध्यात्म ज्ञान याचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास मदत होईल.” असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी मुख्य मंडपात आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर सुरेंद्र जैन, हरीश बोटले , विनय हसबनीस, प्रकाश पाटील उपस्थित होते. डॉ. संदीप पाटील पाटील यांनी यावेळी स्वागत केले. यावेळी सुमंगलम उत्सवाला भेट देणाऱ्या असंख्य लोकांनी या व्याख्यानाचा लाभ सभामंडपासोबतच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून घेतला.

भारताचा विश्वकल्याण विचार असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊच – शास्त्रज्ञ, इस्रो एस्.व्ही. शर्मा

0

पंचमहाभूत लोकोत्सवाचा दुसरा दिवस प्रथम सत्र ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्र                                   

भारताचा विश्वकल्याण विचार असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊच – शास्त्रज्ञ, इस्रो एस्.व्ही. शर्मा

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषी,मुनी यांनी जे शोध लावले आहेत केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत. आपल्या प्रत्येकाला काळजी आहे की पर्यावरणाचे यापुढील काळात कसे होइल; मात्र भारताला वैश्विक विचाराचा पाय असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ, असा विश्‍वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला. ते पंचमहाभूत लोकोत्सवात २१ फेब्रुवारीला ‘आकाशतत्त्व-युवा’ चर्चासत्रात बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल, ‘एन्.सी.एस्.टी.’चे अध्यक्ष हर्ष चौहान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज, पेजावर येथील विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामिजी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी उपस्थित होते.
याप्रसंगी राजस्थान येथील पू. अभयदासजी महाराज म्हणाले, ‘‘इथे सहभागी लोक भाग्यवान आहेत की अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. श्री क्षेत्र सिद्धगिरीचे कार्य अद्भूत असून संत काय करू शकतात याची प्रचिती या निमित्ताने येते.राष्ट्रीय हरित लवादाचे ए.के. गोयल म्हणाले, आज देशातील ६० टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही, अशी स्थिती आहे. देशात सर्वत्र आज कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. देहलीसारख्या ठिकाणी तीन अतिभव्य कचर्‍याचे डोंगर आहेत. सरकार काही करेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता नागरिकांनाच पुढाकार घेऊन कृती करावी लागेल.
एन्.सी.एस्.टीचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले, ‘‘आदिवासी लोकांसाठी निसर्ग आणि समाज हे वेगळे नसून ते एकच समजतात. ते कधीही भूमीचे तुकडे पाडत नाहीत. पंचमहाभूतांचे संवर्धन केल्यानेच विश्‍वाचे कल्याण होणार आहे.पेजावर येथील विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामिजी म्हणाले, ‘‘पंचमहाभूतांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण आकाशात अनेक उपग्रह पाठवले; मात्र त्यातील अनेकांचे काम झाल्याने ते आता कचरा म्हणून अवकाशात आहेत. तरी अशा गोष्टींवर आपण योग्य त्या उपाययोजना काढल्या पाहिजेत.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘‘तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारे, अग्निसारखे तेजस्वी, वायूसारखे प्रवाही, आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारे असे व्यापक व्हावे.’’ बुधवारी उद्योग संमेलन आयोजन पंचमहाभूत लोकोत्सवात बुधवारी उद्योग संमेलनाच्या आयोजन करण्यात आले असून यामध्ये कोल्हापुरातील सर्व उद्योग संस्था तसेच केंद्र राज्य सरकारचे उद्योग विषयक सचिव प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी याचा लाभ सकाळी ११ ते २ यावे सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.आज पासून सुरु झालेल्या देशी जनावरे आणि गाढव प्रदर्शनासही मोठा प्रतिसाद लाभत आहे.