Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यादिनांक ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन नियोजन बैठकीचे आयोजन

दिनांक ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन नियोजन बैठकीचे आयोजन

दिनांक ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन नियोजन बैठकीचे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती मार्फत दरवर्षी ५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी या सोहळ्याला ३५० वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करणेचे नियोजन सुरु आहे.
दरवर्षी लाखो शिवभक्त गडावर उपस्थित रहात असतात. शाहिरांचा बहारदार कार्यक्रम , शिवराज्याभिषेक सोहळा, पालखी सोहळा तसेच शिरकाई देवीला जागरण गोंधळ असा भव्यदिव्य कार्यक्रम निश्चित करणेत आला आहे. या सोहळ्यात शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणेत आली आहे.
लाखो शिवभक्तांना हा सोहळा पूर्ण होईपर्यंत अन्नछत्राद्वारे भोजन व्यवस्था करणेत आली आहे. या वर्षी हा सोहळा मोठ्या प्रमाणात होत असून २०२४ च्या सोहळ्यापर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम घेणेत येणार आहेत.
या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याची सविस्तर माहिती देणेसाठी शुक्रवार दि.१९ मे रोजी सायंकाळी ठिक पाच वाजता जुना राजवाडा, भवानी मंडप, कोल्हापूर येथे सर्व शिवभक्तांची नियोजन बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन ज्यांचे मार्गदर्शनाखाली होते, त्या युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व शिवभक्त, इतिहास प्रेमींनी या नियोजन बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांचेमार्फत करणेत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments