Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याभास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार अवणीच्या अनुराधा भोसले यांना आज दिला...

भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार अवणीच्या अनुराधा भोसले यांना आज दिला जाणार

कोल्हापूर कैन्सर सेन्टरचे संस्थापक भास्कर लाला पवार यांच्या स्मरणार्थ पहिलाच भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार अवणीच्या अनुराधा भोसले यांना जाहीर

 

कोल्हापूर/ (प्रतिनिधी) कॅन्सर रोग प्रतिबंधापासून अंतिम टप्प्यातील सर्वच उपचार करणारे कोल्हापूर कॅन्सर सेन्टर आणि छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर कैन्सर सेन्टरचे संस्थापक भास्कर लाला पवार यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिलाच भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार गोरगरिब निराधारांच्या आश्रयदात्या व अवनी संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन, डायरेक्टर व प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. सुरज पवार यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
यावेळी डॉ सुरज पवार चेअरमन, मॅनेजींग डायरेक्टर, कोल्हापूर कॅन्सर सेन्टर), डॉ. योगेश अनापि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, कोल्हापूर कॅन्सर सेन्टर), डॉ संदीप पाटील (ट्रस्टी शाहू कॅन्सर रिसर्व फॉउंडेशन, कोल्हापूर), डॉ शिरीष भामरे ( सी इ ओ, कोल्हापूर कॅन्सर सेन्टर) उपस्थित होते.
डॉ सूरज पवार म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील व अतिगरजूंना कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजारावर मोफत अथवा अल्प दरात एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी भास्कर पवार यांची धडपड होती. लहानपणा पासूनच अभ्यासू वृत्ती आणि कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. फुले शाहू आंबेडकर यांच्या दिवाराने प्रेरित होऊन, आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजातील वंचितांसाठी वेबले शासनाच्या एस.टी. खात्यात कार्यरत असताना आपली कारकीर्दही वाखाणण्यासारखी ठेवली होती. व्यापक जनसंपर्कातून अनेक तरुण व होतकरूंना रोजगाराच्या संधी देऊन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक बांधिलकी जपत, त्यांच्याच ध्यासातून कोल्हापूर कॅन्सर सेन्टर या हॉस्पिटलची स्थापना केली.
शाहू कॅन्सर रिसर्च फॉउंडेशन चे ट्रस्टी डॉ. संदीप पाटील म्हणाले, साधारण एक दशकापूर्वी, तळ कोकण पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक येथील कॅन्सर रुग्णांना मिरज येथे एकाच सेन्टर मध्ये जुन्या पद्धतीची कोबाल्ट रेडिएशन थेरपी उपचार उपलब्ध होते. त्यासाठी रुग्णांना प्रचंड संघर्ष करावा लागत असे. रुग्णाने होणारे हाल स्वतः जवळून पाहिल्यामुळे कॅन्सर या आजारावर रुग्णांना दिलासा, आधुनिक उपचार व प्रतिबंधात्मक उपाय योजना हे सर्व एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशातून, अत्यंत प्रतिकूल “रिस्थितीत, ध्येयवेड्या भास्कर पवार ( बापूंनी) कोल्हापूर कॅन्सर सेन्टर ची उभारणी केली. आज कॅन्सर मधील सर्व अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली देणारे भारतातील अग्रगण्य हॉस्पिटल म्हणून कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचा उल्लेख केला जातो. असे कॅन्सर सेन्टर आपल्या कोल्हापूर मध्ये आहे हि एक अभिमानाची बाब आहे.
अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या नावाने समाजातील वंचितांपासून विविध क्षेत्रातील लोकांकरिता तळमळीने काम करून समाजाला पुढे नेणाऱ्या व्यक्तीस भास्कर लाला पवार यांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्याचे कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या कमिटीने ठरविले. विविध निकषांच्याद्वारे ह्या वर्षी सुरु होत असलेल्या या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी अनुराधा भोसले या ठरल्या आहेत. हा पुरस्कार सोहळा रविवार दि. २१ मे २०१३ रोजी सायंकाळी ७:०० वा. कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या प्रांगणामध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अमेरिकेचे नामांकित डॉरवी गोडसे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अनुराधा भोसले यांच्याविषयी थोडक्यात माहिती
अनुराधा भोसले या १९९४ पासून गेली २० वर्षे समाजकार्यात कार्यरत असून विविध द्वारे त्यांनी समाजकार्य पार पडले आहे. अवनी या संस्थेद्वारे निराधार मुलींना घर मिळवून दिले आहे ११.५०० मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. कमवा आणि शिका या योजनेद्वारे १८ वर्षांवरील मुलीना त्यांनी सक्षम केले आहे. ३० हुन अधिक मुलींची अवनी संस्थेद्वारे उच्च शिक्षणाची जबाबदारी पार पडली आहे. विटभट्टी. कारखाने येथे काम करणाऱ्या लहान मुलांचे पुनर्वसन करून, शासकीय शाळांमध्ये लगना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. कचरा गोळा करणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी पाळणाघर, गरीब मुलांना शिक्षणाचे क्लासेस, मोबाईल लायब्ररी वगैरे बऱ्याच सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सुमारे ४५० हुन अधिक विधवा व निराधार महिलांसाठी एकटी या संस्थेद्वारे शासनाची पेंशन मिळवून देण्यासह स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. बालविवाह प्रतिबंध, घरघुती हिंसाचार प्रतिबंध, बाल रोजगार प्रतिबंध अशा विविध प्रकारे त्या समाजाची सेवा करीत असतात अवनी संस्थेला आज पर्यंत जिल्हा, राज्य व देश पातळीवरील ८० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

कॅन्सर सेंटर वर्धापनदिन आणि बरे झालेल्या रुग्णांचा मेळावा

दरम्यान सालाबाद प्रमाणे कॅन्सरमधून बरे झालेल्या रुग्णांचा मेळावा व कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचा ११ वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम दि. २१ मे रोजी सायंकाळी ७:०० वा. कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या प्रांगणामध्ये होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कॅन्सर रुग्णाशी संवाद साधला जातो व रुग्ण त्यांची मनोगते सादर करतात. एकूण कॅन्सर रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचा घाट दरवर्षी घातला जातो सदर कार्यक्रम हा यू-ट्यूब वरती लाइव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments