शिवराज्याभिषेक सोहळा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन ६ जून ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा होणार
‘धार तलवारीची,युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ व
‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ ठरणार मुख्य आकर्षण
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राज्याभिषेक’ शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचे सुवर्णपान. यवनी सत्तांच्या अत्याचारातून महाराष्ट्रभूमीला स्वातंत्र्याचा हुंकार देणार हा क्षण. शिवरायांच्या प्रेरणेने मर्द मराठ्यांच्या तलवारी याच मातीत तळपल्या आणि स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. हजारो मावळ्यांच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झाली. दुर्गराज रायगडावर शिवरायांचा ६ जून १६७४ ला ‘राज्याभिषेक’ झाला. मोठ्या थाटामाटात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला अन् सार्वभौम राज्य स्थापन झाल्याची द्वाही दाहीदिशा फिरली.
या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी, या हेतूने प्रतिवर्षी ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर भव्य प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेचे ३५० वे वर्ष सुरु होत आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दुर्गराज रायगडावर ५ व ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे अशी माहिती युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
यावर्षी गडावर ५ जूनला सायंकाळी पाच वाजता ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला कशी असते, याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवासियांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे व सायंकाळी ७ वाजता राज दरबार येथे ‘जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा’ हा शाहीरी कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.
त्याचबरोबर ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. आपापल्या पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालणार आहेत. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याची रुपरेषा अशी सायं. ४.०० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व
शिवभक्तांच्या समवेत नाणे दरवाजा येथून गड चढण्यास प्रारंभ. स्थळ : नाणे दरवाजा सायं. ४.३० वा. महादरवाजा पूजन व तोरण बांधणे.
सायं ५.०० वा. गडपूजन – रायगड जिल्हा प्रशासन, २१ गावातील सरपंच व पंचक्रोशीतील गावक-यांच्या हस्ते.
स्थळ : नगारखाना
सायं ५.०० वा. ‘धार तलवारीची… युद्धकला महाराष्ट्राची’ शिवकालीन युद्धकलांची मानवंदना. स्थळ : होळीचा माळ
रात्री ८.०० वा. ‘जागर शिवशाहीरांचा…स्वराज्याच्या इतिहासाचा’ शाहीरी मानवंदना. स्थळ : राजसदर
रात्री ९.०० वा. गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ. स्थळ : शिरकाई मंदिर
रात्री ९.३० वा. जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून किर्तन व भजन. स्थळ : जगदीश्वर मंदिर
दि . ६ जून २०२३
स. ७.०० वा. रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन, ध्वजारोहन
स्थळ : नगारखाना
स. ७.३० वा. शाहीरी कार्यक्रम. स्थळ : राजसदर
स. ९.३० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन. स्थळ : राजसदर
स. ९.५० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत
व राजसदरेवर आगमन
स. १०.१० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्रीराजा शिवछत्रपती महाराजांना अभिषेक
स. १०.२० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
स. १०.३० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन
स. १०.३० वा. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ युवराज संभाजी छत्रपती महाराज व सर्व शिवभक्तांच्या समवेत
जगदिश्वराच्या दर्शनासाठी श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे प्रस्थान.
दु. १२.०० वा. जगदीश्वर मंदिर दर्शन
दु. १२.१० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन !
—-
आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती
दुर्गराज रायगड’, मार्फत-
दरवर्षी प्रमाणे किल्ले रायगडावर भव्यदिव्य असा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत असतो. चालू वर्षी, हा ३५० वा राज्याभिषेक असणार आहे..
संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळास ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व आहे.
म्हणून या राज्याभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यातील,
त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छ. शहाजीराजे यांचे संस्कार,महाराजांचे जन्म ठिकाण,महाराजांनी केलेला राज्य विस्ताराची ठिकाणे,पवित्र नद्या,
अशा महत्त्वपूर्ण ठिकाणावरून पवित्र जल आणत आहोत.
‘ शिवनेरी ‘ (महाराष्ट्र)
‘ सिंदखेड राजा ‘ (महाराष्ट्र)
बंगलोर फोर्ट (कर्नाटक)
‘ राजगड ‘(पुणे, महाराष्ट्र)
दक्षिण व उत्तरेतील पवित्र नद्या
सिंधू ( लेह, उत्तर)
कृष्णा (श्री शैलम)
‘श्री शैलम’ (आंध्रप्रदेश)
ब्रुह्देश्वर’ महादेव मंदिर (तंजावर, तामिळनाडू)