Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यागर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद

गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद

गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या, जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने ९ ते २० वर्षे वयोगटांतील मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे रविवारी आयोजन केले होते. यामध्ये ५५० मुलींना मोफत लसीकरण करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून हे लसीकरण सुरू असून, आतापर्यंत १५०० मुलींनी याचा लाभ घेतला आहे. कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन इंडिया, रिसर्च स्टडिज ओडिशनल प्रोजेक्टस्चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नुपूर खरे यांच्या सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. याचा ५५० मुलींनी लाभ घेतला.
लसीकरणात नागोजीराव पाटणकर महाविद्यालयातील ९० मुलींनी लसीकरण करून घेतले. आतापर्यंत कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन ऑफ इंडियाकडून २८ हजार मुलींना ही लस मोफत दिली आहे.यावेळी डॉ. राधिका जोशी, डॉ. नंदकुमार जोशी, डॉ. सुरज पवार, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. आशा शितोळे, डॉ. उन्नती सबनीस, शोभा तावडे, डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments