Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूरातील स्त्रीरोग तज्ञ ङाँ. अल्पना चौगूले यांच्या"शिवराज्यभिषेक" चित्राचे छत्रपती संभाजीराजे ,छत्रपती यूवराज्ञी...

कोल्हापूरातील स्त्रीरोग तज्ञ ङाँ. अल्पना चौगूले यांच्या”शिवराज्यभिषेक” चित्राचे छत्रपती संभाजीराजे ,छत्रपती यूवराज्ञी संयोगिताराजे यांच्या हस्ते रायगङावर अनावरण

कोल्हापूरातील स्त्रीरोग तज्ञ ङाँ. अल्पना चौगूले यांच्या”शिवराज्यभिषेक” चित्राचे छत्रपती संभाजीराजे ,छत्रपती यूवराज्ञी संयोगिताराजे यांच्या हस्ते रायगङावर अनावरण

कोल्हापूर/प्रतिनिधी :  “३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या” पूर्वसंध्येला कोल्हापूरच्या स्त्रीरोगतज्ञ चित्रकार डॉ. अल्पना सोपान चौगुले यांनी जलरंगांमध्ये रेखाटलेल्या “शिवराज्याभिषेक” या चित्राचे अनावरण व वितरण
छत्रपती संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे” यांच्या हस्ते रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थित करण्यात आले. त्याचबरोबर शासनस्तरावर या चित्राला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा व शालेय स्तरावर पुस्तकामध्ये समावेश व्हावा अशी मागणी प्रा.वसंतराव मोरे,डॉ.सोपान चौगुले व डॉ.अल्पना चौगुले यांनी यानिमित्ताने केली आहे.६ जून “शिवराज्याभिषेक दिन”. येणारं वर्ष ३५० वं वर्ष चालू आहे. अक्षरांनी लिहावं असा हा दिन ! सर्व हिंदुस्थानात स्मरणात राहिला याला कारण त्या दिवशी रयतेला आपला हक्काचा राजा मिळाला. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या सामान्य माणसाकडून इतिहास घडवून घेतला. कित्येक वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. त्या स्वातंत्र्याचे महत्व व मोल सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून ६ जून १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करुन घेतला. मराठ्यांच्या स्वतंत्र व राज्याचा जयघोष केला. स्वातंत्र्याची पहिली कल्पना जनतेला करुन देणारा हा राजा व तो हा याच दिवशी डॉ. अल्पना चौगुले आपल्या कुटूंबियासोबत ३२५ व्या राज्याभिषेक दिनी रायगडावर गेल्या होत्या.त्यांना यावरूनच कल्पना सुचली आणि त्यांनी या चित्राची निर्मीती २००९ साली केली.त्या वेळेपासून त्यांच्याकडून या चित्राचे वाटप केले जात आहे.
हे चित्र रेखाटताना डॉ. अल्पना चौगुले यांनी चित्रकारांच्या चित्राचा अभ्यास, पुस्तकांचे वाचन केले तसेच ज्येष्ठ चित्रकार मोहनराव वडणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले होते. हे चित्र पूर्ण करण्यास डॉ. चौगुले यांना ३ ते ४ महिने लागले. शिवरायांवरील भक्ती, श्रध्दे मुळे, आदरामुळे त्यांना हे चित्र काढता आले अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या लहानपणापासूनच्या चित्रकलेवरील प्रेमामुळे, आवडीमुळेच शक्य झाले.अशी प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केली आहे.रायगडावरती छत्रपती संभाजी राजे व छत्रपती संयोगिता राजे यांच्या हस्ते डॉक्टर अल्पना चौगुले यांनी रेखाटलेल्या शिवराज्याभिषेकाचे जनरलंगातील चित्राचे ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्व संध्येला रायगडावरती छत्रपती संभाजी राजे व छत्रपती संयोगिता राजे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले व दोन हजारच्या चित्रांच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. लाखो भक्तानां हे चित्र खूप आवडले. यावेळी रायगडावर डॉ. प्राध्यापक ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंतराव मोरे, राष्ट्रीय समन्वयक मराठा मंच पानिपत, मिलिंद पाटील, संभाजीराव चेंडके, सर्जन डॉ. सोपान चौगुले, संदीप कवडे आदी उपस्थित होते.व्यासपीठावर शाहीर आझाद नायकवडी व इतर अनेक शाहीर, छत्रपती संयोगिता राजे व इतर सर्व देशातून आलेले लाखो शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांना चित्र खूप आवडले. त्या आनंदात शिवभक्तानी शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments