Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याघोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

घोडावत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ९ व ७.५० लाखाचे पॅकेज

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी विनय सारडा याची बंगळुरू स्थित इन्फाबेट्स या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर या पदावर वार्षिक नऊ लाख पॅकेज सह निवड झाली. तर अपेक्षा शेट्टी हिची सेल्स फोर्स या हैदराबाद स्थित कंपनीत असोसिएट टेक्निकल सपोर्ट इंजिनियर या पदावर वार्षिक साडेसात लाख पॅकेज सह निवड झाली. यासाठी विभागाचे डीन डॉ. बी. सुरेश, विभाग प्रमुख प्रा. दीपिका पाटील व सर्व प्राध्यापकांनी त्यांना मार्गदर्शन केले.तसेच विद्यापीठातील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत देखील मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
याबद्दल घोडावत शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,अकॅडमीक डीन डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी सर्व प्राध्यापकांचे व टीपीओचे संचालक डॉ.स्वप्नील हिरीकुडे यांचे कौतुक केले आहे.तसेच विनय व अपेक्षा हिचे विद्यापीठाच्या वतीने विश्वस्त विनायक भोसले यांनी अभिनंदन करत तपुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments