Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूर भूलतज्ञ संघटनेच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर भूलतज्ञ संघटनेच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर भूलतज्ञ संघटनेच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापुरातील भूलशास्त्र संघटनेच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी २६ ऑगस्ट आणि रविवारी २७ ऑगस्ट रोजी ही वैद्यकीय परिषद डॉ. डी.वाय पाटील मेडीकल कॉलेज, कसबा बावडा येथे होणार आहे, अशी माहिती भुलतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी जाधव यांनी पत्रकार पत्रकारांशी बोलताना दिली.
या वैद्यकीय परिषदेमध्ये भूलशास्त्रासंबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेस महाराष्ट्रासह देशभरातून दोनशेहून अधिक भुलतज्ञ सहभागी होणार आहेत. अशा प्रकारची राष्ट्रीय परिषद घेण्याचा मान हा पहिल्यांदाच कोल्हापूरच्या संघटनेला मिळालेला आहे.तसेच या परिषदेस राष्ट्रीय भुलतज्ञ संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. मनोज कुमार सिन्हा, सचिव डॉ.सुखमिंदर जित सिंग बाजवा, तसेच पदाधिकारी डॉ. मनीषा काटीकर, डॉ.नवीन मल्होत्रा,डॉ. पंकज गुप्ता उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे उद्घाटन रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. पत्रकार परिषदेस कोल्हापूर भूलतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.शिवाजी जाधव,सचिव डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. शितल देसाई,डॉ. सचिन कुंभार, डॉ. संगीता पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments