Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याशिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम

“शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळातर्फे नियोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : ५० वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत* ऐतिहासिक खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. आमच्या कैलासगडची स्वारी मंदिराच्या ‘शिवालय’ भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची रायगडवर शिवराज्यभिषेकास जाण्याची परंपरा गेल्या ५० वर्षे सुरू आहे. ३२५ वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर शिवशाहीर राजु राऊत यांचे समवेत साजरा केला होता. ३३३ वा शिवराज्यभिषेकदिन मंडळातर्फे खासबाग येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. या परंपरेत यावर्षी ३५० वा आणि शिवालय भजनी मंडळाच्या परंपरेचा सुवर्ण महोत्सवी शिवराज्यभिषेकदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भव्य दरबार हॉल हा मोठा ऐतिहासीक सेट उभा करण्यात येणार असून दर्शनी भव्य प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असेल. शिवराज्यभिषेकदिन निमित्त रविवार ते मंगळवार दिनांक ४,५,६, जून २०२३, या तीन दिवसांमध्ये पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता करवीर पिठाचे जगद्गुरु श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य महाराज तसेच कैलास गडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष माननीय श्री बबेराव शंकरराव जाधव यांच्या हस्ते दत्तोबा बारड, बाळासाहेब देसाई, व मान्यवरांचे उपस्थितीत विधीवत शिवप्रतिमीचे पूजन करून ३५०वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते व भागातील शिवभक्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवरायांचा जयघोष व पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६-३० वाजता माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व मान. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार ऋतुराज संजय पाटील, तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आमच्या शिवालय भजनी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री बाळासाहेब पोवार, श्री प्रदीप रणदिवे, श्री दिलीप नामदेव जाधव, भागातील शिवभक्त, महिला व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेच्या पूजनाचा सोहळा मान्यवरांचे हस्ते होईल मान्यवरांचे स्वागत, भाषणे व त्यानंतर भव्य आतिशबाजी होईल व रात्री ९ ते ११ सांस्कृतिक कार्यक्रम व प्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
यावेळी अध्यक्ष प्रदीप साठे, उपाध्यक्ष विवेक कोरडे, विलास गौड, खजानिस किशोर भोसले, शाहीर अजित आयरेकर, बाबासो शिंदे, अजित जाधव, राजू जाधव, रोहित कारंडे, बबन कांबळे, राजू काटे, अनिल गौड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments