घोडावत विद्यापीठात फोकस फोटोग्राफी स्पर्धा- प्रदर्शनाचे उदघाटन
जयसिंगपूर/प्रतिनिधी : घोडावत विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंवाद विभागाने आयोजित केलेल्या फोकस फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन २८ ऑगस्ट रोजी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट आदित्य वेल्हाळ, विश्वस्त विनायक भोसले, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ.बी.एम. हिरडे॔कर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,अकॅडमिक डीन डॉ.व्ही.व्ही कुलकर्णी, लिब्रल आर्ट्स डीन डॉ. उत्तम जाधव, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी फोटो जर्नलिस्ट आदित्य वेल्हाळ यांनी फोटोग्राफी आणि पत्रकारिता या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, फोटोग्राफी करण्यासाठी वाचन हे खुप महत्वाचे आहे.छायाचित्रकाराला सामाजिक भान असणे गरजेचे आहे.त्यांनी स्वतःची काही निवडक छायाचित्रे विद्यार्थ्यांना दाखवून त्यातील बारकावे समजुन सांगितले. यावेळी विभागातील विदयार्थ्यां सोबतच स्पर्धक विद्यार्थी देखील उपस्थित होते.
क्लाऊड फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, स्ट्रीट फोटोग्राफी या विषयातील छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. या विषयातील वेगवेगळी छायाचित्रे प्रेक्षकांना भारावून टाकत आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. हे प्रदर्शन १सप्टेंबर पर्यंत ९ ते ५ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. यासाठी स्पर्धा समन्वयक सुमित कदम, पूजा पवार,विभाग समन्वयक जयप्रकाश पाटील परिश्रम घेत आहेत