Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यादत्त जयंतीनिमित्त नेहरूनगर दत्त मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

दत्त जयंतीनिमित्त नेहरूनगर दत्त मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

दत्त जयंतीनिमित्त नेहरूनगर दत्त मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापुर/प्रतिनिधी : दत्त जयंती उत्सवानिमित्त शहरातील सर्वच दत्त मंदिरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.येथील नेहरुनगरातील दत्त मंदिरात मंगळवारपासून (दि. १९) सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. मंगळवारी (दि. १९) रात्री ८ वा. योगीराज समर्थ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, बुधवार (दि. २०) भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम, गुरुवार (दि. २१) साई भक्त मंडळ भजन, शुक्रवार (दि. २२) सद्‌गुरू संगीत सोंगी भजन, शनिवार (दि. २३) संतसंग भजनी मंडळ, कर्नाटक, रविवार (दि. २४) स्वामी समर्थ सोंगी भजन मंडळ, सोमवार (दि. २५) दत्त माऊली महिला भजनी मंडळ असे कार्यक्रम होतील, तर मंगळवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा व महाप्रसाद वाटप होणार आहे. यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम होणार आहेत.यासाठी किरण रणदिवे,अतुल हासुरकर,उमेश रणदिवे,किरण रणदिवे,विधायक तरुण मंडळ कार्यकर्ते यांचे सहकार्य मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments