Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यापरिख पूल व खालील रस्ता चांगला करावा अन्नत्याग आंदोलन सुरू

परिख पूल व खालील रस्ता चांगला करावा अन्नत्याग आंदोलन सुरू

परिख पूल व खालील रस्ता चांगला करावा सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांच्यासह सहकाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

कोल्हापूर/प्रतिनिधी : वाहतुकीसाठी निकृष्ट दर्जाचा रस्ता आणि वरून जाणारी रेल्वे यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास सध्या परिख पुलाखालून करावा लागत आहे.कधीतरी या मार्गावर रेल्वे कोसळून अपघात झाल्यावर रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार का?असा प्रश्न विचारत याला जबाबदार कोण रेल्वे प्रशासन याची जबाबदारी घेत नाही म्हणूनच परिख पूल खालील रस्ता व त्यावरील रेल्वेचे बांधकाम त्वरित चांगल्या दर्जाचे करावे व याकडे लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी केली आहे.या मागणीसाठी त्यांनी शहीद मेजर सत्यजित शिंदे नेसरीकर मार्ग या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज शुक्रवारी परिख पूल नूतनीकरण समितीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
सकाळी ७ वाजता आंदोलनास सुरुवात झाली आहे.सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे. बारा तास अन्नत्याग करून लक्ष वेधण्यात येत आहे.
परिख पुलाखालील रस्ता वाहतुकीसाठी अधिकृत रस्ता नाही तो रेल्वे प्रशासनाने पाणी जाण्यासाठी केलेला मार्ग आहे. मात्र सध्या या मार्गावरून जीवघेणी वाहतूक नागरिकांकडून गेली कित्येक वर्षापासून चालू आहे. याकडे वारंवार लक्ष वेधले गेले आहे मात्र रेल्वे प्रशासनाने एखादा अपघात झाला तर जबाबदारी झटकण्याचे काम केलेले आहे. शिवाय लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही यासाठी दखल घेतली जात नाही त्यामुळे हा रस्ता ताबडतोब चांगल्या पद्धतीचा करावा आणि रेल्वे पुलाच्या खाली असणारे निकृष्ट दर्जाचे बांधकाम हेही चांगल्या पद्धतीचे करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी आंदोलनामध्ये मयूर गोवा वाला, कृष्णात वरुटे, राहुल चौधरी यांच्यासह अन्य सहकारी सहभागी झाले आहेत. फिरोज शेख यांनी याआधी कोल्हापूरमध्ये रस्त्यांवर आजूबाजूला नागरिक थुंकतात त्यावरही आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे.मात्र याकडे लक्ष दिले गेलेले नाही तरी हा रस्ता चांगला करावा आणि पुलाचेही बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments