अजिंक्य रहाणेची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट
अतिग्रे/प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सपत्नीक संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय घोडावत यांनी त्यांचे स्वागत केले.भारताचा मध्यम फळीतील फलंदाज, माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने संजय घोडावत विद्यापीठातील शैक्षणिक व क्रीडा सुविधांची माहिती घेतली. इंटरनॅशनल स्कूल,पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट,आयआयटी-मेडिकल अकॅडमी व क्रीडा क्षेत्रात सुरू असलेल्या घोडदौडी बद्दल प्रशंसा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की येथील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रा संबंधित वातावरण व सोयीसुविधा उत्तम आहेत. सर्व सोयी नियुक्त बांधण्यात आलेल्या क्रिकेट स्टेडियम मुळे येणाऱ्या काळात येथून उत्तम क्रिकेटपटू घडतील अशी अशा व्यक्त केली.यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्याने सुसंवाद साधला.याप्रसंगी विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,प्राचार्य डॉ.विराट गिरी, प्राध्यापक,विद्यार्थी,कर्मचारी उपस्थित होते.