पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोजिमाशि पतपेढीच्या नूतन संचालकांचा सत्कार
कागल/प्रतिनिधी : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतपेढीच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार झाला. राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार जयंत आसगांवकर यांच्यासह संचालकांचा सत्कार यावेळी झाला.
आमदार जयंत आसगांवकर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, के. के. पाटील, उदय पाटील, किरण पास्ते, राजेंद्र माने, अभिजीत गायकवाड, एस. डी. जरग, संजय पाटील, विलास पोवार, श्री. गोंधळी सर, शंकरराव संकपाळ, नंदू घोरपडे, बाळासाहेब लोखंडे, अमर कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निवडून आलेल्या राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच्या नूतन संचालक मंडळातील गजानन काटकर, राजेंद्र कारंडे, महादेव चौगुले, हिंदुराव डोंब, कृष्णात पाटील, खंडेराव पाटील, दिलीप पाटील, धनाजी पाटील, सरदार पाटील, सुनील पाटील, जयसिंग पवार, शिवाजी लोंढे, रेखा रावराणे, सुप्रिया शिंदे, उमेश माळी, विठ्ठल लटके आदींचा सत्कार झाला.