Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यासकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित

कोल्हापूर/प्रतिनिधी : सकल मराठा समाज -कोल्हापूर यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर व मंत्री महोदय हसन मुश्रीफ तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर सकल मराठा समाज यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चा व आश्वासनाने माननीय पालकमंत्री दीपक केसरकर व मंत्री मुश्रीफ यांनी १९ सप्टेंबर २०२३ म्हणजे गणेश जयंतीपूर्वी मुंबई येथे मंत्रालयामध्ये सकल मराठा समाज आरक्षणाबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन सर्वानुमती घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक १० सप्टेंबर २०२३ रोजी स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत सरकारकडून दिलेला शब्द जर नाही पाळला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
सकल मराठा समाजाच्या बैठकीस श्री. वसंतराव मुळीक, आर के पवार ,दिलीप देसाई , बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बाबा इंदुलकर, अनिल घाडगे, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगिरे, मयूर पाटील, काका पाटील, काका जाधव, अमर निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments