महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथील एलईडी स्क्रीनचे उदघाटन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराकडे मा. श्रीमंत संभाजीराजे छत्रपती याच्या विशेष प्रयत्नातून केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून देवस्थान समितीस निधी मंजूर झाला होता. त्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये मंदिर परिसरामध्ये बोसी कंपनीची साऊंड सिस्टिम बसवण्यात आली होती. आता दुसरा टप्पा मंदिर परिसरामध्ये ८*१२ फूट मापाच्या चार एलईडी स्क्रीन बसवण्यात आल्या आहेत. सदर स्क्रीन विद्यापीठ वाहनतळ, उत्तर घाटी दरवाजा, मंदिर परिसर व बिंदू चौक या चार ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. या स्क्रीनवर मंदिरातील सदर स्क्रीनचे उद्घाटन मा. श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा प्रशासक देवस्थान समिती राहुल रेखावार देवस्थान समिती सचिव सुशांत बनसोडे ,नियोजन समिती सदस्य संजय पवार व अंकुश निपाणीकर उपस्थित होते.