Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याश्रीकृष्णच प्रत्येक जीवात्म्याचा सखा – मयूर गुरुजी श्रीमद भागवत कथा सप्ताहाची आज...

श्रीकृष्णच प्रत्येक जीवात्म्याचा सखा – मयूर गुरुजी श्रीमद भागवत कथा सप्ताहाची आज सांगता

श्रीकृष्णच प्रत्येक जीवात्म्याचा सखा – मयूर गुरुजी श्रीमद भागवत कथा सप्ताहाची आज सांगता

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रीकृष्णच प्रत्येक जीवात्म्याचा परम सखा असल्याचे मयूर गुरुजी यांनी आज सांगितले.येथील लक्ष्मी नारायण मंदिर व्हीनस कॉर्नर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा यज्ञातील सहावे पुष्प मयूर गुरुजीनी वाहिले.यामध्ये श्रीकृष्णांच्या इतर विवाहाच्या व १६ हजार १०० सख्यांच्या विवाहाची कथा, नरकासुर वध, जरासंघाचा वध इत्यादी अनेक कथांचा समावेश झाला. प्रत्येक कथेतून दिव्य बौद्ध देत गुरुजींनी आजच्या पिढीस उत्तम संदेश दिले.
उत्तम मैत्रीची साक्ष परम सखा असणाऱ्या कृष्णाबद्दल प्रेम निर्माण केले. भृगू ऋषींची कथा, भस्मासुराची आणि शिव शंकराच्या कथेतून जीवन जगण्याचे सुलभ मार्ग गुरुजींनी विस्तृत केले. आज मैत्री दिनानिमित्त कृष्ण-सुदामा मैत्रीचे पर्व उलघडताना श्रीकृष्ण हाच जिवात्म्याचा परम सखा असल्याचे निरुपण गुरुजींनी केले. दरम्यान, सप्ताहाची उद्या सांगता होत असल्याने भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आजचे कार्यक्रम – कथा – दुपारी ३.३० श्री भागवताचे मंगल महोत्सव, तुलादान सायंकाळी ७.३० आरती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments