Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्यागुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

सांगली / प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय पत्रकार स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यंदा गुरुबाळ माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दिनांक 8 मे रोजी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते होणार आहे.                                          निखिल वागळे यांचे व्याख्यान आणि पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांना जीवनगौरव तर सुनील कदम, गुरुबाळ माळी, संपत मोरे यांना राज्यस्तरीय आणि इतर पुरस्कारांची घोषणा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments