Thursday, November 21, 2024
Home ताज्या फोर बाय फोर ऑफ रोडिंग स्पर्धेत भल्ला, हेरे, रेड्डी, विनय, पाटील, वोरा,...

फोर बाय फोर ऑफ रोडिंग स्पर्धेत भल्ला, हेरे, रेड्डी, विनय, पाटील, वोरा, राणे ठरले विजेते

फोर बाय फोर ऑफ रोडिंग स्पर्धेत भल्ला, हेरे, रेड्डी, विनय, पाटील, वोरा, राणे ठरले विजेते

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : वेसरफ (गगनबावडा) येथील आजरीज इको व्हॅली येथे पार पडलेल्या फोर बाय फोर ऑफ रोडिंग स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी पार पडली आणि निकाल जाहीर होताच विजेत्या स्पर्धकांनी भर पावसात जल्लोष केला.
गेल्या दोन दिवसांपासून आजरीज इको व्हॅलीमध्ये फोर बाय फोर जीपच्या ऑफ रोड स्पर्धा पार पडल्या. धो धो कोसळणाऱ्या पावसात खेळाडूंचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
स्पर्धेतील गटवार विजेते असे – महिला – प्रेरणा भल्ला, ऐश्वर्या धुमाळ-देशमुख (पुणे), स्त्री-पुरुष – सौ. व श्री. सौरभ हेरे, (पुणे), क्लासिक – वैभव रेड्डी, सद्दाम (गुलबर्गा), विनयकुमार, विक्रम गौडा (हसन), एसयूव्ही विनय एच, सचिन (गुलबर्गा), एक्स्पर्ट पेट्रोल – यशराज, पार्थ पाटील (कोल्हापूर), महेश बिरामे, गिरीश नायडू, एक्स्पर्ट डिझेल – निकुंज वोरा, सूरज शिंदे (पाचगणी), के. पी. रेड्डी, वर्धन रेड्डी (हैदराबाद), मॉडिफाय पेट्रोल – उमेश राणे, सुमित पाटील (मुंबई), मॉडिफाय डिझेल – रवी भल्ला (पुणे), अभिजित धुमाळ (पुणे), सर्जेराव कवडे (पुणे), निलेश झेंडे. डेअरडेव्हील सन्मानाचे मानकरी मनोज बिराजदार, सचिन गडशेट्टी (विजापूर) ठरले, तर ब्रेव्ह हार्ट या पुरस्काराने रमेश आहुजा (पुणे) यांना गौरवण्यात आले.
परीक्षक म्हणून आयुब खान, रोहित गावडा, संतोष एच. एम, अभिजित बोगार, पल्लवी यादव, प्रशांत काशीद रणजित खोपडे, रूपेश भोसले, प्रताप माने यांनी काम पाहिले. संयोजन संदीप पाटील, साई संकपाळ, विनायक शिंदे, संतोष गवस यांनी केले. आयोजन अश्विन शिंदे, कृष्णकांत जाधव यांनी केले. राजशेखर आजरी, राजनंदन आजरी व ऋग्वेद आजरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी बाहेरील प्रेक्षकांशिवाय स्थानिक प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लवकरच पुढील स्पर्धांचे नियोजन
पहिल्याच ऑफ रोडला स्पर्धेला मिळालेल्या स्पर्धेनंतर लवकरच आजरीज इको व्हॅली येथे डर्ट बाईक, एटीव्ही रेसिंग, कार रेसिंग (ऑटो क्रॉस) अशा स्पर्धांचे आयोजन करणार असल्याची माहिती ऋग्वेद आजरी यांनी दिली.
हंपी येथे मोफत प्रवेश मिळालेले खेळाडू
विजयनगर येथे उत्सव द हंपी या ९ ते ११ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी गगनबावडा येथील विजेते निकुंज वोरा, यशराज पाटील, रवी भल्ला, वैभव रेड्डी, प्रेरणा भल्ला आणि उमेश राणे यांना विना प्रवेश शुल्काशिवाय प्रवेश मिळेल, तर शिवाजी मोहिते यांच्या वतीने पुढील स्पर्धेसाठी रोख रकमेची पारितोषिके घोषित करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments