Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याइव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी'

इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी’

इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअरच्या संधी’

कोल्हापूर/प्रतिनिधी : इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून हे उभरते करिअरचे क्षेत्र असून विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून क्षेत्राकडे पाहावे, मत कोल्हापूरच्या इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्लॅनर असोसिएशनचे अध्यक्ष शाम बासरानी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते. ‘एम्पा’ संस्थेचे अवधूत भोसले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. रामचंद्र पवार होते. बासरानी यांनी इव्हेंट व्यवसायातील सद्यस्थिती व करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
स्वागत क्षितिजा पाटील यांनी केले. प्रास्ताविक योगिता खबाले व पाहुण्यांची ओळख पूनम जाधव यांनी करून दिली. प्रमोद गिरी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन क्षितिजा पाटील यांनी केले. यावेळी डॉ. सुमन बुवा, आर. एम. जाधव, रवींद्र खैरे, टी. आर. गुरव, श्वेता आठवले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments