Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यालक्ष्मी नारायण मंदिराच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट भागवत कथांचे आयोजन

लक्ष्मी नारायण मंदिराच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट भागवत कथांचे आयोजन

लक्ष्मी नारायण मंदिराच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट भागवत कथांचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : व्हीनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिराच्या वतीने उद्यापासून आठवडाभर भागवत कथांचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन मयूर कुलकर्णी यांनी आज केले.अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सुरवात होत आहे. राजस्थानी महिला मंडळ आणि लक्ष्मी नारायण युवा मंचचे यासाठी सहकार्य लाभले आहे. यामध्ये उद्या सकाळी ९.३० वाजता देवता स्थापन, ध्वजारोहण, तुळशी पूजन, गोपूजा, दुपारी १.३० वाजता राधाकृष्ण मंदिर येथून शोभायात्रा निघेल. ३.३० वाजता कथा वाचन होईल. सायंकाळी ७.३० वाजता आरती होईल. यावेळी अध्यक्ष श्रीनिवास मालू, उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सदस्य संजय दायमा, योगेश मोदी व पुजारी विष्णुदास दायमा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments