उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागतच्या निमित्ताने फलकांनी शहर झळकले
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर सत्कार व जाहीर सभा कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्हा शहर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वतीने उद्या १० सप्टेंबर २०२३ रोजी येथील तपोवन मैदानावर होत आहे. यानिमित्त कोल्हापूर मधील सर्व रस्ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्वागताच्या फलकांनी झळकले आहे. शिवाय संभाजीनगर ते तपोवन मैदान इथपर्यंत शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व नामदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या आहेत.ज्या लक्षवेधी असून संभाजीनगर ते तपोवन मैदान वरील रस्ता हा या फलकांनी उजळून निघालेला आहे.
शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडेही ठीक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे संभाजीनगर पासून कोल्हापुरातील आजूबाजूचा परिसर हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताच्या फलकांनी झळकलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची जोरदार तयारी कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून यासाठी तपोवन मैदानावर भव्य असा मंडप उभा करण्यात आलेला आहे. शिवाय लाखोंच्या संख्येने लोक या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याने तशी तयारी ही तपोवन मैदानाच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण शहर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताच्या निमित्ताने फलकांनी झळकलेले आहे.यात नामदार हसन मुश्रीफ यांनी हात जोडून स्वागत करणारा फलक लक्षवेधी ठरत आहे.